जिल्हा परिषद भरती २०२३ नवीन GR प्रसिद्ध; नवीन GR नुसार अर्ज,वय,पात्रता जाणून घ्या! ZP Bharti 2023

जिल्हा परिषद भरती २०२३ नवीन GR प्रसिद्ध; नवीन GR नुसार अर्ज,वय,पात्रता जाणून घ्या! ZP Bharti 2023
जिल्हा परिषद नवीन जाहिरात !! GR पहा new

ZP Bharti 2023- जिल्हा परिषद अंतर्गत गट-क मधील सर्व संवर्गातील (वाहनचालक व गट-ड संवर्गातील पदे वगळून) सरळसेवेची रिक्त पदे भरण्याबाबत मार्गदर्शक सूचना साठी आज नवीन शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात आला आहे. महाराष्ट्र शासन ग्राम विकास विभाग शासन परिपत्रक क्रमांकः संकीर्ण २०२२/प्र.क्र.११/आस्था दिनांक: १५ मे, २०२३.

भरती प्रक्रियेसाठी विचारात घ्यावयाचे वय व शैक्षणिक अर्हता

महाराष्ट्र शासनाचे विविध विभागांकडून वेळोवेळी निर्गमित करणेत आलेले शासन निर्णय, अधिसूचना, परिपत्रक इत्यादीद्वारे निश्चित केलेली वयोमर्यादा व शैक्षणिक अर्हता नमूद केलेली आहे.

वय बद्दल सूट

०३ मार्च २०२३ चे शासन निर्णयानुसार दिनांक ३१ डिसेंबर २०२३ पर्यंत वय मर्यादा मध्ये सूट देण्यात येत आहे

  • खुल्या प्रवर्गासाठी ४० वर्षे
  • मागास प्रवर्गासाठी ४५ वर्षे

२०१९ मध्ये अर्ज केला असल्यास वय मध्ये सूट

मार्च २०१९ च्या जाहिरातीप्रमाणे अर्ज केलेले / भरलेले आहेत, अशा उमेदवारांचे वयाधिक्य झाले असल्याने ते परीक्षेस बसण्यास अपात्र होऊन त्यांचे नुकसान होऊ नये, याकरिता सन २०२३ मध्ये प्रसिध्द होणाऱ्या सरळसेवा भरती प्रक्रियेच्या जाहिरातमध्ये त्यांना वयोमर्यादेत सूट देण्यात आली आहे (भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांचे वय निश्चित करण्यासाठी दि. ०१ जून २०२३ हा दिनांक निश्चित करणेत येत आहे.)

वृत्तपत्रामध्ये प्रसिध्द करावयाची नमुना जाहिरात जिल्हा परिषद भरती २०२३

ऑनलाईन पद्धतीने घेतलेल्या स्पर्धा परीक्षांच्या गुणवत्ता यादी व निवड यादी जिल्हा परिषद भरती बद्दल-

उपरोक्त संदर्भाधिन शासन निर्णय दि. ०४ मे २०२२ मधील मुद्दा क. १० नुसार निवडसूचीत समाविष्ट करणेसाठी विचारात घ्यावयाच्या उमेदवारांची संख्या नमूद केलेली आहे, त्यानुसार कार्यवाही करणेची दक्षता घ्यावी.. भरती प्रक्रियेच्या ऑनलाईन पद्धतीने घेतलेल्या स्पर्धा परीक्षांच्या गुणवत्ता यादी व निवड यादी कंपनीच्या सर्व्हर वरून विहित कालावधीत व विहित मार्गाने प्राप्त करून घेण्याची जबाबदारी जिल्हा परिषदांची राहील.


जिल्हा परिषद भरती ऑनलाईन अर्ज सादर करण्याचे वेळापत्रक

ऑनलाईन पद्धतीने अर्ज नोंदणी सुरू होण्याचा दिनांक – …………………….

ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक…………………….

ऑनलाईन पद्धतीने परीक्षा शुल्क भरणेची अंतिम मुदत …………………….

