मुदतवाढ आनंदाची बातमी!! ‘आरोग्य विभाग भरती गट-क व ड’ अर्ज करण्यास मुदतवाढ मिळाली.

arogya vibhag group d c answer key 2023 download date

Arogy vibhag form date extended 2023

अर्ज सादर करण्यास मुदतवाढ देण्याबाबत जाहीर प्रकटन- सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत गट क व गट ड संवर्गातील रिक्त पदे भरण्याबाबत दिनांक २९.८.२०२३ रोजी पासून उमेदवारांची नोंदणी व ऑनलाईन अर्ज स्वीकृतीची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे. जाहिरातीत नमुद केल्यानुसार ऑनलाईन अर्ज सादर करण्याकामी व ऑनलाईन शुल्क भरण्याकामी दिनांक १८.९.२०२३ रोजी २३.५५ वा. पर्यंत मुदत देण्यात आलेली होती.

तथापि दुर्गम भागातील व इतर उमेदवारांना ऑनलाईन अर्ज सादर करण्यास अडचणी निर्माण होत असल्याचे निर्देशनास आले आहे. त्यामुळे सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत गट क व गट ड संवर्गातील भरतीकामी सर्व प्रकारच्या उमेदवारांसाठी ऑनलाईन अर्ज सादर करण्याकामी व ऑनलाईन शुल्क जमा करण्याकामी पुढील प्रमाणे मुदतवाढ देण्यात येत आहे.अर्ज सादर करण्याचा कालावधी

दि. १९.९.२०२३ रोजी पासून ते दि.२२.९.२०२३ रोजी रात्री ११.५५ वाजेपर्यंत

यापुर्वी दिनांक २९.८.२०२३ ते दिनांक १८.९.२०२३ पर्यंत अर्ज सादर केलेल्या उमेदवारांनी पुन्हा अर्ज करण्याची आवश्यकता नाही. तसेच वरीलप्रमाणे मुदतवाढ ही अंतिम असून यानंतर कोणत्याही परिस्थितीत मुदतवाढ देण्यात येणार नाही.

आरोग्य विभाग भरती अर्ज करण्यासाठी लिंक

error: Content is protected !!
Scroll to Top