You are currently viewing गडचिरोली जिल्हा पोलीस शिपाई भरती सन -२०२२ जाहिरात
गडचिरोली जिल्हा पोलीस शिपाई भरती सन -२०२२ जाहिरात

गडचिरोली जिल्हा पोलीस शिपाई भरती सन -२०२२ जाहिरात

गडचिरोली जिल्हा पोलीस शिपाई भरती सन -२०२२ जाहिरात महाराष्ट्र पोलीस शिपाई रिक्त असलेली १३६ पदे भरण्याकरीता , पोलीस शिपाई पदाची भरती आयोजित करण्यात येत आहे . पोलीस भरती करीता प्रमाणीत बिंदुनामावलीनुसार खालील प्रमाणे पदे उपलब्ध आहेत . त्याकरीता केवळ गडचिरोली जिल्हयातील रहिवासी आवेदन अर्ज करु शकतात . तसेच हे उमेदवार नियुक्ती झाल्यानंतर आंतरजिल्हा बदली साठी पात्र असणार नाहीत .

जाहिरात क्रमांक : -पोअग / प्रलि / पो.भ .२०१ ९ / २०२२

पोलीस शिपाई : पदसंख्या

गडचिरोली जिल्हा पोलीस शिपाई भरती सन -२०२२ जाहिरात
गडचिरोली जिल्हा पोलीस शिपाई भरती सन -२०२२ जाहिरात

अर्ज उपलब्ध होणाचे व स्विकारण्याचे ठिकाण

गडचिरोली जिल्हयातील प्रत्येक उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय , पोलीस स्टेशन , उपपोलीस स्टेशन , पोलीस मदत केंद्र तसेच पोलीस मुख्यालय , गडचिरोली व पोलीस उपमुख्यालय प्राणहिता येथे अर्ज मिळतील तसेच पोलीस अधीक्षक , गडचिरोली यांचे संकेतस्थळावरुन ( www.gadchirolipolice.gov. in व www.mahapolice.gov.in ) आवेदन अर्ज डाउनलोड करता येईल . आवेदन अर्ज दिनांक २१/०५/२०२२ पासुन उपलब्ध होतील .

अर्ज देण्याची शेवट तारीख गडचिरोली जिल्हा पोलीस शिपाई भरती सन -२०२२ जाहिरात

तसेच दिनांक ०५/०६/२०२२ चे १८.०० वाजेपर्यंत गडचिरोली जिल्हयातील प्रत्येक उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय , पोलीस स्टेशन , उपपोलीस स्टेशन , पोलीस मदत केंद्र तसेच पोलीस मुख्यालय , गडचिरोली व पोलीस उपमुख्यालय येथे आवश्यक फी भरुन स्विकारण्यात येतील .

पोलीस शिपाई या पदावरील निवडीसाठी शैक्षणिक व शारिरीक पात्रता

शैक्षणिक पात्रता – १२ वी उत्तीर्ण

शारीरिक पात्रता

पोलीस शिपाई या पदावरील निवडीसाठी शैक्षणिक व शारिरीक पात्रता
शारीरिक पात्रता

वयोमर्यादा- १. खुला १८ वर्ष कमाल वयोमर्यादा २८ वर्ष २ . मागास प्रवर्ग १८ वर्ष ३३

पोलीस भरती गडचिरोली लेखी परीक्षा स्वरूप

  • कालावधी ९ ० मिनिटांचा असेल
  • मराठी भाषेत घेण्यात येईल
  • सर्व प्रश्न बहुपर्यायी स्वरुपाचे राहतील
  • चुकीच्या उत्तरास गुण कपात करण्यात येणार नाहीत . ( Negative Mark सिस्टीम असणार नाहीत . )
  • परीक्षेचे स्वरुप व अभ्यासक्रम : मराठी व्याकरण,बुध्दीमत्ता, अंक गणित,सामान्य ज्ञान व चालू घडामोडी
पोलीस भरती गडचिरोली लेखी परीक्षा स्वरूप
पोलीस भरती गडचिरोली लेखी परीक्षा स्वरूप

पोलीस शिपाई अर्ज फी

राखीव उमेदवार – ३५० , खुला प्रवर्ग – ४५०

आवश्यक कागदपत्रे पोलीस भरती साठी

खालील नमुद केल्यानुसार प्रमाणपत्रे व साक्षांकित केलेल्या प्रमाणपत्रांच्या प्रती कागदपत्र पडताळणीच्या वेळी उमेदवारांनी सादर करणे आवश्यक राहील .

  • शाळा सोडल्याचा दाखला / १० वी चे प्रमाणपत्र जन्म दाखला .
  • १२ वी शैक्षणिक पात्रतेचे प्रमाणपत्र गुणपत्रक .
  • अधिवास ( डोमेसाईल ) प्रमाणपत्र .
  • संबंधित जात प्रवर्गाचा दावा करणाऱ्या उमेदवारांनी संबंधित प्रवर्गाचे विधीग्राह्य जात प्रमाणपत्र
  • उन्नत व प्रगत गटात ( नॉन क्रिमिलेयर ) मोडत नसल्याबाबतचे प्रमाणपत्र ( अ.जा. / अ.ज . वगळून ) .
  • आधारकार्ड ( ऐच्छीक ) .
  • छायाचित्र ( फोटो ) – ५

पोलीस भरती गडचिरोली अधिकृत website

पोलीस शिपाई गडचिरोली जाहिरात PDF