परीक्षेसाठी ऑनलाईन प्रवेशपत्र उपलब्ध होण्याचा दिनांक – परीक्षेच्या आधी ७ दिवस

परीक्षा शुल्क जिल्हा परिषद भरती २०२३

  • खुल्या प्रवर्गाच्या उमेदवारांसाठी रू.१०००/-
  • मागास प्रवर्गाच्या उमेदवारांसाठी रू.९००/-
  • अनाथ उमेदवारांसाठी रू.९००/-
  • माजी सैनिक / दिव्यांग माजी सैनिक यांचेसाठी परीक्षा शुल्क माफ राहील.
  • परीक्षा शुल्क भरल्याबाबतची ऑनलाईन चलनाची प्रत ही ऑनलाईन पद्धतीने केलेल्या अर्जाच्या प्रतीसोबत कागदपत्रांच्या तपासणीचे वेळी सादर करणे आवश्यक राहील.

जिल्हा परिषद भरती एका पदापेक्षा जास्त अर्ज साठी

उमेदवारास प्रसिध्द केलेल्या जाहिरातीमधील एकापेक्षा अधिक पदाकरीता अर्ज करावयाचे असल्यास अशा प्रत्येक पदासाठी स्वतंत्र अर्ज सादर करून त्यासाठी स्वतंत्र परीक्षा शुल्क भरणे बंधनकारक राहील.

जिल्हा परिषद भरती २०२३ साठी अर्ज भरणे व सादर करणेबाबत सूचना

  • उमेदवारांनी अर्ज भरण्यापूर्वी www. ——–.com/mr/recruitments या लिंकवर जाऊन जाहिरात सविस्तर अभ्यासावी व नंतरच आपला अर्ज भरावा
  • उमदेवारास अर्ज सादर करताना काही समस्या उद्भवल्यास http://www.cgrs.ibps.in/ या लिंकवर अथवा १८००२२२३६६/१८००१०३४५६६ या हेल्पलाईनवर संपर्क साधावा
  • ऑनलाईन फी भरणेसाठी दि. / / २०२३ वेळ २३:५९ पर्यंत मुदत राहील
  • वयाच्या पुराव्यासाठी सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेला जन्माचा दाखला, शाळा सोडल्याचा दाखला, माध्यमिक (एस.एस.सी) परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र, वय व अधिवासाबाबत शासनाकडील सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेले प्रमाणपत्र ग्राह्य धरणेत येईल.
  • शैक्षणिक अर्हतेसंदर्भात आवश्यक माहिती दिलेल्या क्रमाने नमूद करावी. संबंधित परीक्षेच्या गुणपत्रकावरील दिनांक हा शैक्षणिक अर्हता धारण केल्याचा दिनांक समजणेत येईल व त्या आधारे उमेदवाराची पात्रता ठरविणेत येईल.
  • गुणांऐवजी श्रेणी पध्दत असल्यास कागदपत्र पडताळणीचे वेळी उमेदवारांनी गुणपत्रकासोबत श्रेणीची |
  • (Grade) यादी सादर करावी.

जिहा परिषद भरती २०२३ परीक्षा स्वरूप व अभ्यासक्रम

जाहिरातीत नमूद पदाकरिता अर्ज केलेल्या परीक्षेकरीता पात्र ठरलेल्या उमेदवारांचे परीक्षेचे प्रवेशपत्र अधिकृत संकेतस्थळावर परीक्षेच्या किमान ७ (सात) दिवस अगोदर त्यांच्या प्रोफाईलद्वारे उपलब्ध करून देण्यात येतील. उमेदवारांनी परीक्षा प्रवेशपत्र स्वतः संकेतस्थळावरुन काढून घ्यावे. परीक्षेच्या वेळी उमेदवाराने प्रवेशपत्राची प्रिंट व ओळखीचा पुरावा (छायाप्रतीसह) सोबत ठेवणे | बंधनकारक आहे. त्याशिवाय कोणत्याही उमेदवारांस परीक्षेस बसण्यास परवानगी दिली जाणार नाही. परीक्षेनंतर प्रस्तुत प्रवेशपत्र स्वतःजवळ जपून ठेवावे व परीक्षा कक्षात प्रवेश पत्र व ओळखीच्या पुराव्याची छायाप्रत जमा करावी.

