You are currently viewing महात्मा ज्योतिबा फुले संशोधन अधिछात्रवृत्ती (MJPRF) 2022-23
महात्मा ज्योतिबा फुले संशोधन अधिछात्रवृत्ती (MJPRF) – वर्ष 2022-23

महात्मा ज्योतिबा फुले संशोधन अधिछात्रवृत्ती (MJPRF) 2022-23

  • Post category:Home

MAHAJYOTI MJPRF Scheme online apply

(MAHAJYOTI) महात्मा ज्योतिबा फुले संशोधन अधिछात्रवृत्ती (MJPRF) 2022-23- महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था महाज्योती नागपुर मार्फत महाराष्ट्रातील नॉनक्रिमीलेअर गटातील इतर मागासवर्गीय विमुक्त जाती ,भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील पीएचडी करिता नोंदणी केलेल्या उमेदवारांना अधिकतम ५ वर्षाच्या कालावधीसाठी महात्मा ज्योतिबा फुले संशोधन अधिछात्रवृत्ती (MJPRF) प्रदान करण्याकरीता महाज्योतीच्या अधिकृत वेब संकेतस्थळावरती ऑनलाइन स्वरूपात अर्ज मागवण्यात येत आहेत अर्ज करण्याची अंतिम मुदत 31 मे 2022 सायंकाळी ६ वाजेपर्यंत असेल. योजनेच्या अटी आणि शर्ती या सर्व देण्यात आलेल्या त्या खालील प्रमाणे असणार आहेत.

What is the MAHAJYOTI MJPRF 2022-23

Mahatma Jyotiba Phule Research and Training Institute Mahajyoti Nagpur to provide more scholarships for a period of five years to the candidates registered for PhD. student belong to Other Backward Classes, Nomadic Tribes and Special Backward Classes in Maharashtra.

योजनेचे नाव :

(MAHAJYOTI) महात्मा ज्योतिबा फुले संशोधन अधिछात्रवृत्ती (MJPRF) 2022-23 : महात्मा ज्योतिबा फुले यांनी महाराष्ट्रातील बहुजन समाजातील विद्यार्थ्यांना शिक्षणाची दारे उघडण्यासाठी त्यांना शिक्षण देण्याची चळवळ उभी केली . त्यातून बहुजन समाजाला आर्थिक , सामाजिक , राजकीय व सांस्कृतिक प्रगतीच्या वाटा सापडल्या व बहुजन समाज विकासाच्या मुख्य प्रवाहाचा भाग बनला . महात्मा ज्योतिबा फुले यांच्या विचार व कार्याचा हा वारसा महाराष्ट्र शासनाद्वारे पुढे नेण्यासाठी महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था ( महाज्योती ) , नागपूर या ओ.बी.सी..बहुजन कल्याण विभागाच्या स्वायत्त संस्थेमार्फत महाराष्ट्रातील इतर मागास वर्गीय ( ओ.बी.सी. , विमुक्त जाती . भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील दरवर्षी १५० उमेदवारांना पीएच.डी. करण्यासाठी अधिकतम ५ वर्षांसाठी आर्थिक सहाय्य देण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या बार्टी , पुणे व सारथी , पुणे च्या धर्तीवर महात्मा ज्योतिबा फुले संशोधन अधिछात्रवृत्ती ( MJPRF ) ही योजना कार्यान्वित करण्याचे विचाराधीन होते .

त्यानुसार या योजनेअंतर्गत भारतातील मान्यताप्राप्त विद्यापीठ / महाविद्यालय / संस्था यामध्ये कोणत्याही विषयात पूर्णवेळ व नियमितरित्या पीएच.डी. करणाऱ्या महाराष्ट्रातील इतर मागास वर्गीय ( ओ.बी.सी. , विमुक्त जाती भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील उमेदवारांना अर्थ सहाय्य देण्यात येणार आहे .

योजनेचा उद्देश :

महाज्योती , नागपूर मार्फत महाराष्ट्रातील इतर मागास वर्गीय ( ओ.बी.सी. , विमुक्त जाती भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील नॉन क्रिमीलेअर गटातील उमेदवारांना भारतातील मान्यताप्राप्त विद्यापीठ / महाविद्यालय / संस्था यामध्ये कोणत्याही विषयात पूर्णवेळ व नियमितरित्या पीएच.डी. करण्यासाठी अधिकतम ५ वर्षांसाठी अर्थसहाय्य करणे .

