परदेशात शिक्षण घेण्यासाठी शिष्यवृत्तीसाठी अर्ज (MAHAJYOTI)- राज्यातील विजाभज, इमाव व विमाप्र या प्रवर्गातील गुणवंत मुलामुलींना परदेशात शिक्षण घेण्यासाठी सन २०२२-२३ या आर्थिक वर्षामध्ये महाराष्ट्र शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागाकडून २३ जून २०२२ पर्यंत परदेश शिष्यवृत्तीसाठी अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुकांनी विहीत वेळेत अर्ज करावेत, असे आवाहन इतर मागास बहुजन कल्याण संचालनालयाचे संचालक डी.डी.डोके यांनी केले आहे.
महाराष्ट्र शासन इतर मागास बहुजन कल्याण संचालनालय , ३ चर्चपथ , महाराष्ट्रराज्य , पुणे १ . यांच्या मार्फत सन २०२२-२३ या आर्थिक वर्षामध्ये विजाभज , इमाव व विमाप्र प्रवर्गातील गुणवंत मुलामुलींना परदेशात उच्च शिक्षण घेण्यासाठी परदेश शिष्यवृत्ती.
परदेशामध्ये उच्च शिक्षणासाठी प्रवेश मिळालेल्या महाराष्ट्रातील विजाभज , इमाव व विमाप्र प्रवर्गातील गुणवंत मुलामुलींना परदेशात शिक्षण घेण्यासाठी शिष्यवृत्ती सन २०२२-२३ या आर्थिकवर्षामध्ये निवडीसाठी महाराष्ट्र शासनाच्या विजाभज , इमाव व विमाप्र विभागाकडून अर्ज मागविण्यात येत आहे .
परदेश शिष्यवृत्तीसाठी लाभाचे स्वरुप अटी व शर्ती
पात्रता
- विद्यार्थी महाराष्ट्राचे रहिवासी असावेत .
- परदेशात शिक्षणासाठी प्रवेश मिळालेला असणे
- विद्यार्थ्यांच्या पालकांचे / कुटूंबातील सर्व सदस्यांचे एकत्रित सर्व मार्गांनी मिळणारे वार्षिक उत्पन्न रु .८.०० लाखापेक्षा जास्त नसावे .
- विद्यार्थ्यांने प्रवेश घेतलेली परदेशातील शिक्षण संस्था ही जागतिक क्रमवारीत THE ( Time Higher Education ) / आणि QS World University Ranking २०० च्या आतील असावी .
- अन्य अटी व शर्ती हया सविस्तर जाहिराती मध्ये तसेच विजाभज , इमाव व विमाप्र कल्याण विभाग , शासन निर्णय दिनांक ११ ऑक्टोबर २०१८ मध्ये नमूद केल्याप्रमाणे लागू राहतील .
लाभाचे स्वरुप
- विद्यापीठाने प्रमाणित केलेल्या शिक्षण शुल्काची पूर्ण रक्कम .
- विद्यापीठाच्या निकषानुसार वैयक्तिक आरोग्य विमा खर्च .
- विद्यार्थ्यास वार्षिक निर्वाह भत्ता परदेशातील संबंधित शैक्षणिक संस्थेने ठरवून दिलेल्या अथवा भारत सरकारच्या DCPT विभागाने ठरवून दिलेल्या दराप्रामाणे अथवा महाराष्ट्र शासनाने वेळोवेळी जाहिर करेल . ती रक्क्म निर्वाह भत्ता म्हाणून अनुज्ञेय असेल .
- विद्यार्थ्यांना परदेशात जाताना व अभ्यासक्रम यशस्वीरित्या पूर्ण केल्यानंतर परत येताना विमान खर्च अनुज्ञेय असेल .
अर्ज देण्याचे ठिकाण
- अर्ज संचालक , इतर मागास बहुजन कल्याण संचालनालय , महाराष्ट्रा राज्या पुणे -१ यांचेकडे दि . २३/६ / २०२२ रोजी सायं ६.१५ पर्यंत जमा करावा .
जाहिरात पत्रक येथे पहा PDF