You are currently viewing पिंपरी चिंचवड महानगरपालिका समुह संघटक भरती
पिंपरी चिंचवड महानगरपालिका समुह संघटक भरती

पिंपरी चिंचवड महानगरपालिका समुह संघटक भरती

  • Post category:Home

पिंपरी चिंचवड महानगरपालिका समुह संघटक भरती – पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या समाज विकास विभागा अंतर्गत अस्थायी पदावर एकुण ०५ समुह संघटकांची सेवा ०६ महिने कालावधीसाठी एकवट मानधनावर घ्यावयाची असल्यने अनुभवधारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत . सदर पदाचे आरक्षण , अर्जाचा नमुना , शैक्षणिक अर्हता , अनुभव , सदर पद भरतीसाठी आवश्यक त्या अटी व शर्ती पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या www.pcmcindia.gov.in या संकेतस्थळावर नोकरभरती ( recruitment ) या सदरामध्ये प्रसिध्द करण्यात आलेला आहे . इतर मह्त्वाचे नोकरी अपडेट येथे पहा .

पिंपरी चिंचवड महानगरपालिका भरती अर्ज देण्याचे ठिकाण

अर्ज पिंपरी चिंचवड महानगरपालिका , समाज विकास विभाग , मुख्य प्रशासकीय इमारत , तळमजला , पिंपरी , पुणे ४११०१८ या पत्त्यावर दि .08 / 06 / 2022 पर्यंत प्रत्यक्ष अथवा रजिस्टर पोस्टाने पोहोचतील अशा पध्दतीने पाठविण्यात यावेत .

पिंपरी चिंचवड महानगरपालिका समुह संघटक भरती

समुह संघटक भरती पदांसाठी वय मर्यादा

राखीव प्रवर्गासाठी वयोमर्यादा ४३ वर्षे व प्रवर्गासाठी ३८ वर्ष इतकी राहील .

शैक्षणिक पात्रता

समुह संघटक पदासाठी एम . एस . डब्ल्यू तसेच वस्तीपातळीवरील कामाचा किमान १ वर्षाचा अनुभव तसेच पिंपरी चिंचवड महानगरपालिका समाज विकास विभागाकडील किमान १ वर्षाचा अनुभव असणा – यास प्राधान्य .

अर्जासोबत कागदपत्रे

  • जन्म तारखेच्या पुराव्यासाठी जन्म दाखला किंवा शाळा सोडल्याचा दाखला अथवा जन्म तारखेची नोंद
  • शालांत परिक्षेच्या उत्तीर्ण प्रमाणपत्राची स्वयंसाक्षांकित प्रत जोडणे आवश्यक आहे
  • अर्जदार महिला विवाहीत असल्यास , शासनमान्य विवाह नोंदणी प्रमाणपत्राची अथवा शासनमान्य गॅझेटची ( राजपत्र ) स्वयंसाक्षांकित प्रत जोडणे आवश्यक आहे .
  • अर्जदाराने पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या संकेत स्थळावर प्रसिध्द केलेला विहीत नमुन्यातील अर्ज सुवाच हस्ताक्षरात भरून , स्वतःचा नव्याने काढलेला पासपोर्ट साईजचा फोटो , आधारकार्ड , वयाचा पुरावा . शैक्षणिक अर्हता . जातीचे प्रमाणपत्र , अनुभवाचा पुरावा इ . सर्व कागदपत्रांच्या सत्यप्रतींसह पाठवावेत .

एकूण पदांची संख्या

एकूण पदांची संख्या
एकूण पदांची संख्या

समूह संघटक पदासाठी एकूण महिना पगार किती

२५८९५ महिना मानधन

महत्वाच्या लिंक

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात येथे पहा