मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना 2024 | Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana 2024 online apply
तुम्ही स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहेत तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र शासनाच्या मार्फत विविध संस्था आहेत ज्यामध्ये, Mahajyoti, BARTI, SARTHI, TRTI यांच्यामार्फत मोफत प्रशिक्षण आणि कोचिंग त्याचबरोबर महिन्याला तुम्हाला विद्यावेतन देखील दिले जाणार आहे. यासाठी तुम्हला ऑनलाईन अर्ज 19 जून पासून सुरू झालेली आहेत. यासाठी फक्त तुम्हाला ऑनलाईन अर्ज भरायचा आहे. सर्व माहिती खालील प्रमाणे देत आहे.
Mahajyoti, BARTI, SARTHI, TRTI Schemes Benefits

- यामध्ये तुम्ही यूपीएससी परीक्षेचा अभ्यास करत आहे तर त्याच्यासाठी तुम्हाला 11 महिन्याच प्रशिक्षण दिले जाईल आणि विद्या वेतन प्रतिमा १३००० रुपये दिले जाणार आहे. आणि १८००० रुपये एका वेळेस चा निधी दिला जाणार आहे.
- जर तुम्ही दिल्लीसाठी यूपीएससीची तयारी करताहेत तर प्रवास खर्च म्हणून तुम्हाला दहा हजार रुपये दिले जाणार आहेत.
- तुम्ही महाराष्ट्रामध्ये यूपीएससीची तयारी करत आहे तर 11 महिने प्रशिक्षण आणि तुम्हाला विद्यावेतन १३ हजार रुपये प्रति महिना दिला जाईल, आणि एक वेळेस खर्च म्हणून 18000 रुपये दिले जातील.
- जर तुम्ही महाराष्ट्रामधील एमपीएससी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडनं स्पर्धा परीक्षेचे पूर्व शिक्षण घेणारा असाल त्याची तयारी करताय तर ११ महिन्यासाठी तुम्हाला १० हजार रुपये प्रति महिना आणि १२ हजार रुपये एकत्रित निधी दिला जाणार आहे.
- त्याचबरोबर तुम्ही रेल्वे, एलआयसी, नाबार्ड, स्टाफ सिलेक्शन कमिशन, रीजनल रुरल बँक आणि इतर बॅंकेची तयारी करता त्यासाठी तुम्हाला 6 महिन्याचे प्रशिक्षण आणि 6 हजार रुपये महिना विद्यावेतन दिले जाईल आणि एकदाचा निधी म्हणून १० हजार रुपये दिले जाणार आहेत.
- आणि तुम्ही पोलीस भरती सैन्य भरती ची तयारी करत आहे तर त्यासाठी देखील तुम्हाला ६ महिन्याचे प्रशिक्षण आणि १० हजार रुपये प्रति महिना आणि एकदाचा निधी म्हणून १० हजार रुपये दिले जाणार आहेत. पुस्तक संच आणि प्रशिक्षण साहित्य देखील तुम्हाला पोलीस भरतीसाठी दिले जाईल.
- त्यानंतर तुम्ही शिक्षक पात्रता परीक्षेची तयारी करत आहेत टीईटीची तर ६ महिने प्रशिक्षण महिन्याला १० हजार रुपये प्रति महिना विद्यावेतन आणि १२ हजार रुपये एकदाचा निधी म्हणून तुम्हाला दिला जाणार आहे.
यासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 3 जुलै 2024 आहे. तुमची निवड ही एक सीएटी परीक्षेद्वारे केली जाणारे त्याच्या मार्कच्या आधारी निवड केली जाईल. अर्ज करण्यासाठी प्रत्येक संस्थेची जसं की Mahajyoti, BARTI, SARTHI, TRTI या सर्वांचे लिंक तुम्हाला पुढील प्रमाणे दिल्यात, तेथून तुम्ही अर्ज करू शकतात.