You are currently viewing पदभरतीच्या अनुषंगाने सूचना (GR) 2022

पदभरतीच्या अनुषंगाने सूचना (GR) 2022

  • Post category:Home

प्रस्तावना :

पदभरतीच्या अनुषंगाने सूचना . महाराष्ट्र शासन , वित्त विभाग , शासन निर्णय , दिनांक : १२ एप्रिल.New GR maha gov

दीर्घकालीन वित्तीय स्थैर्यासाठी वेतनावरील खर्चाचा सरासरी दर हा महसूल वाढीच्या सरासरी दरापेक्षा अधिक असता कामा नये हे सर्वसाधारण तत्व पाळणे आवश्यक आहे . त्यादृष्टीने नवीन पदनिर्मिती तसेच पदभरती यावर संदर्भ क्र . १ येथील दि . ०२.०६.२०१५ च्या शासन निर्णयान्वये निर्बंध घालण्यात आले आहेत . तसेच शासन निर्णय , दिनांक ११.०२.२०१६ व दि . २५.०५.२०१७ अन्वये प्रशासकीय विभाग व त्यांच्या अधिपत्याखालील कार्यालयातील मंजूर पदांचा आढावा घेऊन सुधारित आकृतीबंध अंतिम करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत . दरम्यानच्या कालावधीत . कोव्हीड -१ ९ विषाणू संसर्गाच्या महामारीमुळे सन २०२०-२१ व सन २०२१-२२ या वित्तीय वर्षात अर्थव्यवस्थेवरील होणा – या परिणामांबाबत वित्तीय उपाययोजना करण्यासंदर्भात वित्त विभागाने अनुक्रमे दि .०४.०५.२०२० व दि . २४.०६.२०२१ च्या शासन निर्णयान्वये सविस्तर सूचना निर्गमित केल्या आहेत . वित्त विभागाच्या दि . २४.०६.२०२१ च्या शासन निर्णयातील परि.क्र .३ येथील तरतुदीनुसार , पदभरतीबाबत आदेश निर्गमित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती .

शासन निर्णय :

वरील संदर्भ क्र . १ ते ९ येथील शासन निर्णयातील पदभरती वगळता अन्य तरतुदीं कायम ठेवुन पदभरतीबाबत खालीलप्रमाणे सूचना देण्यात येत आहेत .

( १ ) ज्या प्रशासकीय विभागांनी वित्त विभागाच्या दि .११.०२.२०१६ च्या शासन निर्णयातील निर्देशाप्रमाणे सुधारित आकृतीबंध अंतिम मंजुर केले आहेत . अशा सुधारित आकृतीबंधातील महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेतील पदे वगळता अन्य पदे ५० टक्के भरण्यास अनुमती देण्यात येत आहे . वरील प्रमाणात पदभरतीसाठी एकही पद उपलब्ध होत नसल्यास किमान एक पद भरता येईल . शासन निर्णय क्रमांक : पदनि -२०२२ / प्र.क्र .२ / २०२२ / आ.पु.क .

( २ ) ज्या प्रशासकीय विभागांनी वित्त विभागाच्या दि .११.०२.२०१६ च्या शासन निर्णयातील निर्देशाप्रमाणे सुधारित आकृतीबंध अंतिम मंजुर केले आहेत , अशा सुधारित आकृतीबंधातील महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेतील रिक्त पदे १०० टक्के भरण्यास मुभा देण्यात येत आहे .

( ३ ) कोविड –१ ९ च्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर आर्थिक उपाययोजनांतर्गत दि .०४.०५.२०२० चे निर्बंध लागू झाल्यानंतरच्या कालावधीत उच्च स्तरीय सचिव समितीने / उपसमितीने मान्यता दिलेली महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेतील रिक्त पदे १०० टक्के भरण्यास मुभा देण्यात येत आहे .

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध असून , त्याचा संकेतांक २०२२०४१२१८००३५३१०५ असा आहे . हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे . महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने .

GR PDF

Click Here To Download PDF

Maharashtra Gov Website