खुशखबर!! कोतवाल भरती २०२३; निवड प्रक्रिया शासन निर्णय प्रसिद्ध

पुरवठा निरीक्षक भरती २०२३ GR येथे पहा

महसूल विभाग कोतवाल संवर्गाच्या पदभरती बाबत सुधारित मार्गदर्शन

कोतवाल साठी अर्ज येथे करा

राज्यातील महसूल विभागाच्या अखत्यारीत कार्यरत असलेला कोतवाल संवर्ग हा अवर्गीकृत मानधन तत्वावरील पद असून शासकीय कर्मचारी नाही. कोतवाल संवर्गाकरीता दिनांक ०७ मे, १९५९ च्या शासन निर्णयान्वये स्वतंत्र सेवाप्रवेश नियम विहित करण्यात आलेले आहेत. तसेच कोतवाल संवर्गाची पदे भरतांना राज्यात सर्व ठिकाणी समानता येण्यासाठी महसूल व वन विभागाच्या दिनांक ०५ सप्टेंबर, २०१३ च्या शासन निर्णयान्वये सुधारीत नियम व मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात आलेल्या आहेत.

तथापि, आता शासनाने भूतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कक्षेतील नामनिर्देशनाच्या कोट्यातील पदे भरतांना मौखिक परीक्षा / मुलाखत न घेण्याबाबतचे धोरण ठरविले आहे. तसेच शासनाने सरळसेवा भरतीसाठी नामनिर्देशनाव्दारे पदभरती करताना वेळोवेळी सुधारित केलेल्या बिंदुनामावलीची अंमलबजावणी व आरक्षण कायद्यातील तरतुदींचे पालन करणे आवश्यक आहे. सबब, सदरच्या बाबी विचारात घेता, कोतवाल संवर्गाच्या पदभरतीसंदर्भात महसूल व वन विभागाच्या दिनांक ०५ सप्टेंबर, २०१३ च्या शासन निर्णयातील सुधारित नियम व मार्गदर्शक तत्वांमधील अनुक्रमांक (४) व (५) मध्ये योग्य त्या सुधारणा करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्यास अनुसरुन शासन पुढीलप्रमाणे निर्णय घेत आहे.

कोतवाल भरती मध्ये काय बदल झाले पहा

शासन निर्णय – फक्त परीक्षा घेतली जाईल या शासन निर्णयानुसार

कोतवाल संवर्गाची पदे नामनिर्देशनाने भरतांना १०० गुणांची लेखी परीक्षा घेण्यात यावी. लेखी परीक्षेसाठी वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरुपाचे ५० प्रश्न असावेत. त्यानुसार सदर लेखी परीक्षेमध्ये उमेदवारांनी प्राप्त केलेल्या गुणांच्या आधारे निवडसूची तयार करुन निवडसूचीतील पात्र उमेदवारांची गुणवत्तेनुसार निवड करण्यात यावी.

कोतवाल भरती साठी निवड प्रक्रिया

  • १०० गुणांची लेखी परीक्षा घेण्यात यावी.
  • ५० प्रश्न
  • वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरुप

सविस्तर शासन निर्णय GR डाउनलोड करा

error: Content is protected !!