सरळसेवेची जिल्हा परिषद मधील रिक्त पदे शैक्षणिक पात्रता

आरोग्य पर्यवेक्षक

ज्यांनी मान्यता प्राप्त विद्यापीठाची विज्ञान शाखेची पदवी धारण केलेली असेल आणि ज्यांनी बहुउदेशीय आरोग्य कर्मचान्यांसाठी असणारा १२ महिन्याचा पाठ्यक्रम यशस्वीरित्या पूर्ण केलेला असेल अशा उमेदवारांमधून नामनिर्देशनाद्वारे नेमणूक करण्यात येईल.

आरोग्य सेवक (पुरुष) ४०%

विज्ञान विषय घेवुन माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण झालेले उमेदवार. ज्यांनी बहुउद्देशीय आरोग्य कर्मचान्यांसाठी असणारा १२ महिन्याचा मुलभूत पाठयक्रम यशस्वीरित्या पूर्ण केलेला नसेल अशा उमेदवारांनी नियुक्ती नंतर असे प्रशिक्षण पुर्ण करणे आवश्यक राहिल.

आरोग्य सेवक (पुरुष) ४०%

विज्ञान विषय घेवुन माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण झालेले उमेदवार, राष्ट्रीय मलेरिया प्रतिरोध कार्यक्रमांतर्गत हंगामी क्षेत्र कर्मचारी म्हणुन ९० दिवसांचा अनुभव धारकांना प्राधान्य देण्यात येईल. ज्यांनी बहुउद्देशीय आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी असणारा १२ महिन्याचा | मुलभूत पाठयक्रम यशस्वीरित्या पूर्ण केलेला नसेल अशा उमेदवारांनी नियुक्ती नंतर असे प्रशिक्षण पुर्ण करणे आवश्यक राहिल.

आरोग्य सेवक (महिला)

ज्यांची अर्हता प्राप्त साह्यकारी प्रसाविका आणि महाराष्ट्र परिचर्या परिषदेमध्ये किंवा विदर्भ परिचर्या परिषदेमध्ये नोंदणी झालेली असेल किंवा अशा नोंदणीसाठी जे पात्र असतील.

औषध निर्माण अधिकारी

औषध निर्माण शास्त्रातील पदवी किंवा पदविका धारण करणारे आणि औषध शाळा अधिनियम १९४८ खालील नोंदणीकृत औषध निर्माते असलेले उमेदवार.

कंत्राटी ग्रामसेवक

किमान उच्च माध्यमिक शाळा प्रमाणपत्र किंवा तुल्य अर्हता परीक्षेत किमान ६० % गुणांसह उत्तीर्ण किंवा शासन मान्य संस्थेची अभियंत्रिकी पदविका (तीन वर्षाचा अभ्यासक्रम) किंवा शासन मान्य संस्थेची समाजकल्याणची पदवी (बी एस डब्ल्यू) किंवा माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षा किंवा तुल्य अर्हता आणि कृषि पदविका दोन वर्षाचा अभ्यासक्रम किंवा कृषि विषयाची पदवी किंवा उच्च अर्हता धारण करणाऱ्या किंवा समाजसेवेचा अनुभव आणि ग्रामीण अनुभव असलेले उमेदवारांना अधिक पसंती. संगणक हातळणी वापराबाबत माहिती तंत्रज्ञान संचालनालयाने वेळोवेळी विहित केलेली परीक्षा उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र धारण करणे आवश्यक राहील.

कनिष्ठ अभियंता (स्थापत्य / ग्रा.पा.पु. / लघु पाटबंधारे)

स्थापत्य अभियांत्रिकी या विषयातील मान्यताप्राप्त पदवी किंवा पदविका (तीन वर्षाचा पाठ्यक्रम) किंवा तुल्य अर्हता धारण करत असतील असे उमेदवार.\

कनिष्ठ अभियंता (विद्युत)

विद्युत अभियांत्रिकी या विषयातील मान्यताप्राप्त पदवी किंवा पदविका (तीन वर्षाचा पाठ्यक्रम) किंवा तुल्य अर्हता धारण करत असतील असे उमेदवार.

कनिष्ठ आरेखक

माध्यमिक शाळा प्रमाणपत्र उत्तीर्ण झालेले असतील किंवा तुल्य अर्हता धारण करीत आतील आणि ज्यांनी शासनाने मान्यता दिलेला स्थापत्य आरेखकाचा पाठ्यक्रम यशस्वीरित्या पूर्ण केला असेल असे उमेदवार.