अधिछात्रवृत्ती साठी पात्रता अर्ज कोणाला करता येईल?

  • १. उमेदवार व्यक्ती महाराष्ट्राची रहिवासी असावी तसेच इतर मागास वर्गीय ( ओ.बी.सी. विमुक्त जाती- भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्ग यापैकी असावी .
  • २. उमेदवार व्यक्ती उत्पन्नाच्या नॉन क्रिमीलेअर गटातील असावी .
  • ३ . उमेदवार व्यक्तीने पदव्युत्तर पदवी परीक्षा ही मान्यताप्राप्त विद्यापीठ / महाविद्यालय मार्फत उत्तीर्ण केलेली असावी .
  • ४. उमेदवार व्यक्तीने पीएच.डी. धारण करण्याकरिता भारतातील मान्यताप्राप्त विद्यापीठ / महाविद्यालय / संस्थायेथे नोंदणी केलेली असावी .
  • नोंदणी नसलेली व्यक्ती योजनेच्या लाभाकरिता अर्ज करण्यास पात्र राहणार नाही .
  • ५. उमेदवार व्यक्तीस पीएच.डी. अभ्यासक्रमासाठी विद्यापीठ / महाविद्यालय / संस्था यांचेकडून अर्थसहाय्य अथवा अधिछात्रवृत्ती मिळत असल्यास अशी व्यक्ती योजनेच्या लाभाकरिता पात्र राहणार नाही .
  • ६. उमेदवार व्यक्ती पीएच.डी. करीत असलेल्या कालावधीत कोणत्याही स्वरूपाचा पूर्ववेळ अथवा अर्धवेळ रोजगार / स्वयंरोजगार करीत असल्यास किंवा कोणत्याही प्रकारचे अर्थसहाय्य / मानधन / शिष्यवृत्ती घेत असल्यास योजनेचा लाभ घेण्यास पात्र राहणार नाही .
  • ७. ज्या उमेदवार व्यक्तीनी विद्यापीठ / संस्था / महाविद्यालयात पीएच.डी. करीता नोंदणी केलेली आहे . असे उमेदवार योजनेचा लाभ घेण्यास पात्र आहे .

MJPRF अर्थसहाय्याचा कालावधी किती असतो?

  • १. महात्मा ज्योतिबा फुले संशोधन अधिछात्रवृत्ती ( MJPRF ) चा कालावधी हा पीएच.डी. करिता नोंदणीच्या दिनांकापासून संशोधन प्रकल्प विद्यापीठात सादर होण्याच्या तारखेपर्यंत किंवा नोंदणीनंतर ५ वर्षासाठी यापैकी जे आधी होईल याप्रमाणे निश्चित करण्यात येत आहे .
  • २. पीएच.डी. अभ्यासक्रमासाठी संबंधित विद्यापीठ / महाविद्यालय / संस्थेने मुदतवाढ दिल्यास , ५ वर्षापलीकडे होणाऱ्या मुदतवाढी करिता महाज्योती मार्फत कोणत्याही परिस्थितीत अधिछात्रवृत्तोस मुदतवाढ देण्यात येणार नाही .
  • ३. उमेदवार व्यक्तीने कोणत्याही कारणाने नोंदणी दिनांकापासून ते विद्यापीठात पीएच.डी. करिता रुजू दिनांकापर्यंत कालावधीत Gap घेतला तर उमेदवारास स्वयंस्पष्ट कारणासह संबंधित विद्यापीठ / महाविद्यालय / संस्थेकडून गॅप प्रमाणपत्र महाज्योतीस सादर करणे बंधनकारक राहील . संबंधित Gap कालावधीसाठी महाज्योती मार्फत कोणत्याही परिस्थितीत अर्थसहाय्य दिले जाणार नाही .
  • ४. उमेदवाराने पीएच.डी. करीता २ वर्ष पूर्ण केल्यानंतर संबंधित संस्थेतील / विद्यापीठ / महाविद्यालय मधील मुल्यांकन समिती कडून संशोधन प्रक्रियेचे मुल्यांकन करून घेणे बंधनकारक आहे . सदर प्रक्रिया २ महिन्याच्या आत न होऊ शकल्यास संबंधित विद्यापीठ / महाविद्यालय / संस्थेच्या प्राधिकृत अधिकाऱ्याकडून विलंब झाल्याबाबतचा स्वयंस्पष्ट कारणासह अहवाल सादर करावा . अश्या परिस्थितीत पुढील ३ वर्षांसाठीची शिष्यवृत्ती ही असा अहवाल मान्य झाल्याच्या दिनांकापासून देण्यात येईल याची नोंद घ्यावी .

