‘कमवा आणि शिका योजना’ जिल्हा परिषद कोल्हापूर ऑनलाइन अर्ज

‘कमवा आणि शिका योजना’ जिल्हा परिषद अर्ज– राजर्षि शाहू महाराज मागासवर्गीय विद्यार्थ्यांकरिता ‘कमवा आणि शिका योजना’- जिल्हा परिषद, कोल्हापूर ऑनलाइन अर्ज खालील प्रमाणे या योजनेची माहिती देण्यात आली आहे .

योजनेचे नाव: राजर्षि शाहू महाराज मागासवर्गीय विद्यार्थ्यांकरिता ‘कमवा आणि शिका योजना’

‘कमवा आणि शिका’ योजनेचा मूळ उद्देश

हलाखीच्या आर्थिक परिस्थितीमुळे समाजातील बरेचसे होतकरू आणि गुणवंत विद्यार्थी हे उच्च शिक्षणापासून वंचित राहतात. इयत्ता १२ वी पास झाल्यानंतर पुढे पदवीपर्यन्त शिक्षण घेण्यार्‍या विद्यार्थ्यांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे. बारावी नंतर पारंपारिक पद्धतीने महाविद्यालयीन शिक्षण घेऊन पदवी मिळवू इच्छिणारे बरेचसे विद्यार्थी हे हलाखीच्या कौटुंबिक परिस्थितीमुळे पुढील शिक्षण अर्धवट सोडतात किंवा घेण्यास ते पूर्ण करण्यास असक्षम असतात, अशा विद्यार्थ्यांना पुढील पदवी शिक्षणाची संधी मिळावी आणि शिक्षण घेत असताना त्यांचे अर्थार्जन सुद्धा व्हावे ही आज महत्वाची सामाजिक गरज आहे.

पारंपारिक पद्धतीने महाविद्यालयीन शिक्षण घेताना, कर्मशील ज्ञांनाच्या अभावामुळे पदवी पूर्ण होऊन सुद्धा काही होतकरू आणि गुणवंत विद्यार्थी हे इतर विद्यार्थ्यांच्या तुलनेत आज मागे पडताना आपल्याला आढळून येत आहे. असे विद्यार्थी हे पदवी पूर्ण होऊनसुद्धा सुशिक्षित बेरोजगार म्हणून मागे रहात आहेत.

कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागामार्फत सध्या विविध योजनांचे तसेच राज्य आणि केंद्र सरकारच्या विविध मिशनमोड वरील समाजोपयोगी प्रकल्पांचे काम युद्धपातळीवर चालू आहे. अपुऱ्या मनुष्यबळाअभावी बऱ्याच वेळेला विहित मुदतीमध्ये कामाचे ठरवून दिलेले उद्दिष्ट साध्य करणे आव्हानात्मक झालेले आहे. माहिती आणि तंत्रज्ञानाचा प्रभावी आणि कालसुसंगत असा उपयुक्त वापर करून कार्यालयीन कामकाजामध्ये गतिमानता आणणे आणि प्रलंबित कार्यालयीन कामकाजाचा विहित मुदतीमध्ये निपटारा करणे ही आता सर्व शासकीय कार्यालयांची मोठी गरज बनलेली आहे.

कोल्हापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील बारावी पास असलेल्या किंवा नुकतेच पदवी शिक्षण पूर्ण झालेल्या होतकरू आणि गुणवंत मागासवर्गीय विद्यार्थ्यांना, पुढील पदवीचे शिक्षण घेताना / घेतल्यावर नोकरीसाठी आवश्यक ते सर्व ज्ञान – कौशल्ये ही त्यांच्या दैनंदिन कामातून मिळावीत, असे प्रत्यक्ष कृतीशील शिक्षण घेताना त्यांना ३ वर्षासाठी निश्चित विद्यावेतन सुद्धा मिळावे यासाठी जि. प. सेस फंडातून नावीन्यपूर्ण योजना राबवावी अशी बाब जिल्हा परिषदेच्या विचाराधीन होती.

योजनेच्या लाभाचा तपशील-कमवा शिका मधून काय भेटणार

तीन वर्षासाठी प्रशासकीय काम करण्याची आणि पदवीनंतरच्या नोकरीसाठी आवश्यक विविध ज्ञान- कौशल्ये आत्मसात करून घेण्याची संधी उपलब्ध करून दिली जाईल.

  • विद्यार्थ्याने केलेल्या कामापोटी पहिल्या वर्षी रु. ८,०००/- दुसर्‍या वर्षी रु. ९,०००/- आणि शेवटच्या वर्षासाठी रु. १०,०००/- इतके विद्यावेतन प्रत्येक महिन्यासाठी अदा केले जाईल.
  • निवड झालेल्या विद्यार्थ्यांना निवास आणि भोजनासाठीचा खर्च भागविण्यासाठी मदत म्हणून दरमहा ४,०००/- रुपये प्रमाणे प्रोत्साहनपर भत्ता देण्यात येईल.
  • सलग तीन वर्षे समाधानकारकरित्या केलेले काम आणि स्वयंअध्ययन यातून तिसर्‍या वर्षाच्या शेवटी इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाची (IGNOU) बीबीए म्हणजेच Bachler in Business Administration (Service Management) ही कामातून पदवी
  • तीन वर्षे काम केल्याचे कार्यालयाकडून अनुभव प्रमाणपत्र
  • निवड झालेल्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक वापराकरिता एमकेसीएल यांच्या मार्फत Non-Returnable basis वर एक उत्तम स्मार्टफोन सुद्धा मोफत दिला जाणार आहे.