कनिष्ठ यांत्रिकी

ज्यांनी तांत्रिक शिक्षण विभागाच्या यांत्रिकी विषयातील अल्पमुदतीचा पाठ्यक्रम पूर्ण केला असेल किंवा जे समतुल्य अर्हता धारण करीत असतील असे उमेदवार आणि रूळ मार्ग किंवा वाफेवर किंवा तेलावर चालणारे (रोड रोलर) दुरूस्त करणे इत्यादींचा कमीत कमी ५ वर्षाचा अनुभव असेल असे उमेदवार

कनिष्ठ लेखाधिकारी

ज्यांनी मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी धारण केली असेल व कोणतेही सरकारी कार्यालय व्यापारी भागीदार संस्था अथवा स्थानिक प्राधिकरण यातील किमान ५ वर्षाचा अखंड सेवेचा ज्यांना अनुभव असेल अशा उमेदवारामधुन नामनिर्देशनाव्दारे नेमणुक करण्यात येईल. या बाबतीत लेखाशास्त्र आणि लेखा परीक्षा हे विशेष विषय घेऊन वाणिज्य शाखेतील पदवी धारण करणाऱ्यांना अथवा प्रथम वा व्दितीय वर्गातील पदवी धारण करणा-यांना अधिक पसंती दिली जाईल किंवा गणित अथवा सांख्यिकी अथवा लेखा शाख व लेखा परिक्षा हे प्रमुख विषय घेऊन पदव्युत्तर पदवी धारण करीत असतील अशा उमेदवारांमधुन नामनिर्देशनाव्दारे नेमणुक करण्यात येईल, याबाबतीत कोणत्याही सरकारी कार्यालयातील अथवा व्यापारी संस्थेतील अथवा स्थानिक प्राधीकरणातील लेखा कार्याचा अनभव असणान्यास अधिक पसंती दिली जाईल.

कनिष्ठ सहाय्यक लिपिक

माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा अथवा तुल्य परीक्षा उत्तीर्ण झाले असतील आणि महाराष्ट्र शासनाच्या शासकीय कर्मचाऱ्यांनी मराठी टंकलेखन व लघुलेखन यातील परीक्षा घेण्यासाठी असलेल्या एतदर्थ मंडळाने किंवा आयुक्त, शासकीय परीक्षा विभाग, शिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य यांनी अनुक्रमे मराठी व इंग्रजी टंकलेखनाचे दर मिनीटास ३० शब्द या गतीने दिलेले प्रमाणपत्र धारण करीत असतील किंवा टंकलेखनामध्ये ५० टक्के गुण मिळवून माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा अथवा तुल्य परीक्षा उत्तीर्ण झाले असतील असे उमेदवार , परंतु उक्त दोन भाषांपैकी कोणत्याही एका भाषेतील गतीच्या प्रमाणपत्रानुसार नियुक्त केलेले उमेदवार, नियुक्त केलेल्या तारखेपासून दोन वर्षाच्या कालावधीत दुसऱ्या भाषेतील दर मिनीटास ३० शब्दांहून कमी नाही अशा टंकलेखनाच्या गतीचे प्रमाणपत्र मिळवतील असे उमेदवार

कनिष्ठ सहाय्यक लेखा

माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण अथवा समतुल्य परीक्षा उत्तीर्ण | झालेले उमेदवार तसेच महाराष्ट्र शासनाच्या शासकीय कर्मचाऱ्यांसाठी मराठी टंकलेखन व लघुलेखन यातील परीक्षा घेण्यासाठी असलेल्या एतदर्थ मंडळाने किंवा आयुक्त, शासकीय परीक्षा विभाग, शिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य यानी मराठी टंकलेखनाचे दर मिनिटास ३० शब्द या गतीने दिलेले प्रमाणपत्र धारण करीत असतील किंवा टंकलेखनामध्ये ५० टक्के गुण मिळवून माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा अथवा समतुल्य परीक्षा उत्तीर्ण करणे आवश्यक आहे.

