You are currently viewing प्रेरणा को.ऑप.बैंक लिमिटेड विविध पदांची भर्ती २०२२

प्रेरणा को.ऑप.बैंक लिमिटेड विविध पदांची भर्ती २०२२

  • Post category:Home

Prerna Co-op Bank Ltd. Recruitment for various posts 2022

प्रेरणा को ऑप बैंक बद्दल-संपूर्ण महाराष्ट्र राज्य कार्यक्षेत्र व ₹ ६०० कोटी + व्यवसाय असलेल्या व संपूर्ण Core Banking Solution वापरत असलेल्या बँकेस खालील निरनिराळ्या वरिष्ठ पदासाठी पात्र उमेदवारांची निवड करावयाची आहे .

रिक्त पदांची माहिती 

१) जनरल मॅनेजर ( General Manager)

कामाचे स्वरूप : मुख्य कार्यालयातील सर्व विभागांचे कामकाज पहाणे , नियंत्रण ठेवणे व बँकेच्या प्रगतीसाठी वेगवेगळ्या योजना तयार करणे . रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया व सहकार खात्यासंबंधीत सर्व कामकाजावर नियंत्रण ठेवणे .

शिक्षण : पदवीधर / पदव्युत्तर , संगणक ज्ञान आवश्यक , JAIIB / CAIIB असल्यास प्राधान्य

वयोमर्यादा- अधिकतम ५० वर्ष शिथीलक्षम

अनुभव : बँकेमधील वरिष्ठ अधिकारी पदाचा किमान १० वर्षांचा अनुभव ( सहकारी बँकेतील अनुभव असल्यास प्राधान्य )

२) असिस्टंट जनरल मॅनेजर ( Asst . General Manager )

कामाचे स्वरूप – मुख्य कार्यालयातील कोणत्याही एका किंवा अनेक विभागाचे कामकाज स्वतंत्रपणे सांभाळणे . किंवा बँकेची व्यवसायाने मोठी असलेली शाखा स्वतंत्रपणे शाखा व्यवस्थापक म्हणुन सांभाळणे .

शिक्षण : पदवीधर / पदव्युत्तर , संगणक ज्ञान आवश्यक JAIIB / CAIIB असल्यास प्राधान्य .

वयोमर्यादा -अधिकतम ४५ वर्ष शिथीलक्षम

अनुभव- तत्सम पदावरील स्वतंत्रपणे काम करण्याचा किमान ५ वर्षाचा अनुभव  

३) मॅनेजर ( Manager )

कामाचे स्वरूप-स्वतंत्रपणे शाखा व्यवस्थापक किंवा मोठ्या शाखेत अधिकारी किंवा मुख्य कार्यालयात कोणत्याही विभागात काम करण्याची तयारी व क्षमता असावी .

शिक्षण : पदवीधर / पदव्युत्तर , संगणक ज्ञान आवश्यक , JAIIB / CAIIB असल्यास प्राधान्य

वयोमर्यादा – ४० पर्यंत शिथीलक्षम

अनुभव – बँकेमधील शाखा व्यवस्थापक किंवा अधिकारी पदाचा किमान ५ वर्षांचा अनुभव , * सहकारी बँकांमध्ये शाखा व्यवस्थापक म्हणून काम केलेल्या व नुकतेच निवृत्त झालेल्या उमेदवारांचा सुद्धा विचार केला जाईल .

४) असि . मॅनेजर आय टी ( Asst . Manager IT )

कामाचे स्वरुप : बँकेच्या निरनिराळ्या DELIVERY CHANNELS ची अंमलबजावणी , नियंत्रण व प्रसार करणे . SQL , JAVA & TOMCAT वर काम करावे लागेल .

शिक्षण : पदवीधर / पदव्युत्तर , संगणक क्षेत्रातील पदवी / पदविका

वयोमर्यादा -अधिकतम ४० वर्षे शिथीलक्षम

अनुभव : बँकेमधील आय टी विभागात काम केल्याचा किमान ५ वर्षाचा अनुभव . ATM , IMPS & UPI वर काम केल्याचा अनुभव असल्यास प्राधान्य .

५) मार्केटींग मॅनेजर ( Marketing Manager )

कामाचे स्वरूप : स्वतंत्रपणे बँकेतील मार्केटींग विभागाचे काम सांभाळणे , व्यवसाय वाढीसाठी नवनवीन योजना तयार करणे , दिलेल्या उद्दीष्ट पुर्तीसाठी प्रयत्नशील रहाणे , दिलेल्या मार्केटींग विभागातील / शाखांतील सेवकांकडुन काम करुन घेणे , बँकेच्या IMAGE BUILDING साठी निरनिराळे प्रस्ताव तयार करणे , त्याची अंमलबजावणी करणे तसेच नियंत्रण ठेवणे व व्यवसाय वाढीसाठी प्रयत्न करणे .

