Zilha Parishad Arogya vibhag bharti 2024
जिल्हा परिषद भरती २०२४ । आरोग्य विभाग मध्ये विविध पदांची जाहिरात प्रसिद्ध– जिल्हा परिषद छत्रपती संभाजी नगर (औरंगाबाद) मार्फत आरोग्य विभाग मध्ये विविध पदांची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियान व जिल्हा रुग्णालय यांच्या अंतर्गत ही पदे भरली जात आहे. नोकरी ठिकाण छत्रपती संभाजीनगर मधील हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना आहे. पदे कंत्राटी प्रकारे भरली जात आहेत. ऑफलाईन पद्धतीने अर्ज भरावे लागतात. त्यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 जून २०२४.
जिल्हा परिषद भरती आरोग्य विभाग
आरोग्य विभाग मध्ये नोकरी करण्याची संधी आहे. विविध तांत्रिक पदांचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये मेडिकल ऑफिसर, स्टाफ नर्स, आरोग्य सेवक (MPW) बहूउद्देशीय आरोग्य कर्मचारी या पदांचा समावेश आहे. तुम्ही स्टाफ नर्स साठी नर्सिंग डिप्लोमा वर अर्ज करू शकतात, आणि आरोग्य सेवक साठी १२ वी सायन्स वर अर्ज करू शकतात.
जिल्हा परिषद मध्ये आरोग्य विभाग अंतर्गत राष्ट्रीय आरोग्य अभियान मध्ये आपला दवाखाना मध्ये ह्या जागा निघाल्या आहेत. अर्ज करण्यासाठी ऑफलाईन प्रक्रिया आहे जिल्हा रुग्णालय मध्ये अर्ज सादर करावे लागतील. अर्ज फी खुल्या प्रवर्गसाठी ५०० रु फी आहे आणि राखीव प्रवर्ग साठी २५० रु फी आहे. निवड प्रक्रिया हि गुणांकन प्रकारे केली जाणार आहे.