You are currently viewing District court Gadchiroli Recruitment

District court Gadchiroli Recruitment

  • Post category:Home

जिल्हा न्यायालय गडचिरोली भर्ती 2021

अर्ज स्विकारण्याची अंतिम तारीख : १६ / १० / २०२१ .

पदाचे नाव– माळी

माळी पदाकरीता जाहिरात जिल्हा न्यायालय , गडचिरोली या आस्थापनेवरील माळीचे ०१ पदासाठी उमेदवाराची निवड यादी ०२ उमेदवारांची प्रतिक्षा यादी तयार करणेकरीता पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत .


उमेदवारांनी जाहिरातीत दिलेल्या नमुन्यात नोंदणीकृत डाक पोच पत्राद्वारे ( आर.पी.ए.डी. ) किंवा शिघ्र डाक सेवा ( स्पिड पोस्ट ) द्वारे माळी या पदाकरीता अर्ज , असे लिफाफ्यावर लिहून प्रबंधक , जिल्हा न्यायालय , गडचिरोली ( यानंतर ज्यास संक्षेपाकरीता जिल्हा न्यायालय असे संदर्भात केलेले आहे ) यांच्याकडे दिनांक १६/१०/२०२१ रोजी सायंकाळी ०५.०० वाजेपर्यंत अथवा त्यापुर्वी पोहचतील अशा अंदाजाने आपले अर्ज पाठवावेत .


या तारखेनंतर आलेले अर्ज अथवा ईतर मार्गाने पाठविलेले किंवा लिफाफ्यावर माळी पदाकरीता अर्ज असे नमूद न केलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत , याची उमेदवारांनी नोंद घ्यावी .


माळी निवड यादीसाठी माळी पदाची संख्या : ०१

व प्रतिक्षा यादीसाठी पदसंख्या – ०२

माळी पदाच्या पात्रतेकरीता उमेदवार : अर्हता :

अ ) शरीर प्रकृतीने सुदृढ व पदाची कर्तव्ये पार पाडण्यासाठी कार्यक्षम असावा .

ब ) उमेदवार हा इयत्ता ७ वी उत्तिर्ण असावा .

क ) उमेदवाराकडे शासन मान्यताप्राप्त विद्यापीठाचा एक वर्षाचा माळी प्रशिक्षणाचा डिप्लोमा ( प्रमाणपत्र ) तसेच माळी कामाचा अनुभव असल्यास त्यांना प्राधान्य देण्यात येईल .

ड ) दिनांक २८/०३/२००६ नंतर जन्मास आलेल्या मुलांमुळे उमेदवाराच्या हयात मुलांची संख्या एकुण ०२ पेक्षा जास्त नसावी .

वयोमर्यादा : महाराष्ट्र शासन , सामान्य प्रशासन विभाग , शासन निर्णय क्रमांक एसआरव्ही २०१५ / प्र.क्र .४०४ / कार्या १२ , दिनांक २५/१०/२०१६ अन्वये खुला / सर्वसाधारण प्रवर्गातील उमेदवारांसाठी किमान १८ वर्षे व कमाल ३८ वर्षे व मागासवर्गीय उमेदवारांसाठी किमान १८ वर्षे आणि कमाल ४३ वर्षे राहील .

वेतनस्तर : एस –१ , १५०००-४७६००

नोकरीचे ठिकाण– गडचिरोली महाराष्ट्र

जाहीरात पहा