Pune Municipal Corporation Health department recruitment 2024
पुणे महानगरपालिका मध्ये विविध पदांची जाहिरात प्रसिद्ध । Pune Mahangarpalika New Bharti 2024 – पुणे महानगरपालिका, आरोग्य खात्याकडील पुणे शहर एड्स नियंत्रण संस्था, पुणे महानगरपालिका. यांच्या गाडीखाना येथील प्रोजेक्ट मॅनेजमेंट युनिट करता पुणे मनपा रुग्णालयातील केंद्रासाठी अस्थायी पदावर सहा महिन्याकरिता करार पद्धतीने पदे भरण्यासाठी तोंडी मुलाखत पद्धतीने जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. खालील प्रमाणे शैक्षणिक पात्रता अनुभव पूर्तता करणाऱ्या पात्र उमेदवारांकडून ऑफलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
पुणे महानगरपालिका भरती रिक्त पदे
महानगरपालिकेमध्ये समुपदेशक आणि प्रयोगशाळा तंत्रज्ञ या एकूण १२ पदांची पदभरती केली जात आहे. यासाठी समुपदेशक पदासाठी – मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी उत्तीर्ण व मास्टर ऑफ सोशल वर्क MSW ची पदवी उत्तीर्ण आणि एच आय व्ही एड्स विषयक समुपदेशनाचा तीन वर्षाचा अनुभव आवश्यक आहे. आणि प्रयोगशाळा तंत्रज्ञ – पदासाठी मान्यता प्राप्त विद्यापीठाची शास्त्र शाखेची पदवी बीएससी व डी एम एल टी उत्तीर्ण असणे गरजेचे आहे आणि एचआयव्ही रक्ताची कामाची लॅबोरेटरी मधील तीन वर्षाचा अनुभव आवश्यक आहे.
Pune Mahangarpalika Arogya Bharti 2024 Qualification
वयोमर्यादा 18 ते 38 वर्षापेक्षा जास्त नसावे मागासवर्गीय उमेदवारांसाठी पाच वर्षे स्थितीत आहे. वरील पदांकरिता शैक्षणिक पात्रता अनुभव इतर बाबी पूर्तता करणाऱ्या पात्र उमेदवारांनी- पुणे शहर एड्स नियंत्रण संस्था डॉक्टर कोटणीस आरोग्य केंद्र पहिला मजला 663 शुक्रवार पेठ गाडीखाणा पुणे ४११००२ येथे जाहिरात प्रसिद्ध झाल्याच्या तारखेपासून पुढील आठ दिवसापर्यंत सोमवार ते शुक्रवार शासकीय सुट्ट्या बघून सकाळी 11 ते सायंकाळी ५ या वेळेमध्ये समक्ष अर्ज सादर करावयाचे आहेत. दुसऱ्या पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
पुणे महानगरपालिका भरती अर्ज प्रक्रिया
यासाठी पुढील प्रमाणे तुमची निवड केली जाईल गुणांकन पद्धत वापरली जाईल जसे की शैक्षणिक पात्रतेसाठी वीस गुण अनुभवासाठी वीस गुण आणि तोंडी मुलाखतीसाठी दहा गुण आणि अंतिम निवड व प्रतीक्षा यादी महानगरपालिकेच्या वेबसाईट वरती प्रसिद्ध केली जाईल जाहिरात व अर्ज नमुना खालील प्रमाणे दिला आहे.