district court maharashtra recruitment 2023: जिल्हा न्यायालय भरती यवतमाळ

Maharashtra district court Bharti 2023 – yavatmal district court

महाराष्ट्र जिल्हा न्यायालय भरती 2023 जाहिर

Recruitement – District Court Maharashtra

District court yavatmal district announced new vacancy for the ‘ sfaigar’ post. There are total 9 vacancies for district court recruitment yavatmal. Also they published detailed notification on official website of district court yavatmal like – https://districts.ecourts.gov.in/india/maharashtra/yavatmal/recruit. Last date of district court yavatmal safaigar post is 12/06/2023. All details are given below regarding to district court Bharti application form, district court Bharti Maharashtra, district court yavatmal safaigar post, district court Bharti selection process, Maharashtra district court Bharti 2023 yavatmal district, District Court Recruitment Maharashtra,Maharashtra district Court Recruitment 2023,Pune District Court Recruitment 2023,जिल्हा न्यायालय महाराष्ट्र.

जिल्हा न्यायालय भर्ती 2023

महाराष्ट्र मधील ज़िल्हा न्यायालय यवतमाळ ने नवीन सफाईगार या पदासाठी offline पोस्टने अर्ज मागितले आहेत. सविस्तर जाहीरात पुढील video मध्ये पाहू शकतात.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now
Google News Read Now
Maharashtra district court recruitment 2023

Maharashtra district court yavatmal details

post name ( पदाचे नाव ) – सफाईगार जिल्हा न्यायालय यवतमाळ मध्ये

safai kamgar advertisement 2023 district court

जाहिरात दिनांक :- २९/०५/२०२३

अर्ज स्विकारण्यांची अंतिम दिनांक :- १२/०६/२०२३

जाहिरात jilha nyayaly

District court yavatmal Maharashtra आस्थापनेवरील “सफाईगार” या पदाकरिता उमेदवारांची निवड यादी तयार करण्याकरिता पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

District court yavatmal bharti अर्ज प्रक्रिया

उमेदवारांनी जाहिरातीत दिलेल्या नमुन्यात नोंदणीकृत डाक पोच पत्राव्दारे (आर.पी.ए.डी.) किंवा शिघ्र डाक सेवा (स्पीड पोस्ट) पोचपावतीसह “सफाईगार पदाकरीता अर्ज” असे लिफाफ्यावर लिहुन प्रबंधक, जिल्हा न्यायालय यवतमाळ (यानंतर ज्यास संक्षिप्तपणे “जिल्हा न्यायालय” असे संदर्भात केले आहे.) यांच्याकडे दिनांक १२/०६/२०२३ रोजी सायंकाळी ०५.०० वाजेपर्यंत अथवा त्यापुर्वी पोहोचतील अशा अंदाजाने आपले अर्ज पाठवावेत.

जिल्हा न्यायालय भरती माहीती

पद-सफाईगार

निवड यादीसाठी सफाईगार पदाची संख्या- ०९

शैक्षणिक अर्हता– प्रकृतीने सुदृढ असावा.

वयोमर्यादा :-या जाहिरातीच्या दिवशी उमदेवार १८ वर्षापेक्षा कमी वयाचा नसावा. सर्वसाधारण प्रवर्गाकरीता ३८ वर्षापेक्षा जास्त वयाचा नसावा.मागासवर्गीय ४३ वर्षापेक्षा जास्त वयाचा नसावा.

Jilha nyayaly ( district court yavatmal bharti) सफाईगार पदाचे काम काय असते

निवड झालेल्या उमेदवारास जिल्हा न्यायीक विभागांतर्गत कोणत्याही न्यायालयात “सफाईगार” या पदावर नियुक्ती दिली जाईल. नियुक्तीनंतर उमेदवारास न्यायालयाच्या इमारतीतील व निवासस्थानातील प्रसाधनगृहाची, इमारतीची व परिसराची नियमित स्वच्छता व साफ सफाई करणे, निगा राखणे इत्यादी कर्तव्ये पार पाडावी लागतील. तसेच अशा उमेदवारांना न्यायालयाच्या आवारातील जागेची निगा राखणे कामी आवश्यक ती सर्व कामे करावी लागतील. सफाईगार हे पद एकाकी असून, पदोन्नतीच्या संधी उपलब्ध असतील असे नाही. याबाबतीत नोंद घ्यावी.

सफाईगार जिल्हा न्यायालय पगार

७ व्या वेतन आयोगानुसार वेतनस्तर एस – १ या सुधारित वेतन सरंचनेत रुपये १५,०००/- व नियमानुसार देय भत्ते.

जिल्हा न्यालयाल भरती निवड प्रक्रियेचे वेळापत्रक खालील प्रमाणे असेल.

