निःशुल्क अनिवासी प्रशिक्षण ( कोचिंग )(barti)डॉ . बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था,पुणे मार्फत

स्पर्धा परिक्षांच्या पूर्वतयारी करिता निःशुल्क अनिवासी प्रशिक्षण ( कोचिंग ) खालील नमूद केलेल्या प्रशिक्षण केंद्रांच्या माध्यमातून राबविण्यात येणार आहे . यामध्ये लेखी परीक्षा व शारीरीक चाचणी यांचे प्रशिक्षण होईल . अनु . जाती मधील इच्छुक व पात्र उमेदवारांनी संबंधित जिल्ह्यातील केंद्राशी संपर्क साधून त्या केंद्राकडे अर्ज करावा .

https://barti.maharashtra.gov.in या वेब साईटवरून ‘ Notice Boand ‘ च्या सदराखाली पोलीस व मिलीटरी भरती लिंकवरून अर्ज डाऊन लोड करून किंवा खालील नमुद प्रशिक्षण केंद्राच्या कार्यालयातून प्राप्त करून खालील पैकी ज्या ठिकाणी त्यांना प्रशिक्षण घ्यावयाचे आहे . त्या केंद्रावर दि . ० ९ / १२ / २०२१ पर्यंत परिपूर्ण भरलेला अर्ज कागद पत्रांसह सादर करावा .

डॉ . बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था ( बार्टी ) , पुणे २८ , क्वीन्स गार्डन , कॅम्प पुणे ४११००१ . ( सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्था ) * Website : http // : barti.maharashtra.gov.in पोलीस व मिलीटरी भरती स्पर्धा परिक्षेच्या पूर्वतयारी करिता अनुसूचित जातीच्या विद्याथ्र्यांकडून निःशुल्क अनिवासी प्रशिक्षण ( कोचिंग ) साठी अर्ज मागविण्यात येत आहे

खालील जिल्ह्यात प्रशिक्षण होईल (barti)

बीड भंडारा बुलढाना चंद्रपुर धुळे गडचिरोली हिंगोली हिंगोली हिंगोली जालना मुंबई नागपूर नागपुर नाशिक नाशिक उस्मानाबाद पालघर परभणी परभणी पुणे जालना मुंबई नागपूर नागपुर नाशिक नाशिक उस्मानाबाद पालघर परभणी परभणी नवी मुंबई रत्नागिरी सांगली सातारा

पात्रता :

१ ) महाराष्ट्र राज्याचा अनुसूचित जाती मधील उमेदवार असावा .

२ ) अर्जदाराचे वय १ ९ ते ३२ पर्यन्त असावे .

३ ) अर्जदार किमान १० वी १२ वी उत्तीर्ण असावा .

४ ) महिला उमेदवारांची उंची किमान १५५ से.मी. असणे आवश्यक आहे .

५ ) पुरुष उमेदवारांना उंची किमान १६५ से.मी. असणे आवश्यक आहे . तसेच छाती किमान ७ ९ से . मी . व फुगवून ७ ९ + ५ से.मी. असणे आवश्यक आहे .

६ ) पोलिस व मिलीटरी भरतीच्या शारीरीक क्षमता चाचणीच्या पात्रतेनुसार उमेदवारांना निकष लागू राहतील ,

प्रशिक्षणाच्या अटी व शर्ती :

१ ) वर नमुद प्रशिक्षण केंद्रांकडे अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख ० ९ / १२ / २०२१ आहे .

२ ) प्रशिक्षण कालावधी ४ महिन्यांचा राहील ,

३ ) विहीत नमुन्यामध्ये आवश्यक कागदपत्रांसहीत अर्ज दाखल केलेल्या पात्र उमेदवारांची चाळणी परीक्षा ( screening test ) वर नमूद केंद्रांमार्फत दिनांक १२/१२/२०२१ रोजी दुपारी ०३.०० वा . घेण्यात येईल . उमेदवारांची गुणानुक्रमे प्रशिक्षणासाठी निवड करण्यात येईल …

४ ) प्रशिक्षण काँचिंग क्लास दि . १५ डिसेंबर , २०२१ व त्या दरम्यान सुरु करण्यात येईल ,

( ५ ) निवड झालेल्यापैकी पात्र विद्यार्थी प्रशिक्षणाकरीता लेखी व शारीरीक क्षमता चाचणी पूर्व तयारी करीता रोज ४ तास व त्यापेक्षा जास्त कालावधीकरीता उपस्थित राहील . तसेच विद्यार्थी एकूण दरमहा ७५ टक्के पेक्षा जास्त कालावधी प्रशिक्षणास उपस्थित राहील त्या विद्यार्थ्यांना दरमहा रुपये ६००० / विद्यावेतन ( Stipend ) देण्यात येईल ,

६ ) विद्यार्थ्यांना रु . ५००० / – एवढया किंमतीचे नि : शुल्क अभ्यास साहित्य व पुस्तकांचा संच बार्टी व्दारे प्रशिक्षण केंद्रा मार्फत देण्यात येईल . तसेच निवड झालेल्या विद्यार्थ्याना बुट व इतर आवश्यक साहित्य खरेदी करण्याकरीता रु . ३००० / – इतका निधी बाटी मार्फत एक वेळ दिला जाईल .

७ ) सदर प्रशिक्षण ( Couching ) कार्यक्रम ३० प्रशिक्षण केंद्रामार्फत राबविण्यात येणार आहे . तरी त्या – त्या जिल्ह्यामध्ये काँचिंग घेण्यासाठी इच्छुक उमेदवार त्या जिल्ह्यातील संबंधित प्रशिक्षण केंद्रावर जाहिरातीनुसार अर्ज करु शकतील .

८ ) विहीत नमुन्यातील अर्ज वर नमुद केलेल्या प्रशिक्षण केंद्रांच्या कार्यालयाकडून किंवा बाटा , पुणे या संस्थेच्या वेबसाईट वरुन प्राप्त करुन भरता येईल . अधिक माहितीसाठी वर नमुद प्रशिक्षण केंद्रांच्या कार्यालयाशी संपर्क साधावा .

(more…)

Continue Readingनिःशुल्क अनिवासी प्रशिक्षण ( कोचिंग )(barti)डॉ . बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था,पुणे मार्फत

End of content

No more pages to load