शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालय GOVERNMENT DENTAL COLLEGE AND HOSPITAL पदविका अभ्यासक्रम – शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालय , मुंबईमार्फत कळविण्यात येते की , शैक्षणिक वर्ष २०२२-२३ करिता भारतीय दंत परिषदेमार्फत मान्यता प्राप्त खालील नमूद पदविका अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी अर्ज मागविण्यात येत आहे .
खालील अभ्यासक्र्मासाठी प्रवेश सुरु आहे
१ ) पदविका अभ्यासक्रम दंतआरोग्यक Diploma Course in Dental Hygienist कालावधी २ वर्ष .
२ ) पदविका अभ्यासक्रम दंततंत्रज्ञ Diploma Course in Dental Mechanic कालावधी २ वर्ष .
अर्ज मिळण्याचे ठिकाण
प्रवेश अर्जाचा विहित नमुना या महाविद्यालये www.gdchmumbai.org संकेतस्थळवर उपलब्ध आहे .
अभ्यासक्रम कालावधी
या दोन्ही पदविका अभ्यासक्रमाचा कालावधी भारतीय दंत परिषदेन दिलेल्या मानकानुसार २ वर्षाचा राहील .
अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख
वरील दोन्ही पदविका अभ्यासक्रमांचे अर्ज दिनांक २०/०६/२०२२ ते दिनांक ०७/०७/२०२२ सायंकाळी ०५.०० वाजेपर्यंत
अर्ज पाठवण्याचे ठिकाण
अधिष्ठाता , शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालय , सेंट जॉर्जेस रुग्णालय आवार , पी . डीमेलो रोड , छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस शेजारी , मुंबई- ४००००१ या कार्यालयास व्यक्तिशः अथवा टपालाने अंतिम दिनांक ०७.०७.२०२२ सायंकाळी ०५.०० वाजेपर्यंत देण्यात यावेत .
शैक्षणिक अर्हता
उमेदवारांनी बारावी उच्च माध्यमिक शिक्षण प्रमाणपत्र विज्ञान शाखा अथवा तत्सम परीक्षा , महाराष्ट्रातील संस्थेतून भौतिकशास्त्र , रसायनशास्त्र , जीवशास्त्र ( PCB ) व इंग्रजी विषय घेऊन उत्तीर्ण होणे बंधनकारक आहे .
प्रवेशासाठी वय मर्यादा
ब ) वयोमर्यादा प्रवेश घेतेवेळी उमेदवाराचे वय कमीत कमी १७ वर्ष किंवा पुढील ३ महिन्यात १७ वर्षे पूर्ण होणे बंधनकारक आहे .
सोबत जोडावयाची प्रमाणपत्राची यादी :
प्रवेश अर्ज भरणाऱ्या विद्यार्थ्यांनी खालील नमूद अत्यावश्यक मूळ प्रमाणपत्राच्या छायाप्रति स्वयं साक्षांकित करून व्यक्तिशः किंवा टपालाने ( प्रति , अतिष्ठाता , शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालय , सेंट जॉर्जेस रुग्णालय आवार , पी . डीमेलो रोड , छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसशेजारी , मुंबई – ४००००१ ) या पत्त्यावर दिनांक ०७/०७/२०२२ रोजी किंवा त्यापूर्वी सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत कार्यालयात प्राप्त होणे बंधनकारक राहील .
१ ) महाविद्यालय सोडल्याचा दाख
२ ) १० वी उत्तीर्ण गुणपत्रिका व बोर्डा १२ वी विज्ञान परीक्षेची
३ ) १०वी गुणपत्रक बोर्डाचे प्रमाणपत्र
४ ) १२ वी परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी लागलेले प्रयत्न प्रमाणपत्र ( Attempt Certificate )
५ ) शारीरिकदृष्ट्या सक्षम असल्याबाबत वैद्यकीय प्रमाणपत्र
६ ) जात किंवा जात वैधता प्रमाणपत्र ( मागासवर्गीय विद्यार्थ्यांकरिता )
७ ) उन्नत व प्रगत गटात मोडत नसल्याबाबतचे सक्षम प्राधिकाऱ्याचे चालू आर्थिक वर्ष २०२२-२०२३ ) प्रमाणपत्र आवश्यक आहे . ( इ.मा.व. , वि.ज. ( अ ) , भ.ज. ( ब.क.ड. )
८ ) महाराष्ट्रात राहत असल्याचे अधिवास प्रमाणपत्र व राष्ट्रीयत्वाचा दाखला
९ ) जे विद्यार्थी बारावी ( १० + २ ) अथवा तत्सम परीक्षा ( विज्ञान शाखा ) उत्तीर्ण झाल्यानंतर काही वर्षाच्या कालावधीनंतर अर्ज करीत असतील अशा विद्याथ्र्यांना हमीपत्र ( Gap Affidavit ) देणे आवश्यक आहे .
अभ्यासक्रमाची फी शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालय GOVERNMENT DENTAL COLLEGE AND HOSPITAL पदविका अभ्यासक्रम
शैक्षणिक शुल्कात बदल करण्याची बाब शासन स्तरावर विचाराधीन असून त्यात बदल झाल्यास तो प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांवर बंधनकारक राहील .
महत्वाच्या लिंक पहा
जाहिरात पहा |
website – http://www.gdchmumbai.org/ |