You are currently viewing NHM जिल्हा परिषद आरोग्य विभाग भंडारा
NHM जिल्हा परिषद आरोग्य विभाग भंडारा

NHM जिल्हा परिषद आरोग्य विभाग भंडारा

(NHM) जिल्हा परिषद आरोग्य विभाग भरती भंडारा – १५ व्या वित्त आयोगा अंतर्गत भंडारा जिल्हयात खालील विविध पदे कंत्राटी तत्वावर तात्पुरती ११ महिन्याच्या कालावधीकरीता भरावयाची आहे . Medical Officer MBBS ,Staff Nurse ,GNM / B.Sc Nursing ,MPW – Male -12 th Pass in Science Paramedical Basic Training Course OR Sanitary Inspector Course या पदांची सर्व माहिती खालीलप्रमाणे आहे इतर नोकरी अपडेट येथे पहा.

आटी आणि शर्ती भरती साठी

 1. निवड झालेल्या उमेदवारांना ११ महिन्याच्या कालावधीकरीता नेमणुक दिली जाईल . काम समाधानकारक असल्याच पुढील ११ महिण्याचे कालावधीकरीता नेमणूक दिली जाईल .
 2. कामाचा अनुभव हा शासकीय / स्थानीक स्वराज्य संस्था / राष्ट्रीय आरोग्य अभियान चा असल्यास प्राधान्य देण्यात येईल
 3. उमेदवारांच्या शैक्षणिक अर्हतेवरून मेरीट लिस्ट तयार करण्यात येईल .
 4. मेरीट लिस्ट तयार करतांना Qualifying Exam मध्ये मिळालेले गुण उच्च शैक्षणिक अर्हता शासकीय / स्थानीक स्वराज्य संस्था / राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालयाचा अनुभव या बाबींचे गुण एकत्र करून मेरीट लिस्ट तयार करण्यात येवून संबंधित पात्र उमेदवारास नियुक्ती आदेश निर्गमित करण्यात येईल .
 5. कोविड १ ९ या साथरोगाचा प्रादुर्भाव असल्याने राज्य आरोग्य सोसायटीने दिलेल्या मार्गदर्शक सुचनांप्रमाणेच पदवीचे अंतिम वर्षाचे गुण तसेच शासकीय / स्थानीक स्वराज्य संस्था / राष्ट्रीय आरोग्य अभियान कामाचा अनुभव , पदवी , पदव्युत्तर व इतर शैक्षणिक अर्हता यांचा विचार करुनच संवर्गाप्रमाणे गुणवत्ता यादी लावण्यात येणार आहे .
 6. https://bhandara.gov.in & www.bhandarazp.org.in या संकेत स्थळावर जाहिर करण्यात येईल .
 7. अर्जासोबत आवश्यक सर्व शैक्षणिक अर्हतेचे प्रमाणपत्र तसेच पुराव्यादाबल इतर दस्ताऐवजांच्या सांक्षाकित प्रती जोडून मोठया लिफाफयामध्ये बंद करुनच अर्ज सादर करावे व त्यावर ठळक अक्षरात पदाकरिता अर्ज ” व ” अर्जाचा प्रवर्ग ” ….. असे नमुद करावे .
 8. अर्जासोबत राखीव ( मागास ) प्रवर्गातील उमेदवारांनी शुल्क रुपये १०० / – व खुल्या ( अमागास ) प्रवर्गातील उमेदवारांनी शुल्क रुपये १५० / – इतक्या रक्कमेचा राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे कार्यालयीन SBI बँकखाते च्या नावे BHANDARA DIHFWS OTHER FUNDS भंडारा येथे देय असलेला राष्ट्रीयकृत बँकेचा धनाकर्ष ( Demand Draft ) अर्जासोबत मागील बाजूस उमेदवाराचे नाव , पदाचे नाव व अर्जाचा प्रवर्ग लिडून जोडलेला असणे आवश्यक आहे .
 9. अर्जावर विहित ठिकाणी अलिकडच्या काळातील पासपोर्ट साईज फोटो लावावे व एक अतिरिक्त फोटो अर्जाला जोडावे .
 10. शासन निर्णय दिनांक १३ जानेवारी २०० ९ नुसार खुला ( अमागास ) , अनुसुचीत जाती / अनुसुचीत जमाती प्रवर्ग वगळता इतर मागास विमुक्त जाती , भटक्या जमाती व विशेष मागासवर्ग प्रवर्गातील उमेदवारांनी आरक्षणाचा लाभ मिळण्यासाठी दिनांक ३१ मार्च , २०२३ पर्यंत वैध असलेले उन्नत व प्रगत गटात मोडत असल्याचे ( नॉन क्रिमीलेअर ) प्रमाणपत्र अर्जासोबत जोडणे आवश्यक राहील .
 11. वरील पदांकरिता अर्ज हे दिनांक १५ जुन २०२२ रोजी सायं . ५.०० वाजेपर्यंत ( सुट्टीचे दिवस वगळून ) जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक कक्ष , राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय , आरोग्य विभाग , जिल्हा परिषद , भंडारा येथे नोंदणीकृत पोस्टाद्वारे किंवा स्वतःहा स्विकारण्यात येईल .

उमेदवारांनी अर्जासोबत सादर करावयाची झेरॉक्स कागदपत्रांची यादी

वैद्यकिय अधिकारी एमबीबीएस १ ) एमबीबीएस ची संपुर्ण गुणपत्रिका २ ) इंटरशिप प्रमाणपत्र ३ ) एमएमसी / एमसीआय ( Maharashtra Medical Council / MCI ) नोंदणी प्रमाणपत्र ४ ) जात प्रमाणपत्र जातवैधता प्रमाणपत्र ( असल्यास ) ६ ) नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र ( अ.जा , अ.ज. व खुला प्रवर्ग वगळून ) ७ ) टि.सी. ८ ) धनाकर्ष ( Demand Draft ) ९ ) अनुभव प्रमाणपत्र ( असल्यास ) कंत्राटी स्टाफ नर्स १ ) जीएनएम / बी.एस.सी नर्सिंग ची संपुर्ण गुणपत्रिका २ ) एमएनसी ( Maharashtra Nursing Council ) नोंदणी प्रमाणपत्र ४ ) जात प्रमाणपत्र ५ ) जातवैधता प्रमाणपत्र ( असल्यास ) ६ ) नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र ( अ.जा , अ.ज. व खुला प्रवर्ग वगळून ) ७ ) टि.सी. ८ ) धनाकर्ष ( Demand Draft ) ९ ) अनुभव प्रमाणपत्र ( असल्यास ) कंत्राटी एमपीडब्ल्यू – पुरुष – १ ) १२ वी सायन्स पासची गुणपत्रिका २ ) पॅरामेडिकल बेसिक ट्रेनिंग कोर्स चे प्रमाणपत्र ३ ) सॅनिटरी इस्पेक्टर कोर्स ( Sanitary Inspector Course ) चे प्रमाणपत्र ४ ) जात प्रमाणपत्र जातवैधता प्रमाणपत्र ( असल्यास ) ६ ) नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र ( अ.जा , अ.ज. व खुला प्रवर्ग वगळून ) ७ ) टि.सी. ८ ) धनाकर्ष ( Demand Draft ) ९ ) अनुभव प्रमाणपत्र ( असल्यास )

भरती साठी महत्वाच्या लिंक nhm

सविस्तर जाहिरात येथे पहा येथे पहा
अधिकृत website अधिकृत संकेतस्थळ