तलाठी साझा पुनर्रचना समितीच्या अहवालाच्या अनुषंगाने पुनर्रचना करण्यात आलेल्या तलाठी साझे व महसूल मंडळाकरिता पदनिर्मिती करणेबाबत. महसूल व वन विभाग शासन निर्णय.
शासन निर्णय येथे पहा
प्रस्तावना :-
महाराष्ट्र राज्य तलाठी महासंघाच्या मागण्यांसंदर्भात अभ्यास करुन शासनांस व्यवहार्य व अभ्यासपूर्ण शिफारसी करण्यासाठी संदर्भीय क्रमांक १ वरील शासन निर्णय, दिनांक ०३.०२.२०१४ व शासन शुध्दीपत्रक दिनांक १८.०२.२०१४ अन्वये विभागीय आयुक्त, नागपूर यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली होती.
तलाठी साझा पुनर्रचना समितीने मंत्रिपरिषदेला दि.२६/०४/२०१६ रोजी सादर केलेला अहवाल व अहवालातील शिफारशींची अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने पुढील निर्णय घेण्यासाठी मा.मंत्री (महसूल) यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ उपसमिती गठीत करण्यात यावी व मंत्रिमंडळ उपसमितीचा अहवाल मंत्रिमंडळाच्या अंतिम निर्णयार्थ सादर करण्यात यावा असा निर्णय घेतला. त्यानुषंगाने संदर्भीय क्रमांक ३ वरील शासन निर्णय दिनांक १६.५.२०१६ अन्वये मा. मंत्री (महसूल) यांच्या अध्यक्षतेखाली गठीत करण्यात आलेल्या मंत्रिमंडळ उपसमितीने अहवाल मंत्रीमंडळाच्या अंतिम मान्यतेसाठी दिनांक १६.०५.२०१७ रोजी झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत सादर करण्यात आला. मंत्रीमंडळाने घेतलेल्या निर्णयानुसार राज्यातील तलाठी साझांची पुनर्रचना करुन महसूली विभागनिहाय नवीन तलाठी साझे व महसूली मंडळे स्थापन करण्यास व सदर कार्यालये कार्यान्वित करण्यासाठी अनुक्रमे संदर्भाधिन क्र. ८ व ९ येथील शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आली.
आता, मा. मंत्रीमंडळाच्या दि. १६.०५.२०१७ च्या बैठकीतील निर्णयानुसार नव्याने स्थापन करण्यात आलेल्या तलाठी साझे व मंडळ कार्यालयांसाठी एकूण ३११० तलाठी व ५१८ मंडळ अधिकारी याप्रमाणे एकूण ३६२८ पदे निर्माण करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.
शासन निर्णय :-
तलाठी साझा पुनर्रचनेनुसार विहीत केलेल्या निकषाच्या अनुषंगाने संबंधित विभागीय आयुक्त यांचेकडून महसूली विभागनिहाय प्राप्त माहितीस अनुसरुन वाटप करण्यात आलेल्या ३११० तलाठी साझे व ५१८ महसूली मंडळ कार्यालयांसाठी ३११० तलाठी व ५१८ मंडळ अधिकारी असे खालीलप्रमाणे एकूण ३६२८ पदे निर्माण करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे.
तलाठी भरती २०२३
महसूल विभागाचे नाव | तलाठी पदे |
कोकण | ५५० |
नाशिक | ६८९ |
पुणे | ६०२ |
छत्रपति संभाजी नगर | ६८५ |
नागपूर | ४७८ |
अमरावती | १०६ |
एकूण | ३११० |