barti online coaching 2022

बार्टी संस्थेमार्फत मोफत स्पर्धा परीक्षा क्लास व ६००० रु विद्यावेतन

barti online coaching 2022– डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी पुणे यांच्यामार्फत 2022 साठी बँक,रेल्वे ,एलआयसी इत्यादी व सरळ सेवेच्या बाकी स्पर्धा परीक्षेच्या पूर्वतयारी करिता अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांकडून निशुल्क निवासी प्रशिक्षण म्हणजेच मोफत कोचिंग साठी अर्ज मागवण्यात येत आहेत. त्याची माहिती खालील प्रमाणे तुम्हाला दिलेली आहे. प्रत्येक जिल्ह्यानुसार प्रशिक्षण संस्था व कोचिंग सेंटर असणार आहे, तुम्ही त्या जिल्ह्यामध्ये जाऊन ऑफलाईन अर्ज भरू शकता अर्ज नमुना शैक्षणिक पात्रता सर्व माहिती खालील प्रमाणे.

अर्ज barti online coaching 2022 करण्यासाठी पात्रता

 • महाराष्ट्र राज्याच्या अनुसूचित जातीमधील उमेदवार असावा
 • अर्जदाराचे वय 18 ते 34 वर्षापर्यंत
 • अर्जदार किमान बारावी उत्तीर्ण असावा

barti प्रशिक्षणा बद्दल माहिती

 • प्रशिक्षण केंद्राकडे अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख 20 जुलै २०२२
 • प्रशिक्षण कालावधी सहा महिन्याचा असेल
 • शिक्षण अर्ज दाखल केल्यानंतर उमेदवारांची चाळणी परीक्षा 31 जुलै २०२२ ला घेण्यात येईल
 • त्यानंतर उमेदवारांची गुणांक करणे कोचिंग साठी निवड करण्यात येईल
 • प्रशिक्षण कोचिंग क्लास 17 ऑगस्ट २०२२ पासून सुरू होईल
 • निवड झालेल्या विद्यार्थ्यांना 75 टक्के उपस्थिती असल्यास दरमहा ६००० रुपये विद्यावेतन देण्यात येईल त्याचबरोबर 5000 एवढ्या किमतीचे निशुल्क अभ्यास साहित्य व पुस्तकांचा संच बार्टी मार्फत देण्यात येणार आहे
 • सदर प्रशिक्षण कार्यक्रम महाराष्ट्रात ३० प्रशिक्षण केंद्रात जिल्ह्यात राबवण्यात येईल

अर्जासोबत जोडावयाची कागदपत्रे

 • पासपोर्ट आकाराचा फोटो
 • जातीच्या प्रमाणपत्राची साक्षांकित प्रत
 • बारावी उत्तीर्ण अथवा कोणत्याही शाखेचा पदवीधर असल्यास त्याची प्रमाणपत्राची प्रत
 • शाळा सोडल्याचा दाखला
 • आधार कार्ड
 • दिव्यांग असल्यास त्याचे प्रमाणपत्र
 • विद्यावेतन करिता चालू असलेले बचत खात्याची माहिती
barti online coaching 2022

अर्ज करण्यासाठी महत्वाच्या लिंक

जाहिरात येथे पहा

अर्ज नमुना पहा

website पहा

error: Content is protected !!