Arogya Vibhag Bharti NHM Kolhapur 2024
आरोग्य विभाग मध्ये ‘या’ पदाची जाहिरात प्रसिद्ध । NHM Recruitment Deputy Health services- आरोग्य विभाग अंतर्गत, राष्ट्रीय आरोग्य अभियान मध्ये, उपसंचालक आरोग्य सेवा, कोल्हापूर मंडळ, कोल्हापूर साठी कंत्राटी पद्धतीने Statistical investigator या एका पदाची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. याच्यासाठी तुमचं ग्रॅज्युएशन स्टॅटिक्स किंवा मॅथेमॅटिक्स मध्ये झालेला असेल, त्यासोबत तुमचं मराठी इंग्लिश थर्टी फोर्टी हे टायपिंग झालेला असेल आणि एम एस सी आय टी उत्तीर्ण केलेली आहे तर तुम्हाला अर्ज करता येणार आहे. यासाठी तुमची वयोमर्यादा 18 ते 38 वर्षापर्यंत आहे.
या पदासाठी तुमची परीक्षा घेतली जात नाही तर थेट तुमच्या शेवटच्या वर्षाच्या मार्क्स नुसार व तुमच्या अनुभवानुसार आणि उच्च शैक्षणिक अहर्ता नुसार मार्क दिले जातात. तुम्हाला अठरा हजार रुपये महिना इतका पेमेंट असणार आहे. जर तुमच्याकडे शासकीय निमशासकीय अनुभव असेल तर तुम्हाला जास्त प्राधान्य असणार आहे. नियुक्तीचे ठिकाण- उपसंचालक आरोग्य सेवा, कोल्हापूर या ठिकाणी आहे.
आरोग्य विभाग कोल्हापूर भरती
ही जागा फक्त ओपन कॅटेगिरी साठी ठेवण्यात आलेली आहे. यासाठी अर्ज कसे करायचे- 20 जून 2024 पासून ते 28 जून 2024 पर्यंत सकाळी दहा वाजेपासून ते पाच वाजेपर्यंत सुट्टीचे दिवस वगळून समक्ष अथवा रजिस्टर पोस्टाने अर्ज स्वीकारले जातील. नोकरीचे ठिकाण उपसंचालक आरोग्य सेवा, कोल्हापूर मंडळ कोल्हापूर दुसरा मजला प्रशासकीय इमारत एसपी ऑफिस जवळ कसबा बावडा कोल्हापूर ४१६००३. यासाठी तुम्हाला खुल्या प्रवर्गासाठी 150 रुपये फीज आहे. संपूर्ण जाहिरात आणि अर्जु पाहण्यासाठी लिंक खालील प्रमाणे दिली आहे.