शिक्षण- पदवीधर / पदव्युत्तर , संगणक ज्ञान आवश्यक

वयोमर्यादा : वय वर्षे ४० पर्यंत शिथीलक्षम

अनुभव- मार्केटींग विभागात काम केल्याचा किमान ५ वर्षांचा अनुभव बँकेच्या मार्केटींग विभागात काम केले असल्यास प्राधान्य .

६) मार्केटींग असि . मॅनेजर ( Marketing Asst . Manager )

कामाचे स्वरूप : मार्केटींग विभागप्रमुख यांनी दिलेल्या सुचना नुसार दिलेल्या सेवकांकडुन / शाखांतील सेवकांकडुन काम करून घेणे , व्यवसाय वाढीसाठी नवनवीन योजना तयार करणे , दिलेल्या उद्दीष्ट पुर्तीसाठी प्रयत्नशील रहाणे , • मार्केटींग विभाग प्रमुख यांच्या सुचनेनुसार कामकाज करणे , त्यांना सहाय्य करणे आवश्यकतेनुसार शाखांमध्ये मार्केटींग / बँकींग कामकाज पाहणे .

७) मार्केटींग मॅनेजर ( Marketing Manager )

कामाचे स्वरूप : स्वतंत्रपणे बँकेतील मार्केटींग विभागाचे काम सांभाळणे , व्यवसाय वाढीसाठी नवनवीन योजना तयार करणे , दिलेल्या उद्दीष्ट पुर्तीसाठी प्रयत्नशील रहाणे , दिलेल्या मार्केटींग विभागातील / शाखांतील सेवकांकडुन काम करुन घेणे , बँकेच्या IMAGE BUILDING साठी निरनिराळे प्रस्ताव तयार करणे , त्याची अंमलबजावणी करणे तसेच नियंत्रण ठेवणे व व्यवसाय वाढीसाठी प्रयत्न करणे .

शिक्षण : पदवीधर / पदव्युत्तर , संगणक ज्ञान आवश्यक

वयोमर्यादा : वय वर्षे ४० पर्यंत शिथीलक्षम

अनुभव -मार्केटींग विभागात काम केल्याचा किमान ५ वर्षांचा अनुभव बँकेच्या मार्केटींग विभागात काम केले असल्यास प्राधान्य .

८) मार्केटींग असिस्टंट ( Marketing Assistant )

कामाचे स्वरुप : प्रत्यक्ष मार्केटमध्ये जावून नवनवीन ग्राहक मिळविणे , बचत , चालु व मुदत ठेव खाती उघडणेसाठी जास्तीत जास्त प्रयत्नशील रहाणे . दिलेल्या उद्दीष्टानुसार व्यवसाय वाढविणे . मार्केटींग विभागप्रमुख यांच्या सुचनेनुसार कामकाज करणे आवश्यकतेनुसार शाखेमध्ये कौंटरवर / मार्केटींग काम करण्याची तयारी असावी .

शिक्षण : पदवीधर / पदव्युत्तर , संगणक ज्ञान आवश्यक

वयोमर्यादा : वय वर्षे ३० पर्यंत शिथीलक्षम

अनुभव : मार्केटींग विभागात काम केल्याचा किमान १ वर्षांचा अनुभव , बँकेच्या मार्केटींग विभागात काम केले असल्यास प्राधान्य . सहकारी बँकेत काम केले असल्यास विशेष प्राधान्य .

अर्ज करण्याची पद्धत

१ ) अर्ज व स्वतःचा बायोडेटा , पासपोर्ट साईज आकाराचा फोटो बँकेच्या मुख्य कार्यालयास पोस्टाने / कुरिअरने बंद पाकिटामध्ये पाठवावेत . बायोडेटामध्ये ई – मेल व मोबाईल क्रमांक नमूद असावा . तसेच बायोडेटामध्ये व लिफाफ्यावर कोणत्या पदासाठी अर्ज याचा उल्लेख करावा .

२ ) ई – मेल व्दारे पाठविलेले अर्ज स्विकारले जातील . ( Email Id careers@preranabank.com ) ई – मेलमध्ये कोणत्या पदासाठी अर्ज आहे याचा स्पष्ठ उल्लेख करावा .

३ ) निकष पूर्ण न करणाऱ्या उमेदवारांनी अर्ज पाठवू नयेत .

४ ) या संबंधीचा पुढील सर्व संपर्क व सुचना उमेदवाराच्या ई – मेल / मोबाईलवर पाठविल्या जातील .

५ ) या संदर्भात अन्य कोणत्याही खुलाशासाठी बँकेच्या कामकाजाच्या दिवशी सकाळी १० ते संध्याकाळी ६ या वेळेत मोबाईल क्र . ७७२१ ९ ०० ९ ०० किंवा ९ ०७५०२८०२२ वर संपर्क करावा .

अर्ज करण्याची शेवटची तारीख 

६ ) दि . २२/०३/२०२२ रोजी दै . सकाळ मध्ये जाहिरात प्रसिद्ध झाले पासुन १५ दिवसाच्या आत आपले अर्ज पाठवावेत .

बँकेची अधिकृत वेबसाइट पहा

Prerana Co-Operative Bank bharti PDF

Download