कृषि कर्ज मित्रा योजना

कृषि कर्ज मित्र सांगली जिल्हा परिषद भरती २०२२

पदाचे नाव – कृषि कर्ज मित्र 

नोकरीचे ठिकाण- सांगली जिल्हा

अर्ज प्रक्रिया – ऑनलाइन

अर्ज फी-नाही

ऑनलाइन अर्ज करा
अधिकृत वेबसाइट 
कृषि कर्ज मित्र योजना शाशन निर्णय पहा

कृषि कर्ज मित्रा योजना माहिती

शेतकऱ्यांना वेळेत व सुलभरित्या कर्ज उपलब्ध होण्याच्या दृष्टीने कृषी कर्ज मित्र योजना राबविण्याबाबत महाराष्ट्र शासन ग्राम विकास विभाग शासन परिपत्रक क्रमांकः योजना -२०२० / प्र.क्र . ३४ / वित्त -३ तारीख : २१ ऑक्टोबर , २०२१

प्रस्तावना :

शेतकऱ्यांना खरीप व रब्बी हंगामा करिता राष्ट्रीयकृत बँका , सहकारी तसेच खाजगी बँका व पतपेढ्यांमार्फत मोठ्या प्रमाणांवर कर्ज पुरवठा केला जातो . यामध्ये ही शेतकऱ्यांचा कल हा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडे जास्त असतो . सहकारी बँकेकडून विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायट्यामार्फत कर्जाचे वितरण केले जाते . सर्वसाधारणपणे शेतकरी नवीन पीक कर्ज , मध्यम व दीर्घ मुदतीचे कर्ज घेतो . हे कर्ज घेत असताना त्याला ७/१२ उताऱ्यापासून ते बँकांचे ना – हरकत प्रमाणपत्र इत्यादी कागदपत्रे गोळा करावी लागतात . यासाठी बराच कालावधी लागतो व कधी कधी तर हंगाम ही संपून जातो . केवळ कागदपत्रांच्या पुर्ततेअभावी त्यास वेळेवर कर्ज मिळत कर्ज मिळत नाही . नाईलाजास्तव त्याला खाजगी सावकाराकडून जास्तीच्या व्याजाने कर्ज घ्यावे लागते . अशाप्रकारे शेतकऱ्यांना बँकेमार्फत कर्ज मिळविण्यासाठी अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते . शेतकऱ्यांना वेळेत व सुलभरित्या कर्ज उपलब्ध होण्याच्या दृष्टीने जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाकडून कृषी कर्ज मित्र योजना राबविण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती . शासन निर्णय : शेतकऱ्यांना वेळेत व सुलभरित्या कर्ज उपलब्ध होण्याच्या दृष्टीने जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाकडून ” कृषी कर्ज मित्र “ योजना खालील अटी व शर्तीच्या अधीन राहून शासन मान्यता देण्यात येत आहे .

योजनेचा उद्देश :

शेतकऱ्यांना कृषी कर्जाची उपलब्धता सहजतेने व विनाविलंब होण्यासाठी सहाय्य करणे व त्याद्वारे भांडवलाची गुंतवणुक वाढवून कृषीक्षेत्राचा विकास साधणे .

योजनेचे स्वरूप :

दरवर्षी खरीप , रब्बी हंगामामध्ये शेतकरी पीक कर्ज घेत असतात . लागवडीखालील क्षेत्र व एकूण पीक कर्ज वाटप पाहिले असता यात विषमता आढळून येते . कृषी क्षेत्रात भांडवलाचा ओघ व गुंतवणूक वाढवून कृषी क्षेत्राच्या विकासात अधिकची भर पडणे आवश्यक आहे . सुक्ष्म निरीक्षण केल्यास तेच तेच लाभार्थी वेगवेगळ्या बाबींसाठी कर्ज घेत असल्याने दिसून येतात . त्यामुळे त्यांच्या शेती क्षेत्रात विकास झालेला दिसून येतो . या शेतकऱ्यांव्यतिरिक्त ज्यांना कर्ज घेण्याची इच्छा आहे परंतु , कर्ज प्रक्रियेचे अज्ञान असल्यामुळे व वेळेच्या अभावामुळे कर्ज मिळणे शक्य होत नाही .अशा इच्छूक पात्र शेतकऱ्यांना कृषी कर्ज सहज सुलभतेने त्यांच्या मागणी नुसार वेळेत उपलब्ध होण्यासाठी त्यांना प्रशिक्षीत स्वयंसेवकाची मदत / सहाय्य देणे गरजेचे आहे . ही बाब लक्षात घेउन कृषी कर्ज मित्र यांच्या मदतीने गरजू पात्र शेतकऱ्यांस ज्या बाबीसाठीचे कर्ज आवश्यक आहे , अशी प्रकरणे कृषी कर्ज मित्र यांच्या सहाय्याने तयार केल्यास शेतकऱ्यांस वेळेत कर्ज उपलब्ध होईल .

प्रति प्रकरण सेवाशुल्काचा दर :

अ ) अल्प मुदतीचे कर्ज : १. प्रथमतः पीक कर्ज घेणारा शेतकरी : – प्रति प्रकरण सेवाशुल्क रुपये १५० /

ब ) मध्यम व दिर्घमुदतीचे कर्ज : १. नविन कर्ज प्रकरण : – प्रति प्रकरण सेवाशुल्क रूपये २५० / २. कर्ज प्रकरणाचे नुतनीकरण : – प्रति प्रकरण सेवाशुल्क रूपये २०० /

 

कृषी कर्ज मित्र नोंदणी :

अ ) कृषी कर्ज मित्र म्हणून सेवा देऊ इच्छिणाऱ्या व्यक्तीने जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर नोंदणी करावी .

ब ) नोंदणी झालेल्या इच्छूक व्यक्तींची यादी तयार करून त्यास कृषी समितीची मान्यता घेण्यात येईल ..

क ) जिल्हा परिषदेकडील कृषी समितीस अंतिम निवडीचे अधिकार राहतील . कृषी कर्ज मित्राने ज्या शेतकऱ्यांना कृषी कर्जाची आवश्यकता आहे . त्यांना भेटी देऊन कर्ज प्रकरणाच्या कार्यपध्दतीची सविस्तर माहिती द्यावी . कृषी कर्ज मित्र कृषी कर्जासाठी आवश्यक असणारी कागदपत्रे गोळा करून शेतकऱ्यांच्या संगतीने कर्ज प्रकरण तयार करून मंजूरीसाठी बँकेमध्ये सादर करेल . कृषी कर्ज मित्र हा बँक व शेतकरी यांच्यामधील मध्यस्थाच्या भूमिकेऐवजी सहायक व सल्लागाराची भूमिका बजावेल . कृषी कर्ज मित्राने पारदर्शी व प्रामाणिकपणे शेतकऱ्यांस सहाय्य व सल्ला देणे या विषयीचे बंधपत्र देणे आवश्यक आहे .

 

error: Content is protected !!
Scroll to Top