You are currently viewing बृहन्मुंबई महानगरपालिका:डेटा एंट्री ऑपरेटर पदांची भर्ती

बृहन्मुंबई महानगरपालिका:डेटा एंट्री ऑपरेटर पदांची भर्ती

  • Post category:Home

बृहन्मुंबई महानगरपालिका: बा.य.ल. नायर रुग्णालय व नायर रुग्णालय व टोपीवाला राष्ट्रीय वैद्यकीय महाविद्यालयात HMIS प्रणालीसाठी 15 डेटा एन्ट्री ऑपरेटर या संवर्गाची पदे कंत्राटी तत्वावर भरण्यासाठी जाहिरात. टंकलेखन व 12 वी पास साठी चांगली संधि आहे, सर्व माहीती पुढील प्रमाणे आहे

BMC Mumbai municipal corporation recruitment
BMC MUMBAI

डेटा एन्ट्री ऑपरेटर या संवर्गातील रिक्त पदे माहिती

  • शैक्षणिक अर्हता-( अ ) उमेदवार महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची शालांत परीक्षा व तत्सम परीक्षा किमान 50 गुणांची प्रश्नपत्रिका असलेला मराठी विषय घेऊन उत्तीर्ण झालेला असावा . ( ब ) संगणकाचे ज्ञान इंग्रजी व मराठी टंकलेखनाची प्रत्येकी किमान 30 शब्द प्रति मिनिट वेग आवश्यक MSCIT प्राधान्य
  • रिक्त पदे: एकूण 15
  • वयोमर्यादा:उमेदवाराचे वय 18 वर्षापेक्षा कमी व 33 वर्षांपेक्षा जास्त असता कामा नये .

वेतनश्रेणी निश्चित वेतन दरमहा:

रु .15,000 / – निश्चित ( कोणताही भत्ता अनुज्ञेय नाही . )

निवडीची निकष

निवडीचे निकष प्राप्त झालेल्या उमेदवारांच्या अर्जाची छाननी करुन निवड यादी प्रसारीत करण्यात येईल व निवड यादीतील उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलवण्यात येईल . तसेच मुलाखतीमध्ये उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांचीच निवड करण्यात येईल .

सर्वसाधारण अटी :

  • 1 ) पत्रव्यवहाराचा पत्ता सुस्पष्ट व व्यवस्थित असावा .
  • 2 ) उमेदवारांनी अर्जासोबत शैक्षणिक अर्हता / व्यावसायिक अर्हता / संबंधित गुणपत्रिका सांक्षांकित छायाप्रत जोडावी .
  • 3 ) निवड झालेल्या उमेदवाराने रुपये 100 / – च्या मुद्रांक शुल्कावर बंधपत्र नियुक्तीच्या अगोदर देणे आवश्यक आहे .
  • 4 ) कंत्राटी पध्दतीने नियुक्त कर्मचा – यांना नियमित पदांकरीता असणारे कुठलेही फायदे मिळणार नाहीत . तसेच आवश्यकता नसल्यास त्यांची नियुक्ती कोणत्याही क्षणी संपुष्टात येईल .
  • 5 ) पोस्टाच्या विलंबामुळे कोणतीही माहिती प्राप्त होण्यास किंवा कळविण्यास विलंब झाला तर त्याची जबाबदारी बृहन्मुंबई महानगरपालिकेवर राहणार नाही . उमेदवारांना मुलाखतीसाठी नियोजित स्थळी स्वखर्चाने उपस्थित रहावे लागेल .
  • 6 ) 7 ) निवड प्रक्रियेच्या कालावधीत अथवा नियुक्तीनंतर कोणत्याही क्षणी उमेदवाराने चुकीची माहिती / प्रमाणपत्रे / कागदपत्रे सादर केल्याचे किंवा कोणतीही माहिती दडवून ठेवल्याचे निदर्शनास आल्या त्यांची उमेदवारी रद्दबातल करण्यात येईल . तसेच नियुक्ती झाली असल्यास कोणतीही पूर्वसूचना न देता त्यांची नियुक्ती समाप्त करण्यात येईल .
  • 8 ) प्रशासकीय किंवा अन्य कारणास्तव निवड प्रक्रिया कोणत्याही वेळेस कोणत्याही टप्प्यावर थांबविण्याचे अधिकार अधिष्ठाता , बा.य.ल. नायर रुग्णालय व टो . रा . वैद्यकीय महाविद्यालय यांना आहेत .
  • 9 ) निवड झालेल्या उमेदवारांना तिनही पाळीत काम करणे बंधनकारक आहे .

उमेदवाराने अर्ज

बा . य . ल . नायर धर्मा रुग्णालय , डॉ . ए . एल . नायर रोड , मुंबई सेंट्रल , मुंबई 400008 यांच्या कार्यालयात दि .22.12.2021 पर्यंत अथवा तत्पूर्वी दुपार ठिक 4:00 वा . सर्व शनिवार , रविवार आणि सर्व सार्वजनिक सुट्टया वगळून सादर करावेत .

आवश्यक कागदपत्रे खालील प्रमाणे

  • अर्जावर अलिकडेच काढलेल्या पासपोर्ट आकाराचे छायाचित्र चिकटवावे .
  • अर्जावर संपूर्ण माहिती न भरल्यास तसेच संबंधित प्रमाणपत्र अर्जासोबत न जोडल्यास अशा अर्जांचा निवड यादीत समावेश केला जाणार नाही .

जाहीरात येथे पहा

Mumbai municipal corporation Website

Pimpari Chinchwad Municipal corporation bharti (PCMC RECRUITMENT) 2021 Click here