
तलाठी भरती मेगा भरती २०२३ नवीन gr प्रसिद्ध – महाराष्ट्र राज्य मधील तलाठी भरती आज नवीन शासन निर्णय प्रसिद्ध झाला आहे ज्यामध्ये नवीन साजा नुसार पदनिर्मिती करण्यासाठी मंत्री मंडळ कडून मान्यता देण्यात आली आहे . त्याचबरोबर महसूल विभाग मधील मंडळ अधिकारी साठी नवीन महसूल मंडळ निर्मिती करण्यात आली आहे या मध्ये – तलाठी ३११० नवीन पदे व महसूल मंडळ अधिकारी साठी ५१८ पदांची नवीन भरती केली जाणार आहे . व या अगोदर १०१२ जुन्या पदांना अगोदरच मान्यता आहे , तर सर्व नवीन व जुन्या जागा एकत्रित करून एकूण तलाठी साठी ४१२२ पदांची जाहिरात प्रसिद्ध करण्याची प्रक्रिया सुरु केली आहे.