महात्मा ज्योतिबा फुले संशोधन अधिछात्रवृत्ती (MJPRF) How much financial support meets per months for MJPRF

  1. अधिछात्रवृत्ती पीएच.डी. रु .३१,००० / – प्रति माह

अधिछात्रवृत्ती ( MJPRF ) अर्ज साठी लागणारी कागदपत्रे

अधिछात्रवृत्ती ( MJPRF ) अर्ज साठी लागणारी कागदपत्रे
अधिछात्रवृत्ती ( MJPRF ) अर्ज साठी लागणारी कागदपत्रे

MJPRF अर्थसहाय्यासाठी आवश्यक विवरणपत्रे / कागदपत्रे :

  • १. रुजू प्रमाणपत्र – लाभार्थ्याने विद्यापीठ / संस्था / महाविद्यालयाचे रुजू प्रमाणपत्र ( मार्गदर्शक व संशोधन केंद्र प्रमुख यांच्या संयुक्त स्वाक्षरीचे ) इतर सर्व आवश्यक कागदपत्रांसोबत महाज्योतीस सादर करावे , जे उमेदवार अंतिम निवड होण्याआधी रोजगार करीत असतील त्यांनी रोजगार करीत असलेल्या आस्थापनेने कार्यमुक्त केल्याचा अहवाल रुजू प्रमाणपत्र सोबत सादर करावा .
  • २ . अर्धवार्षिक प्रगती अहवाल – लाभार्थ्याने संशोधनाचा प्रगती अहवाल नोंदणीच्या दिनांकापासून दर ६ महिन्यांनी सादर करणे आवश्यक आहे .
  • ३. आकस्मिक खर्च भत्त्याचे उपयोगिता प्रमाणपत्र : लाभार्थ्याने दरवर्षी नोंदणीच्या दिनांकापासून वर्ष पूर्ण होताच आकस्मिक खर्चाच्या भत्त्याचे उपयोगिता प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक आहे .
  • ४. मुदतवाढ प्रमाणपत्र विद्यापीठ / महाविद्यालय / संस्था यांनी पीएच.डी. करिता मुदतवाढ दिली असल्यास मुदतवाढ प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे .
  • ५. हजेरी प्रमाणपत्र : मार्गदर्शकाकडून हजेरी प्रमाणपत्र प्रमाणित करून देणे बंधनकारक आहे .. ६. संशोधन पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र / सुरु असल्याचे प्रमाणपत्र
  • ७. पीएच.डी. घोषित झाल्याचे प्रमाणपत्र

निवड प्रक्रिया महात्मा ज्योतिबा फुले संशोधन अधिछात्रवृत्ती (MJPRF)

  • १. उमेदवार व्यक्तीने ऑनलाईन पद्धतीने अर्ज सोबत सर्व आवश्यक कागदपत्रे सादर करावे .
  • २. उमेदवारांच्या कागदपत्रांचे छाननी नंतर पात्र उमेदवारांची यादी जाहीर करण्यात येईल .
निवड प्रक्रिया महात्मा ज्योतिबा फुले संशोधन अधिछात्रवृत्ती (MJPRF)
निवड प्रक्रिया महात्मा ज्योतिबा फुले संशोधन अधिछात्रवृत्ती (MJPRF)

MJPRF 2022-23 साठी महत्वपूर्ण लिंक

महात्मा ज्योतिबा फुले संशोधन अधिछात्रवृत्ती (MJPRF) योजनेचा तपशिल PDFयोजनेचा तपशिल PDF
MAHAJYOTI अधिकृत वेबसाईट https://mahajyoti.org.in/en/home/
अर्ज करण्यासाठी शेवट तारीख ३१ मे २०२२
MJPRF Apply Onlineअर्ज येथे करा