जोडारी

जे उमेदवार चौथी उत्तीर्ण झाले असतील , ज्यांना किमान दोन वर्षाचा प्रत्यक्ष अनुभव असेल, शासकीय तंत्र शाळेतून विहित केलेला जोडायचा पाठ्यक्रम किंवा तुल्य पाठ्यक्रम उत्तीर्ण झाले असतील.

तारतंत्री

महाराष्ट्र शासनाच्या अनुज्ञापन मंडळाने दिलेले तारतंत्रीचे दुसन्या वर्गाचे प्रमाणपत्र किया तुल्य अर्हता धारण करीत असतील असे उमेदवार

पर्यवेक्षिका

ज्यांनी पदवी धारण केली आहे असे महिला उमेदवार

पशुधन पर्यवेक्षक

  • (अ) संविधिक विद्यापीठाची, पशुवैद्यक शास्त्रातील पदवी धारण करीत असलेल्या व्यक्ती, किंवा
  • (ब) पशुधन पर्यवेक्षक, पशुपाल, पशुचन सहाय्यक, सहायक पशुधन विकास अधिकारी किंवा पशुधन विकास अधिकारी (व श्रेणी) या बाबतची पशुसंवर्धन संचालनालयाने दिलेली पुढील पदविका किंवा प्रमाणपत्र धारण करणा-या व्यक्ती.
  • (१)त्यावेळच्या मुंबई राज्याने चालविलेल्या अभ्यासक्रमासह, पशुवैद्यक पशुपाल प्रशिक्षण अभ्यासक्रम
  • (२) पशुसंवर्धन विभाग महाराष्ट्र शासन आणि राज्यातील विविध संविधीक कृषि विद्यापीठे यानी चालविलेल्या पशुधन पर्यवेक्षक अभ्यासक्रम
  • (३) पशुसंवर्धन विभाग, महाराष्ट्र शासन यानी चालविलेला पशुवैद्यक व पशुसंवर्धन शाखामधील दोन वर्षाचा सेवांतर्गत पदविका अभ्यासक्रम (आणि),
  • (४) खालील संस्थानी चालविलेला पशुवैद्यक शास्त्र विषयासह दुग्धशाळा व क्षेत्र व्यवस्थापन व पशुसंवर्धन पदविका या मधील दोन वर्षाचा पदविका अभ्यासक्रम.

(एक) महाराष्ट्र तंत्रशिक्षण परीक्षा मंडळ किंवा राज्यातील विविध विधीक कृषी विद्यापीठे किंवा (दोन) राज्यातील विविध संविधीक कृषी विद्यापीठे किंवा

  • (५) महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपूर यांच्यामार्फत चालविण्यात येणारा पशुधन व्यवस्थापन व दुग्धोत्पादन पदविकास प्रमाणपत्र अभ्यासक्रम उत्तीर्ण
  • (ब) ज्यामुळे नोंदणीकृत पशुवैद्यक व्यवसायीच्या पर्यवेक्षणाखाली व निदेशनाखाली किरकोळ पशुवैद्यकिय सेवा करण्याचा हक्क असेल अशी, भारतातील कोणत्याही पशुवैद्यक संस्थेची पदविका किया प्रमाणपत्र धारण करणाऱ्या व्यक्ती.
  • परंतु किरकोळ पशुवैद्यकीय सेवा करण्याचा त्यांना हक्क मिळवून देणा- या पदविकेचा किंवा प्रमाणपत्राचा धारक भारतीय पशुवैद्यकीय परिषद अधिनियम १९८४ (१९८४ चा ५२ याच्या कलम ३० च्या खंड(ख) च्या परंतुकातील स्पष्टीकरणान्वये व कलम ५७ अन्वये कृषि पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभागाने महाराष्ट्र शासनाच्या राजपत्रात काढलेल्या क्र आयव्हीसी १००६ प्रक्र ५३२/पदुम-४ दि २७ ऑगस्ट २००९ च्या अधिसूचनेद्वारे विनिर्दिष्ट केलेल्या किरकोळ पशुवैद्यकिय सेवाच देण्यास हक्कदार असेल (तीन) माहिती तंत्रज्ञान संचालनालय, महाराष्ट्र शासन यांच्याकडून वेळोवेळी विहित केलेले संगणक वापराबाबतचे प्रमाणपत्र धारण केलेले असावे.

