Latur Zilha Parishad NHM Arogya Vibhag Bharti 2024
आरोग्य विभाग ZP मध्ये विविध पदांची जाहिरात प्रसिद्ध । Arogya Vibhag Zilha Parishad Bharti 2024- जिल्हा परिषद पदभरती 2024 आरोग्य विभाग अंतर्गत विविध पदांची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. ही भरती राष्ट्रीय आरोग्य अभियान, जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी, लातूर आरोग्य विभाग जिल्हा परिषद लातूर यांच्यामार्फत केली जात आहे. यामध्ये स्टाफ नर्स आणि बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी आरोग्य सेवक या पदांचा समावेश आहे. यामध्ये तुम्ही डिप्लोमा, बारावी सायन्स असेल तर अर्ज करू शकतात. एकूण 60 पेक्षा जास्त पदांचा समावेश करण्यात आलेला आहे.
Arogya Vibhag Zilha Parishad Bharti 2024
अर्ज करण्याची शेवटची तारीख 5 जुलै 2024 असणार आहे. यामध्ये तुमची निवड प्रक्रिया, तुमच्या शेवटच्या वर्षाच्या मार्क नुसार केली जाणार आहे. अर्ज तुम्हाला ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे. अर्ज स्वीकारांचे ठिकाण – राष्ट्रीय आरोग्य अभियान, आरोग्य विभाग जिल्हा परिषद, लातूर हे असणार आहे. अर्ज करताना तुम्हाला अर्ज सोबत ऑनलाइन फीज एन एफ टी मार्फत भरायची आहे. आणि त्याची प्रिंट सोबत जोडायची, खुला प्रवर्ग 150 रुपये फीस आहे आणि राखीव प्रवर्ग १०० रुपये फीस ठेवण्यात आलेली आहे.
लातूर जिल्हा परिषद भरती प्रक्रिया
ही पदभरती होते त्याच्यासाठी नोकरीचे ठिकाण लातूर हे असणार आहे. या भरतीचे वेळापत्रक त्यांनी दिले आहे , जसं की पदभरती मध्ये आलेल्या अर्जाची छाननी 20 जुलैपर्यंत होईल. आणि छाननी करून झाल्यानंतर प्रारूप यादी 25 जुलैपर्यंत प्रसिद्ध केली जाईल. तर प्रारूप यादीवर काही आक्षेप असल्यास पुराव्यानिशी आक्षेप सादर करण्यासाठी 30 जुलैपर्यंत तारीख दिली जाईल. त्यानंतर मग सर्व आक्षेप निवारण झाल्यानंतर पात्र अपात्र उमेदवारांची यादी 8 ऑगस्ट 2024 पर्यंत जिल्हा परिषद च्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाईल. त्याच्यानंतर पुढे मग पुढची प्रक्रिया निवड प्रक्रिया जी माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांच्या तारखेनुसार केली जाईल. संपूर्ण सविस्तर जाहिरात पाहण्यासाठी आणि अर्ज ची लिंक खालील प्रमाणे दिलेली आहे.