You are currently viewing उन्हाळ्यात पपई खा आणि पपई स्मूदी पोटभर प्या!  वजन करते कमी

उन्हाळ्यात पपई खा आणि पपई स्मूदी पोटभर प्या! वजन करते कमी

  • Post category:Home

उन्हाळ्यात लागणारी भूक, तहान आणि पोषण यांचा विचार करता पपईची स्मूदी पिणं फायदेशीर मानलं जातं. रोज सकाळी बाहेर पडण्यापूर्वी एक ग्लास पपईची स्मूदी प्यायल्यास शरीरात दिवसभर ऊर्जा टिकून राहाते.

पपई खा आणि पपई स्मूदी पोटभर प्या!

पपईची स्मूदी पिण्याचे फायदे

1. पपईच्या स्मूदीतून कॅल्शियम, मॅग्नेशियम, लोह, प्रथिनं, पोटॅशियम, ऊर्जा, अ, ब आणि क जीवनसत्वं मिळतात. उन्हाळ्यात पपईची स्मूदी नियमित प्यायल्यानं त्वचा चमकदार होते. पपईमधील पैपेन नावाच्या विकरमुळे त्वचेवरील मृतपेशी निघून जातात. चेहऱ्यावरील डाग, मुरुम, पुटकुळ्या आणि सुरकुत्या या त्वचेच्या समस्या सोडवण्यासाठी पपईची स्मूदी पिणं फायदेशीर ठरतं. 2. पपईच्या स्मूदीमध्ये फायबरचं प्रमाण जास्त असतं. ही स्मूदी पिल्याने पोट बराच वेळ भरलेलं राहातं. सारखी भूक लागत नाही. वजन कमी करण्यासाठी पपईची स्मूदी पिणं फायदेशीर ठरतं. पपईची स्मूदी नियमित प्यायल्यास वजन निय्ंत्रित राहातं. पपईच्या स्मुदीमध्ये कॅलरीजचं प्रमाण कमी असल्यानं वजन कमी करण्यासाठी पपईच्या स्मुदीची मदत होते. 3.रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी आवश्यक असलेले ॲण्टिऑक्सिडण्टस, पोटॅशियम या घटकांचं प्रमाण पपईच्या स्मुदीमध्ये जास्त असतं. पपईच्या स्मुदीमधील फायबर आणि जीवनसत्वं पपईमधील फॅटसचं रुपांतर ऊर्जेत करतात. यामुळे रक्तवाहिन्यात रक्ताच्या गुठळ्या धरत नाहीत. रक्तप्रवाह सुरळीत राहातो. 4.पपईच्या स्मुदीत क जीवनसत्वाचं प्रमाण भरपूर असल्यानं रोगप्रतिकारशक्ती वाढून श्वसन यंत्रणा सुदृढ राहाते.

पपईची स्मूदी कशी कराल?

पपईची स्मूदी कशी कराल?

पपईची स्मुदी करण्यास अत्यंत सोपी आहे. स्मुदी करण्यासाठी 2 कप पिकलेली पपई, चवीपुरतं मध, आवडत असल्यास पाव चमचा हळद, अर्धा कप संत्र्याचा रस घ्यावा. आधी पिकलेली पपई कापून घ्यावी. ती मिक्सरमधून किंवा ब्लेण्डरनं बारीक करुन घ्यावी. बारीक केलेल्या पपईत पाव चमचा हळद, अर्धा कप संत्र्याचा रस घालून मिश्रण पुन्हा मिक्सरमधून पुन्हा फिरवून घ्यावं. स्मूदी एका ग्लासमध्ये काढावी. हा ग्लास थोडावेळ फ्रिजमध्ये ठेवून स्मूदी थंडं करुन घ्यावी.