प्रयोगशाळा तंत्रज्ञ

ज्याने मुख्य विषय म्हणुन भौतिकशास्त्र किंवा रसायनशास्त्र अथवा जीवशास्त्र किंवा वनस्पतीशास्त्र अथवा प्राणीशास्त्र किंवा सुक्ष्म जीवशास्त्र यासह विज्ञान विषयामध्ये पदवी धारण केली असेल अशा उमेदवारातून नामनिर्देशनाद्वारे नेमणूक करण्यात येईल. (परंतु हाफकिन संस्थेच्या वैद्यकिय प्रयोगशाळा तंत्रशास्त्रामध्ये पदविका धारण करीत असलेल्या उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल.)

यांत्रिकी

शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण केली असावी अथवा शासनाने तिच्याशी समतुल्य म्हणून जाहीर केलेली अन्य कोणतीही अर्हता असावी (तीन) त्याच्याकडे शासनाच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्था अथवा मान्यता प्राप्त संस्था मधील तांत्रिक विद्युत अथवा ऑटोमोबाईल अभियांत्रिकी मधील प्रमाणपत्र असावे. वरील उपखंड (दोन) व तीन मध्ये नमूद केलेली शैक्षणिक अर्हता संपादन केल्यानंतर त्यास ऑटोमोबाईल व न्यूमेटिक मशीनच्या देखभाली व दुरूस्तीचा १ वर्षापेक्षा कमी अनुभव नसावा, (पाच) तो जड वाहन चालविण्याचा वैद्य परवाना धारक असावा. परंतू विहित केलेली वयोमर्यादा अथवा अनुभव संवर्गाची शर्त अथवा ही दोन्हीही असाधारण अर्हता किंवा असाधारण अनुभव किया दोन्ही धारण करणाऱ्या उमेदवारांच्या बाबतीत शासन निवड मंडळाच्या | शिफारशीनुसार शिथील करू शकेल.

रिगमन (दोरखंडवाला)

शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण अथवा तिच्याशी समतुल्य जाहिर शैक्षणिक अर्हता आणि जड माल वाहन अथवा जड प्रवासी वाहनाचा जड वाहन कामाचा चैव परवानाधारक असेल तर त्यास जड माल वाहनाचा अथवा जड प्रवासी वाहनाचा चालविण्याचा एक वर्षापेक्षा कमी अनुभव नसावा, ज्यांच्याकडे विधन यंत्राद्वारे खुदाईचा २ वर्षापेक्षा कमी नाही इतका अनुभव असणाऱ्या उमेदवारास प्राधान्य

वरिष्ठ साह्यक लिपिक

पदवी

वरिष्ठ साह्यक लेखा

संविधिमान्य विद्यापीठाची पदवी प्रमाणपत्र धारण करणारे उमेदवार मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी धारण करीत असतील या बाबत लेखा शाख व लेखा परिक्षा हे विशेष विषय घेऊन वाणिज्य शाखेतील पदवी धारण करणा-या अथवा पहिल्या किंवा दुस-या वर्गातील पदवी धारण करणा-या आणि कोणत्याही सरकारी कार्यालयात अथवा व्यापारी संस्थेत अथवा स्थानिक प्राधिकरणात तीन वर्षाहून कमी नसेल इतक्या अखंड कालावधी पर्यंत लेखा विषयक कामांचा पदवी नंतरचा प्रत्यक्ष अनुभव असलेल्या उमेदवाराना अधिक पसंती दिली जाईल.

विस्तार अधिकारी कृषी

ज्यानी मान्यताप्राप्त विद्यापीठाची कृषि विषयातील पदवी किंवा इतर कोणतीही अर्हता धारण केली असेल अशा उमेदवारांची नामनिर्देशनाद्वारे नेमणूक करण्यात येईल. परंतु कृषि विषयातील उच्च शैक्षणिक अर्हता आणि कृषि विषयक कामाचा अनुभव किंवा कृषि पद्धतीचे व्यवसायाचे ज्ञान व ग्रामीण जीवनाचा अनुभव असेल अशा उमेदवारांना प्राधान्य.

