अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी मदतनीस भरती २०२३ मान्यता

अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी मदतनीस भरती २०२३ मान्यता
अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी मदतनीस भरती २०२३ मान्यता

अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी मदतनीस भरती २०२३ मान्यता– राज्यातील अंगणवाडी पदभरती साठी आज मान्यता देण्यात आली ज्यामध्ये अंगणवाडी सेविका , मिनी अंगणवाडी सेविका , अंगणवाडी मदतनीस या पदांचा समावेश असेल. नवीन शासन निर्णयानुसार आज मान्यता देण्यात आली त्याची माहिती पुढील प्रमाणे आहे.

अंगणवाडी भरती २०२३ रिक्त पदांची संख्या

राज्यात अंगणवाडी सेविका यांची ९७४७५, मिनी अंगणवाडी सेविका यांची १३०११ व अंगणवाडी मदतनीस यांची ९७४७५ अशी एकूण २०७९६१ पदे मंजूर असून त्यापैकी सुमारे २०१८३ पदे रिक्त आहेत.

अंगणवाडी सेविका व मदतनीस भरती शासन निर्णय

राज्यातील अंगणवाडी कर्मचा-यांच्या पदभरतीस सन २०१७ मध्ये वित्त विभागाकडून स्थगिती देण्यात आली होती. तद्नंतर संदर्भाधिन क्र. २ येथील शासन निर्णय दिनांक ८.१०.२०१८ अन्वये मा. मुख्य सचिव यांचे अध्यक्षतेखालील राज्य शक्ती प्रदान कार्यक्रम समितीने दिलेल्या मान्यतेनुसार नंदुरबार, गडचिरोली, उस्मानाबाद, वाशिम हे आकांक्षित जिल्हे तसेच गोंदिया, चंद्रपूर व भंडारा जिल्हयातील काही भाग (डावी कडवी विचारसरणी अंतर्गत येणाऱ्या जिल्हयांची अद्यावत यादीनुसार) तसेच संपूर्ण पालघर जिल्हा, अमरावती जिल्हयातील मेळघाट, धारणी आणि चिखलदरा या प्रकल्प / तालुक्यातील अंगणवाडी सेविका, मदतनीस व मिनी अंगणवाडी सेविका यांची रिक्त पदे भरण्यास दिनांक १ नोव्हेंबर, २०१८ पासून भरण्याबाबत शासन मंजूरी देण्यात आली आहे.

तसेच संदर्भाधीन क्रमांक-२ येथील दिनांक ८.१०.२०१८ च्या शासन निर्णयान्वये मान्यता दिलेल्या क्षेत्रा व्यतिरिक्त उर्वरित सर्व क्षेत्रातील रिक्त पदांपैकी ५०% रिक्त पदे भरण्यास संदर्भाधीन क्र. ३ येथील दिनांक १७.०१.२०२० रोजीच्या शासन निर्णयान्वये मान्यता दिलेली आहे. २. राज्यात अंगणवाडी सेविका यांची ९७४७५, मिनी अंगणवाडी सेविका यांची १३०११ व अंगणवाडी मदतनीस यांची ९७४७५ अशी एकूण २०७९६१ पदे मंजूर असून त्यापैकी सुमारे २०१८३ पदे रिक्त आहेत.

त्यानुषंगाने अंगणवाडी सतत कार्यरत असणे आवश्यक असल्याने तसेच अंगणवाडी कर्मचान्यांची पदे रिक्त राहिल्यामुळे योजनेच्या अमलबजावणीवर विपरित परिणाम होऊ नये यास्तव राज्यातील अंगणवाडी कर्मचा-यांची सर्व रिक्त पदे भरण्याबाबत मा. मुख्य सचिव यांचे अध्यक्षतेखालील राज्य शक्ती प्रदान कार्यक्रम समितीच्या दिनांक २२ डिसेंबर, २०२२ रोजीच्या बैठकीमध्ये झालेल्या निर्णयाच्या अनुषंगाने मान्यता देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

शासन निर्णय :-

एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत राज्यातील अंगणवाडी सेविका – ९७४७५, मिनी अंगणवाडी सेविका- १३०११ व अंगणवाडी मदतनीस ९७४७५ अशा एकूण २०७९६१ इतक्या मंजूर पदसंख्येच्या मर्यादेत अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस व मिनी अंगणवाडी सेविका यांची रिक्त असलेली सर्व पदे भरण्यास मान्यता देण्यात येत आहे.

२. अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस व मिनी अंगणवाडी सेविका यांच्या भरती प्रक्रियेसंदर्भात शासनाने वेळोवेळी केलेल्या सुधारणा लागू राहतील,

३. त्यानुसार अंगणवाडी कर्मचा-यांच्या मंजूर पदसंख्येच्या मर्यादेत भविष्यात रिक्त होणारी सर्व पदे भरण्याची प्रक्रिया नियमितपणे चालू ठेवण्यात यावी. याबाबतची अंमलबजावणी होत असल्याबाबतची दक्षता आयुक्त, एकात्मिक बाल विकास सेवा योजना, नवी मुंबई यांनी घ्यावी.

४. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०२३०१०९१२५९३१२८३० असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने

सविस्तर gr pdf पहा