आपले सरकार सेवा केंद्र रिक्‍त केंद्र असलेल्‍या गावांची जाहिरात

आपले सरकार सेवा केंद्र रिक्‍त केंद्र असलेल्‍या गावांची जाहिरात लातूर जिल्हा

जिल्हाधिकारी लातूर यांचे कार्यालय ( ई – गव्हर्नन्स शाखा )

जाहिर प्रसिध्दी लातूर जिल्हयातील सर्व जनतेस याव्दारे जाहीर करण्यात येते की , ज्या अर्थी महाराष्ट्र शासनाच्या माहिती व तंत्रज्ञान विभाग व सामन्य प्रशासन विभागा च्या वतीने शासन निर्णय क्र.मांतंसं / १७१६ / प्र.क्र .५१७ / ३ ९ दिनांक १ ९ जानेवारी २०१८ अन्वये केंद्रशासनाच्या राष्ट्रीय ई – गव्हर्नन्स कृती कार्यक्रमांतर्गत राज्यातील ग्रामीण व शहरी भागात नागरिका पर्यंत शासकीय , निमशासकीय व खाजगी सेवा पोहचविण्यासाठी शासनाच्या वतीने आपले सरकार सेवा केंद्रे हे प्रत्येक ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात नगरपंचायत कार्यक्षेत्रात नगर परिषद कार्यक्षेत्रात व तसेच महानगर पालीका कार्यक्षेत्रात आपले सरकार सेवा केंद्रे स्थापीत करणे बाबतचा उक्त शासन निर्णयाव्दारे निर्णय घेण्यात आलेला आहे .

आपले सरकार सेवा केंद्र रिक्‍त केंद्र Details

त्याअर्थी लातूर जिल्हयातील ज्या कार्यक्षेत्रात आपले सरकार सेवा केंद्र स्थापीत आहेत त्या बाबतची माहिती या कार्यालयामार्फत प्रपत्र अ मध्ये प्रसिध्द करण्यात येवून रिक्त असलेल्या कार्यक्षेत्रात दिनांक 23-03-2022 -06-04-2022 पर्यंत अर्ज सादर करावेत , तरी जिल्हयातील इच्छुक अर्जदार यांनी या कार्यालयाकडे ते दर्शविण्यात आलेल्या रिक्त असलेल्या कार्यक्षेत्रात आपले सरकार सेवा केंद्रासाठी कार्यालयीन वेळेत अर्ज सादर करावे .

पदाचे नाव- आपले सरकार सेवा केंद्र चालक

रिक्त असलेले ठिकाण- लातूर जिल्हा

अर्ज प्रक्रिया– ऑफ लाइन

अर्ज देण्यांचे ठिकाण- जिल्हा अधिकारी कार्यालय लातूर

आपले सरकार केंद्र घेण्यासाठी अटी व शर्ती-

1. आपले सरकार सेवा केंद्रामार्फत महाराष्ट्र शासन निर्णय दिनांक 19 जानेवारी 2018 मधील परीशिष्ट क मध्ये नमुद केलेल्या सर्व सेवा नागरीकांना देणे आवश्यक आहे . 2. सदर शासन निर्णयातील परीशिष्ट ड मध्ये नमुद केलेल्या विहीत नमुन्याप्रामणे आपले सरकार सेवाकेंद्राचा बोर्ड / फलक लावणे आवश्यक आहे . 3. आपले सरकार सेवा केंद्र मंजुर ठिकाणीच चालविण्यात यावे अन्यथा इतर ठिकाणी आढळुन आल्यास त्यांचेवर कार्यवाही करण्यात येईल . 4. नागरीकाकडुन स्वीकारण्यात येणा – या पेमेंटसाठी ई – सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात , डिजिटल पेमेंटला प्राधान्य देणे .

आपले सरकार केंद्र घेण्यासाठी अटी व शर्ती-

5. शासनाने ठरवुन दिलेल्या वेळापत्रकानुसार आपले सरकार सेवा केंद्र चालु ठेवुन नागरीकांना सेवा पुरविणे . 6. शासनाने ठरवुन दिलेल्या कॉमन ब्रेडींगचा वापर करणे तसेच महाराष्ट्र माहीती तंत्रज्ञान महामंडळाने स्थापन केलेल्या हेल्पलाईन क्रमांकाचा तपशील आपले सरकार सेवा केंद्राच्या दर्शनी भागावर प्रसिध्द करणे . 7. शासनाने ठरवुन दिलेले दर केंद्राच्या दर्शनी भागावर प्रसिध्द करणे तसेच ठरवुन दिलेल्या दरापेक्षा अधिक शुल्काची आकारणी न करणे . 8. शासनाने पुरविलेल्या वस्तु आज्ञावली इ.चे वापर संरक्षण जतन करणे 9. सर्व ग्राहकांना सौजन्याची वागणुक देणे आणि आवश्यक मदत व सहकार्य करणे . 10. विविध शासकीय योजनांच्या अंमलबजावणीत ठरवुन दिलेले वेळापत्रक व निर्देश काटेकोरपणे पाळणे . 11. ज्या अर्जदाराकडे CSC ID नाहीत अशा अर्जदारानी CSC ID काढणे आवश्यक आहे .

अर्ज करण्याची शेवट तारीख –

आपले सरकार सेवा केंद्र स्थापन करण्यासाठी संबंधित गावातील इच्छुक अर्जदाराने या सोबत जोडलेल्या विहीत नमुन्यातील अर्ज दिनांक 06-04-2022 पर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयास करु शकतात .

अर्ज व जाहीरात पहा- आपले सरकार केंद्र जाहीरात

अधिकृत वेबसाइट

error: Content is protected !!