1.दिनांक १२/०६/२०२३ रोजी सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत अर्ज स्विकारण्याची अंतीम वेळ राहील.

२. दिनांक १३/०६/२०२३ ते २८/०६/२०२३ या कालावधीत सफाईगार पदासाठी प्राप्त अर्जाची छाननी करण्यात येईल. अर्जाची छाननी पुर्ण झाल्यानंतर निवड समिती योग्य ते निकष लावुन अहर्ता / योग्यतेच्या आधारे सफाईगार पदासाठी अल्पसुची तयार करेल व अशी अल्पसूची जिल्हा न्यायालय, यवतमाळ येथील सुचना फलकावर व https://districts.ecourts. gov.in/yavatmal या संकेतस्थळावर प्रसिध्द करेल.

३. अल्पसुची मध्ये नांव असलेल्या उमदेवारांनी शैक्षणीक कागदपत्राच्या सत्यप्रती, फोटो ओळखपत्र (जसे आधारकार्ड, पॅनकार्ड, वाहन परवान्याची प्रत इत्यादी), दोन सन्माननीय व्यक्तींनी उमदेवारांचे चारित्र्य चांगले असलेबाबत दिलेले मुळ दाखले, शासन विहीत करेल त्या प्राधिका-यांने दिलेल्या जातीचा दाखला (जेथे लागु असेल तेथे), कुटूंब लहान असल्याबाबतचे मुळ प्रतिज्ञापत्र ( नमुना अ ), उमेदवार शासकीय सेवेत असल्यास विभागाचे ना हरकत प्रमाणपत्र समक्ष हजर करावे व ओळखपत्र प्राप्त करुन घ्यावे.

४. परिक्षा सफाईगार पदासाठी २० गुणांसाठी चाफल्य व साफसफाई घेण्याची तारीख जिल्हा न्यायालयाचे सुचना फलकावर व https:// districts. ecourts. gov.in / yavatmal या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येईल.

ज़िल्हा न्यायालय भर्ती सफाईगार निवड प्रक्रिया

५. उमेदवाराने त्यांचे/तिचे अलीकडचे पासपोर्ट आकाराचे रंगीत छायाचित्र (फोटो) अर्जावर दिलेल्या जागी लावुन त्यावर अशाप्रकारे स्वाक्षरी करावी की त्यातील काही भाग छायाचित्रावर आणि अर्जावर सुध्दा येईल.

६. उमेदवाराने दोन सन्माननीय व्यक्तींनी जाहिरातीच्या तारखेनंतर दिलेले चारित्र्याचे दाखले सादर करावेत. तसेच त्यांचे विरुध्द कुठल्याही न्यायालयात कुठलाही फौजदारी खटला निकाली / चालू किंवा प्रस्तावित नसल्याचे प्रमाणित करावे. असल्यास त्याचा तपशिल द्यावा.

७. विहीत नमुन्यात नसलेला आणि अपूर्ण माहिती असलेला अर्ज अपात्र ठरविणेत येईल.

८. निवड समिती योग्य ते निकष लावुन अर्हता / योग्यतेच्या आधारे सफाईगार पदासाठी अल्पसुची तयार करेल व अशी तयार केलेली अल्पसुची जिल्हा न्यायालय, यवतमाळ येथील सुचना फलक व https://districts.ecourts.gov.in/yavatmal या संकेतस्थळावर प्रसिध्द करेल.

९. अशी अल्पसुची तयार करण्याचे किंवा आवश्यक ते बदल करण्याचे अधिकारी निवड समितीकडे राखुन ठेवलेले आहेत. सफाईगार पदासाठी अल्पसुचीत नमुद उमेदवारांची २० गुणांची

१०.चाफल्य व साफसफाई कामाचे मूल्यमापन परिक्षा घेण्यात येईल.

११. सफाईगार पदासाठी चाफल्य व साफसफाई कामाचे मुल्यमापन परिक्षेतील गुणवत्तेनुसार पात्र ठरलेल्या उमेदवारांची २० गुणांची तोंडी मुलाखत घेण्यात येईल.

१२. उमेदवारांना कागदपत्रे पडताळणी करीता, परिक्षा व मुलाखतीस बोलविल्यास स्व:खर्चाने हजर राहावे लागेल.

१३. सेवाप्रवेश प्रक्रियेच्या वेळापत्रकात काही कारणाने बदल झाल्यास किंवा अन्य महत्वाची सुचना असल्यास त्याची माहिती जिल्हा न्यायालयाच्या सुचना फलकावर व संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येईल. वैयक्तिकरित्या कळविण्यात येणार नाही.

जिल्हा न्यायालय भरती – यवतमाळ सविस्तर जाहीरात पहा

Maharashtra district court yavatmal – official website

अर्ज नमूना व चारित्र्य दाखला पहा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now
Google News Read Now
error: Content is protected !!