म्युकोरमायकोसिस( ब्लैक फंगस) म्हणजे काय What is Mucormycosis (Black Fungus)?
🚑”म्युकोरमायकोसिस( ब्लैक फंगस) म्हणजे काय?✍️
काळजी व उपचार
[ays_quiz id=’2′]
म्युकोर मायकोसिस
हा बुरशीजन्य रोग [ ब्लैक फंगस ] आहे.
हा रोग ‘म्युकोरेल्स’ या फंगस मुळे होतो.
कोविड च्या उपचारा नंतर काही रुग्णांना हा रोग दिसुन येत आहे. कोविड मुळे व मधुमेह किंवा इतर सहव्याधींमुळे, तसेच उपचारासाठी वापरण्यात येणाऱ्या स्टेरॉइड मुळे ही रोगप्रतिकारक क्षमता कमी झालेली असते या संधीचा फायदा बुरशी [फंगस] घेते व
या रोगाला ला सुरुवात हाेते.
नाकाच्या मार्गे हि बुरशी नाकामागच्या सायनस मध्ये,
तोंडामध्ये विशेषत वरच्या जबड्यात व दातात,
डोळ्यापासून ते मेंदूपर्यंत पोहचते.
या बुरशीचा पसराव अति वेगाने असून
उपचारासाठी खुपच कमी वेळ मिळतो.
लवकर निदान झाले तर
औषोधोपचाराने रुग्ण बरा होऊ शकतो पण उशीर झाला तर
शस्त्रक्रिया पण करण्याची वेळ येते.
रिस्क फॅक्टर्स–
कोरोना सोबत खालील रोग असल्यास
म्युकोर मायकोसिस ची लागण लवकर होते……
- मधुमेह/डायबिटीज
- HIV / AIDS .
- जास्त वेळ व मात्रा मधे स्टेरॉइड्स चा वापर.
- ब्लड प्रेशर
- विविध कँसर
- लिव्हर सिरोसिस
- अति लट्ठपणा
निदान करण्यासाठी लक्षणे
तोंड व दांत
चेहर्यावर सज येणे,
तोंडातून दुर्गंधी येणे,
तोंडातून पु येणे,
हिरड्यांवर फोड़ किवा सूज येणे,
अचानक दात हालणे व पडणे,
दातांची जखम न भरणे.
नाक
सर्दी असणे
नाक बंद असणे
साइनस च्या जागेत दुखणे
नाकातुन रक्त येणे
नाक दुखणे
डोळे
डोळे दुखणे व सुजणे
डोळ्यांनी कमी दिसणे/ न दिसणे
मेंदू
डोके दुखणे
मेंदूच्या नसांचा त्रास होणे
निदान कसे करणार
- बायोप्सी (Biopsy)
बुरशी च्या जागेतुन तुकड़ा काढून टेस्टिंग करणे.
2.नाकातुन स्वॅब घेऊन तपासणी /fungal culture
- रेडियोलॉजिकल
CT Scan or MRI PNS & orbit or brain
वरील लक्षणे आढळ्यास
खालील डॉक्टरांचा सल्ला घेणे व
वेळेवर ताबड़तोब उपचार करून घेणे.
- दंतरोग तज्ञ
- नाक, कान, घसा तज्ञ
- नेत्र रोग तज्ञ
- मेंदु रोग तज्ञ
- फिजिशियन
उपचार कसा करावा
म्युकोर मायकोसिस चे निदान झाल्यानंतर खालीलप्रमाणे उपचार करावे
- मधुमेह (systemic problems or predisposing factors) व इतर रोगांचा उपचार करून नियंत्रण करावे
2 शस्त्रक्रिया
डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार ताबड़तोब आवश्यकतेनुसार आपरेशन करून
खराब झालेले हाड़ व शरीराचा इतर भाग काढून घेणे.
- औषधोपचार
इंजेक्शन –
अँफोटेरीसिन बी
Amphotericin B
Plain /Lyposomal
Tablet
इसावुकोनाझोल (Isavuconazole)
or
पोसैकोनझोल (Posaconazole)
कोरोनाच्या संकटातुन बरे झाल्या नंतर म्युकोर मायकोसिस न हाेवो यासाठी घ्यावयाची काळजी
- शरीरातील साखरेची पातळी नियंत्रीत ठेवा.
- स्टेरॉइड चा गरजे पेक्षा जास्त वापर नको.
3.अॅक्सिजन थेरपी साठी स्वच्छ निर्जंतुक पाण्याचा वापर ह्युमिडीफायरसाठी करा. - रुग्णांनी नाक, डोळे, तोंडाची व शरीराची योग्य ती स्वच्छता ठेवणे अतिशय गरजेचे आहे.
- कोणत्याही लक्षणाकडे दुर्लक्ष करू नका.
- NHM Bhandara Bharti 2025 – जाहिरात
- NHM Bhandara Recruitment 2025 – Apply Now
- IGR Maharashtra Recruitment 2025 – 284 Shipai (Peon) Posts | ऑनलाईन अर्ज सुरू!
- IGR Maharashtra Recruitment 2025: Apply Online for 284 Group D Peon / Shipai Posts
- GGMCJJH Hospital Mumabi Bharti 2025 | ग्रँट गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज अंतर्गत 21 पदांची भरती
उपचारासाठी –
राज्य सरकारच्या वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालयात म्युकर मायकॉसिस वर मोफत उपचार करण्यात येत आहेत. त्याच बरोबर महात्मा फुले जीवनदायी आरोग्य योजने अंतर्गत च्या रूग्णालयात ही हे उपचार मोफत होतील.
लवकर निदान होणे अत्यंत गरजेचे आहे
भिती नको काळजी हवी
त्यामुळे कोरोना होवू नये याची काळजी घ्या
[ays_quiz id=’2′]