You are currently viewing लाडकी बहीण योजना साठी आनंदाची बातमी ! नवीन पोर्टल सुरु Ladki Bahin Yojana Online apply website
लाडकी बहीण योजना साठी आनंदाची बातमी ! नवीन पोर्टल सुरु Ladki Bahin Yojana Online apply website

लाडकी बहीण योजना साठी आनंदाची बातमी ! नवीन पोर्टल सुरु Ladki Bahin Yojana Online apply website

ladakibahin maharashtra gov in

लाडकी बहीण योजना साठी आनंदाची बातमी ! नवीन पोर्टल सुरु Ladki Bahin Yojana Online apply website – मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेसाठी नवीन पोर्टल (ladakibahin maharashtra gov in) तयार करण्यात आलेले आहे. या पोर्टलवर योजनेची माहिती देखील देण्यात आलेली आहे. ज्यामध्ये आवश्यक कागदपत्रे कोणती कोणती लागतील, त्यासोबत मुखपृष्ठावर तुम्हाला रोज किती अर्ज प्राप्त झालेत आणि किती अर्जंची पोर्टलवर मंजूर संख्या झालेली आहे आणि पोर्टलवर एकूण अर्जांची किती लाभार्थी संख्या झालेली आहे ती आकडेवारी सुद्धा दिसणार आहे.

Ladki Bahin Yojana Online apply website link

या वेबसाईट वरती अर्ज प्रक्रिया, अपात्रता ,पात्रता याबद्दलची सर्व माहिती दिलेली आहे. पुढील प्रमाणे वेबसाईटची लिंक दिलेली आहे. तिथून तुम्ही ऑनलाईन एप्लीकेशन करू शकतात.

तुम्हाला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी या पोर्टलवर ऑनलाईन अर्ज देखील करता येणार आहे. यासाठी सर्वात अगोदर अर्जदारांना त्यांचं नवीन खाते या वेबसाईट वरती तयार करावा लागणार आहे. नवीन खाते तयार करताना संपूर्ण माहिती भरावी लागणार आहे. आणि नवीन खाते तयार झाल्यानंतर तुमचा मोबाईल नंबर पासवर्ड टाकून तुमच्या आधार कार्डने तुम्हाला लॉगिन करावा लागणार आहे.

आधार कार्ड ला मोबाईल नंबर मात्र या ठिकाणी असणं आवश्यक आहे. रजिस्टर मोबाईल नंबरवर तुम्हाला वन टाइम ओटीपी येणार आहे. त्या ओटीपी नंतरच तुम्हाला पूर्ण पुढचा फॉर्म भरता येणार आहे. फॉर्म भरून ज्याच्यामध्ये तुम्हाला महत्त्वाची तीन ते चार डॉक्युमेंट अपलोड करता येण्यासारखी सोपी अशी प्रोसेस ठेवण्यात आलेली आहे.