आरोग्य विभाग भरती PCMC प्रवेश पत्र व परीक्षा माहिती – पिंपरी चिंचवड महानगरपालिका , पिंपरी जाहीरात क्रमांक १२६५/२०२१ चे अनुषंगाने जाहीर निवेदन पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या स्थायी आस्थापनेवरील वैद्यकीय अधिकारी , स्टाफ नर्स , सांख्यिकी सहाय्यक , लॅब टेक्निशियन , एक्स रे टेक्निशियन , फार्मासिस्ट व ए.एन.एम. रिक्त पदे सरळसेवा प्रवेशाने भरण्यासाठी , वर्तमानपत्रात जाहिरात प्रसिध्द करुन ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात आले आहेत . सदरच्या अर्ज केलेल्या उमेदवारांना ऑनलाईन परिक्षेसंदर्भात या निवेदनाद्वारे पुढीलप्रमाणे कळविण्यात येत आहे .
PCMC स्टाफ नर्स व इतर पदांची प्रवेश पत्र व परीक्षा बद्दल माहिती
- उपरोक्त पदांकरीता परीक्षा शनिवार दिनांक २५/०६/२०२२ रोजी दोन शिफ्टममध्ये सकाळी ९ .०० ते १०.३० व दुपारी १२.३० ते २.०० या वेळेत ऑनलाईन परिक्षा घेण्यात येणार आहे.
- प्रवेशपत्रे ( Admit Card ) महापालिकेच्या www.pcmc.india.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत
- प्रवेशपत्र ( Admit Card ) उपलब्ध करुन घेणेकरीता उमेदवारांनी ऑनलाईन फॉर्म भरतेवेळी नमूद केलेल्या ई – मेल वर त्यांचा परिक्षा क्रमांक पाठविण्यात येणार आहे .
- महापालिकेच्या www.pcmc.india.gov.in संकेतस्थळावरील भरती ( Recruitment ) या लिंकवर तसेच होमपेजवर आमच्या बद्दल ( About ) नोकरी विषयक ( Recruitment ) या मेनूमध्ये लिंक उपलब्ध करुन देण्यात येणार आहे . या लिंकमध्ये उमेदवारांनी परिक्षा क्रमांक व त्यांची जन्मदिनांक नमूद करून ऑनलाईन परिक्षेचे प्रवेशपत्र ( Admit Card ) उपलब्ध करुन घ्यावे.
- प्रवेशपत्रासोबत असलेल्या उमेदवारांसाठी महत्वपूर्ण सुचनांचे वाचन करुन त्यातील कागदपत्रे सोबत आणावीत , तसेच प्रवेशपत्रावर ( Admit Card ) नमूद केलेले परिक्षा केंद्रावर व वेळेत ऑनलाईन परिक्षेसाठी उपस्थित रहावे
- संकेतस्थळावरुन ऑनलाईन परिक्षेचे प्रवेशपत्र ( Admit Card ) उपलब्ध करुन घेणे , परिक्षेस वेळेवर उपस्थित राहणे ही संबंधित उमेदवारांची जबाबदारी आहे . संकेतस्थळावरील प्रवेशपत्र पाहिले नाही , अथवा डाऊनलोड करणेस अडचण आली इत्याही कारणे ऑनलाईन परिक्षेचे वेळेस विचारात घेतली जाणार नाहीत
- ऑनलाईन परिक्षेचे स्वरूप PCMC Exam syllabus – मराठी , इंग्रजी , सामान्यज्ञान , बौध्दिक चाचणी या विषयांवरील प्रत्येकी २५ प्रश्न याप्रमाणे १०० प्रश्न असतील व एका प्रश्नांकरीता प्रत्येकी ०२ गुण याप्रमाणे २०० गुणांची परिक्षा असेल .
- पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीत ऑनलाईन परिक्षा केंद्राची संख्या मर्यादीत आहे . तसेच सदर परिक्षा ही उमेदवार संख्या जास्त असलेने दोन शिफ्टमध्ये होणार आहे . त्यामुळे उमेदवारांनी ऑनलाईन फॉर्म भरतेवेळी अर्जामध्ये नमूद केलेल्या पत्त्यांचे अनुषंगाने परिक्षा केंद्र निश्चित करण्यात आली आहेत . त्याच परिक्षा केंद्रामध्ये उमेदवारांस ● ऑनलाईन परिक्षा देणे बंधनकारक आहे .
- उमेदवारांस कोणत्याही कारणास्तव परिक्षा केंद्र बदलून मिळणार नाही .
- एकापेक्षा अधिक पदास ऑनलाईन अर्ज केले आहेत . एकापेक्षा अधिक पदांस अर्ज केलेल्या उमेदवारांची ऑनलाईन परिक्षा एकदाच घेण्यात येणार असून एका • पदासाठीचे परिक्षेस प्राप्त केलेले गुण हे त्या उमेदवारांनी अर्ज केलेल्या अन्य पदांसाठी ग्राह्य धरण्यात येणार आहेत .
परीक्षासाठी महत्वाची पुस्तके येथे पहा
१-Sampurna Marathi Shbdsangrah Vyakaran – संपूर्ण मराठी शब्दसंग्रह व व्याकरण
२-इंग्रजी व्याकरण व शब्द संग्रह (English grammar by Sachin Jadhavar)
३-सामान्यज्ञान VASTUNISHTH SAMANYA GYAN NCERT BASED 11000 MCQ WITH EXPLANATION