फक्त चौथी पास वर!! न्यायालयामध्ये भरती सुरू, लगेच अर्ज करा मुदत संपत आहे.

Mumbai High Bharti Nagpur bench 2023

फक्त चौथी पास वर न्यायालयामध्ये भरती सुरू लगेच अर्ज करा मुदत संपत आहे मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ, नागपूर साठी माळी या पदाची पदभरती केली जात आहे. यासाठी 5 उमेदवारांची निवड यादी व 1 उमेदवाराची प्रत्यक्ष यादी तयार करण्यासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. या पदासाठी पगार 16000 ते 52000 सर्व भत्ते असणार आहेत .यासाठी तुम्ही चौथी उत्तीर्ण असाल आणि तुम्हाला तीन वर्षाचा बगीचे. हिरवळी .वनस्पती आणि झाडे इत्यादी सुस्थितीमध्ये ठेवण्याचा अनुभव असणे गरजेचे आहे .तर थेट पदांसाठी ही भरती होत आहे. यासाठी 22 नोव्हेंबर 2023 पर्यंत रजिस्टर पोस्टद्वारे अर्ज तुम्हाला प्रबंधक प्रशासन मुंबई उच्च न्यायालय ,नागपूर खंडपीठ, सिविल लाईन्स नागपूर येथे पाठवायचा आहे. यामध्ये तुमची लेखी परीक्षा नाही तर प्रात्यक्षिक परीक्षा असेल ज्यामध्ये उद्यान बगीच्या देखभाली संदर्भात प्रात्यक्षिक तुमच्याकडून करून घेतलं जाईल 30 गुणासाठी आणि शारीरिक क्षमता चाचणी 10 गुणांसाठी व त्यानंतर वैयक्तिक मुलाखत घेतली जाईल 10 गुणांसाठी असे मिळून 50 गुणांची निवड प्रक्रिया असणार आहे. सविस्तर माहिती पाहण्यासाठी जाहिरातीची लिंक तुम्हाला खालील प्रमाणे दिलेली आहे तिथून तुम्ही जाहिरात डाऊनलोड करून अर्ज पाहू शकता.

सविस्तर जाहिरात पहा – क्लिक करा
अर्ज नमुना येथे पहा
error: Content is protected !!
Scroll to Top