८३२६ पदांची मेगा भरती जाहिरात प्रसिद्ध । फक्त १०वी पास वर अर्ज सुरु! । SSC MTS 2024 Notification out – SSC MTS 2024 जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. SSC च्या वेळापत्रकांनुसार , SSC MTS 2024 जाहिरात आज 27 जून 2024 रोजी 8326 पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध केली गेली आहे. कर्मचारी निवड आयोग (SSC) मल्टी टास्किंग स्टाफ (MTS) आणि हवालदार अर्ज आजपासून 27 जून ते 31 जुलै 2024 पर्यंत सुरू राहतील. तुम्ही जर 10वी उत्तीर्ण आहात तर ही एक सुवर्ण संधी आहे. केंद्र सरकारमधील हि सरकारी नोकरी आहे जी कि SSC MTS 2024 द्वारे केली जात आहे. पुढील प्रमाणे दिलेल्या थेट लिंकवरून SSC MTS 2024 जाहिरात PDF डाउनलोड करू शकतात व अर्ज करू शकतात.
SSC MTS 2024 परीक्षा (CBT) परीक्षा ऑक्टोबर-नोव्हेंबर 2024 मध्ये घेतली जाणार आहे. SSC MTS 2024 जाहिरात PDF आज २७ जून २०२४ रोजी SSC च्या अधिकृत वेबसाइट ssc.gov.in वर प्रसिद्ध झाली आहे. या बद्दल संपूर्ण माहिती पुढील प्रमाणे आहे.

- जाहिरात प्रसिद्ध करणारी संस्था – कर्मचारी निवड आयोग (SSC)
- परीक्षेचे नाव – SSC MTS 2024
- पदाचे नाव- मल्टी टास्किंग स्टाफ (MTS)
- नोकरीचे ठिकाण- संपूर्ण भारतात
- अधिकृत वेबसाइट- ssc.gov.in
- पात्रता – १०वी पास.