विस्तार अधिकारी (शिक्षण)

कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची बी.ए./बी.कॉम./ बी.एस.सी. ही पदवी किमान ५०% गुणांसह उत्तीर्ण केली असेल आणि ज्यांनी कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची बी.एड. अथवा समकटा पदवी किमान ५०% गुणांसह उत्तीर्ण केली असेल आणि ज्यांना मान्यताप्राप्त प्राथमिक / माध्यमिक, उच्च माध्यमिक विद्यालय, अध्यापक विद्यालयातील शासनमान्य पदावरील सक्षम प्राधिकाऱ्याने वैयक्तीक मान्यता दिलेला किमान तीन वर्षाचा अध्यापनाचा किंवा प्रशासनाचा अनुभव आहे, असे उमेदवार

विस्तार अधिकारी (सांख्यिकी)

संविधिमान्य विद्यापिठाची विज्ञान, कृषि, वाणिज्य किंवा वा शाखेची अर्थशास्त्र किंवा गणित अथवा सांख्यिकी विषयासह प्रथम अगर द्वितीय वर्गातील पदवी धारण करीत असतील किंवा ज्याना नमुना सर्वेक्षण करण्याचा अनुभव असेल, किंवा पदवी व अनुभव दोन्ही असतील असे उमेदवार परंतु अशा विषयांपैकी एका विषयाची स्नातकोत्तर पदवी धारण करणान्या उमेदवारांना अधिक पसंती देण्यात येईल.

विस्तार अधिकारी (पंचायत)

जे उमेदवार विद्यापीठाची पदवी धारण करीत असतील असे उमेदवार.

परीक्षेचे स्वरूप, दर्जा व निवडीची कार्यपद्धती जिल्हा परिषद भरती

  • सर्व पदांकरीता ऑनलाईन पद्धतीने परीक्षा घेतली जाईल,
  • ऑनलाईन परीक्षेतील प्रश्नांचा स्तर हा त्या त्या पदाच्या सेवाप्रवेश नियमांमध्ये विहित करण्यात आलेल्या किमान शैक्षणिक अर्हतेच्या दर्जापेक्षा निम्न असणार नाही..
  • ज्या पदांकरिता पदवी ही कमीतकमी अर्हता आहे अशा पदांकरिता परीक्षेचा दर्जा भारतातील मान्यताप्राप्त विद्यापीठांच्या पदवी परीक्षेच्या दर्जाच्या समान राहिल. परंतु त्यापैकी मराठी व इंग्रजी या विषयांच्या प्रश्नपत्रिकेचा दर्जा उच्च माध्यमिक शालांत परीक्षेच्या (इयत्ता १२ वी दर्जाच्या समान राहिल.
  • कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), औषध निर्माण अधिकारी, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक, विस्तार अधिकारी (कृषि) या तांत्रिक संवर्गातील पदांच्या तांत्रिक भागाचे प्रश्न इंग्रजी माध्यमातून राहतील,
  • ऑनलाईन पद्धतीने परीक्षा वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपात आयोजित केली जाईल. प्रत्येक प्रश्नास एकूण २ गुण याप्रमाणे १०० प्रश्नांसाठी २०० गुणांची परीक्षा घेण्यात येईल. त्याकरीता १२० मिनीटे इतका कालावधी देण्यात येईल.
  • गुणवत्ता यादीमध्ये अंतर्भाव होण्यासाठी उमेदवारांनी एकूण गुणाच्या किमान ४५% गुण प्राप्त करणे आवश्यक राहिल..
  • महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग यांचे कडील शासन निर्णय क्रमांक प्रनिम १२२२/प्र.क्र.५४/का.१३- अ दिनांक ४ मे २०२२ अन्वये गट-क मधील पदासाठी मौखिक परीक्षा घेतली जाणार नाही.
  • उमेदवारांना परीक्षेकरीता अर्ज करताना कोणतीही कागदपत्रे सादर करण्याची आवश्यकता नाही.
  • तात्पुरत्या निवड यादीमध्ये समावेश होणाऱ्या उमेदवारांना कागदपत्र पडताळणीकरीता पाचारण करण्यात येईल

jilha parishad bharti syllabus – check here (जिल्हा परिषद भरती अभ्यासक्रम पहा)

error: Content is protected !!
Scroll to Top