भूमी अभिलेख विभाग सरळसेवा भरती 2021 परीक्षा

भूमी अभिलेख विभाग सरळसेवा भरती 2021 परीक्षा
भूमी अभिलेख विभाग सरळसेवा भरती 2021 परीक्षा

भूमी अभिलेख विभाग सरळसेवा भरती 2021– छाननी अर्ज प्रक्रियेनुसार विहित अर्हता धारण करीत नसल्याने अपात्र ठरविलेल्या उमेदवारांची यादी.

परीक्षा साठी अपात्र उमेदवार भूमी अभिलेख परीक्षा अपात्र उमेदवार यादी येथे पहा

भूमी अभिलेख विभाग परीक्षा वेळापत्रक

छाननी अर्ज प्रक्रियेमध्ये उमेदवार यांनी अपलोड केलेल्या सर्व प्रमाणपत्रांची तपासणी करण्यात येवून भूमि अभिलेख विभागातील गट क पदांच्या सेवाप्रवेश नियमांनुसार जाहीरातीत नमूद केलेल्या अर्हते ऐवजी इतर अर्हतेबाबत प्रमाणपत्रे अपलोड केलेली आहेत, अशा उमेदवारांना अपात्र ठरवून संपुर्ण प्रक्रिये अंती पात्र ठरलेल्या उमेदवारांची ऑनलाईन परीक्षा (Computer Based Test) दिनांक २८/११/२०२२ ते ३०/११/२०२२ या कालावधीत IBPS कंपनीमार्फत महाराष्ट्रातील विविध केंद्रांवर घेण्यात येणार आहे. परीक्षेबाबत संभाव्य वेळापत्रक खालील प्रमाणे असेल.

भूमी अभिलेख विभाग सरळसेवा भरती 2021 परीक्षा

परीक्षेचे विभागनिहाय वेळापत्रक व उमेदवारांचे परीक्षेचे प्रवेशपत्राबाबत विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर ( https://mahabhumi.gov.in ) लिंक उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. पात्र उमेदवाराने संबंधीत संकेतस्थळावर देण्यात आलेल्या सुचनांनुसार प्रवेशपत्र डाऊनलोड करुन घेण्याचे असून प्रवेशपत्रावर नमुद परीक्षा केंद्रावर उमेदवाराने दिलेल्या वेळेत उपस्थित राहून परीक्षा द्यावयाची आहे. सामान्य प्रशासन विभागाकडील दिनांक ०४/०५/२०२२ रोजीच्या शासन निर्णयानुसार ऑनलाईन पद्धतीने (Computer Based Test) परीक्षेचे आयोजन करण्यात येणार असल्यामुळे उमेदवाराचे परीक्षा केंद्र हे महाराष्ट्र राज्यातील कोणत्याही जिल्हा, तालुका अथवा इतर ठिकाणी असू शकते.परीक्षा पद्धतीबाबतची सविस्तर माहिती पुस्तिका विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल.


Land Records Recruitment 2021