‘कमवा आणि शिका योजना’ जिल्हा परिषद कोल्हापूर पात्रता

१) विद्यार्थी हा ग्रामीण भागातील रहिवासी असावा
२) लाभार्थी हा अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती व भटक्या जमाती प्रवर्गातील असावा.
३) लाभार्थी विद्यार्थी हा किमान बारावी पास असावा. (लाभार्थ्याने १२ वी ची परीक्षा नुकतीच दिली असल्यास प्रत्यक्ष मुलाखतीच्या दिवशी पर्यन्त आपले पास झाल्याचे प्रमाणपत्र दाखवणे आवश्यक )
४) लाभार्थ्यास इयत्ता १२ वी मध्ये शाखानिहाय (विज्ञान, कला, वाणिज्य, समकक्ष इतर शाखा) मिळालेल्या सर्वोच्च गुणांनुक्रमाचा इंटर्नशिप निवडीवेळी प्राधान्याने विचार केला जाईल.
५) लाभार्थी हा संगणक साक्षर असावा.
६) दिनांक ३० जून २०२२ रोजी लाभार्थ्याचे वय हे १८ पूर्ण ते २५ वर्षे दरम्यान असावे.
७) लाभार्थी हा कोल्हापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील कायमस्वरूपी रहिवासी असावा.
८) बीबीए पदवी अभ्यासक्रमासंदर्भात इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ (IGNOU) यांनी वेळोवेळी घालून दिलेल्या नियम आणि अटींचे लाभार्थ्याला पालन करावे लागेल.
९) इंटर्न म्हणून काम करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागामार्फत निवड पत्र मिळाल्यानंतर संबंधित विद्यार्थ्याने अभ्यासक्रमाची प्रती वर्ष रु. २०,०००/- या प्रमाणे ३ वर्षे फी ही स्वत: भरावयाची आहे. इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाने बीबीए (सर्व्हिस मॅनेजमेंट) या कार्यआधारित पदवी अभ्यासक्रमासाठी संबंधित विद्यार्थ्याची प्रवेश निश्चिती केल्यावरच इंटर्नशिप सुरू होणार आहे.  
१०) कामाच्या संदर्भात कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाने वेळोवेळी घालून दिलेल्या नियम आणि अटींचे पालन करण्याची जबाबदारी ही संबंधित विद्यार्थ्याची असेल. सदर नियमांचे पालन न झाल्यास अथवा समाधानकारक काम नसल्यास अशा विद्यार्थ्याची कार्यालयीन सेवा कधीही थांबविण्याचा अधिकार हा कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाला असेल.
११) सदर योजना ही तीन वर्षानी बीबीए पदवी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या कोणत्याही विद्यार्थ्यास कोल्हापूर जिल्हा परिषदे मध्ये कायमस्वरूपी अथवा कंत्राटी स्वरूपाच्या नोकरीची ऑफर / आश्वासन देत नाही.
१२) इंटर्नशिप साठी रुजू होतेवेळी विद्यार्थी उमेदवाराने, कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाने दिलेले ऑफर लेटर काळजीपूर्वक वाचावे. आणि त्यातील दिलेले नियम आणि अटी व शर्तींचे पदवी अभ्यासक्रम पूर्ण होई पर्यन्त काटेकोरपणे पालन करणे आवश्यक आहे. निवड केलेल्या लाभार्थ्याने इंटर्नशिप अर्धवट सोडून जाऊ नये म्हणून बंधपत्र करून देणे आवश्यक आहे.
१३) सदर योजनेअंतर्गत निवड केलेल्या लाभार्थ्यास कोणत्याही नियमित पदावर हक्क सांगता येणार नाही. तसेच सदर निवडीच्या आदेशाने त्यांना कोणत्याही न्यायालयात वा प्राधिकरणाकडे जिल्हा परिषदेच्या सेवेत नियमित करण्यास्तव दाद मागता येणार नाही.
१४) इंटर्नच्या निवड संख्येमध्ये वेळोवेळी बदल करण्याचे सर्वाधिकार हे कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाने राखून ठेवलेले आहेत.

आवश्यक कागदपत्रे:

१) आधार कार्ड
२) जात प्रमाणपत्र
३) शिधापत्रिका- मागील आणि पुढील बाजू
४) दहावी उतीर्ण प्रमाणपत्र
५) बारावी उत्तीर्ण प्रमाणपत्र (बारावी परीक्षेला बसलेले विद्यार्थी हे त्यांचे हॉल तिकीट अपलोड करू शकतात परंतु प्रत्यक्ष मुलाखतीच्या दिवसा पर्यन्त त्यांनी पास होणे आणि तसे प्रमाणपत्र दाखवणे आवश्यक )
६) सक्षम अधिकार्‍याने दिलेले दारिद्रय रेषेखालील असल्याचे प्रमाणपत्र असल्यास
७) सक्षम अधिकार्‍याने दिलेला उत्पन्न दाखला
८) MS-CIT संगणक परीक्षा उत्तीर्ण असल्याचे प्रमाणपत्र

अर्ज करायची शेवट तारीख

दिनांक ३१ मे २०२२ पर्यंत

कमवा शिका योजना जिल्हा परिषद अर्ज कसा करावा

अर्ज करण्यासाठी online अर्ज भरावा लागेल online अर्ज येथे भरा

error: Content is protected !!
Scroll to Top
RTE 25% Admission 2024 सुरु झाले ICMR NIV Recruitment 2023 pwd exam timetable out! आनंदाची बातमी!! शासकीय कर्मचारी महागाई भत्त्या मध्ये वाढ. निर्णय आला वन विभाग भरती निकाल pdf आल्या | तुमचा स्कोर चेक करा रुतुराज गायकवाड़ (Ruturaj Gaikwad vs Shiva Singh) Packers : Green Bay Packers SSC GD Constable Recruitment 2022 45284 posts india vs australia hockey match result