नागपूर महानगरपालिका भरती २०२३; नवीन ७५०३ पदभरती मान्यता GR

नागपूर महानगरपालिकेच्या १७९८१ पदांच्या एकत्रित आकृतीबंधास मान्यता देण्याबाबत. महाराष्ट्र शासन नगर विकास विभाग – नागपूर महानगरपालिका ही “अ” वर्ग महानगरपालिका असून, सदर महानगरपालिकेची स्थापना दि. ०२.०३.१९५२ रोजी झालेली आहे. या महानगरपालिकेचे कार्यक्षेत्र २२७ चौ. कि.मी. असुन शहराची लोकसंख्या अंदाजे ३० लाख इतकी आहे.

GR PDF पहा

महानगरपालिकेच्या आकृतीबंधास मंजुरी

महानगरपालिकेच्या आस्थापनेवर पदनिर्मितीसह आकृतीबंधास मान्यता देण्याबाबतचा प्रस्ताव सादर केला होता . त्याअनुषंगाने महानगरपालिकेच्या आस्थापनेवर नव्याने आवश्यक पदनिर्मिती करण्यासह महानगरपालिकेच्या एकत्रित आकृतीबंधास मान्यता देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

शासन निर्णय:-

आयुक्त तथा प्रशासक, नागपूर महानगरपालिका यांनी संदर्भीय दि.२५.०१.२०२३ च्या पत्रान्वये सादर केलेल्या प्रस्तावाच्या अनुषंगाने सदर शासन निर्णयासोबत जोडलेल्या प्रपत्र- “ब” मधील स्तंभ क्र. (७) मध्ये नमूद करण्यात आलेली ७५०३ नवीन पदे निर्माण करण्यास महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमाच्या कलम ५१ (४) नुसार शासन मान्यता देण्यात येत आहे. सदर नमूद ७५०३ नवीन पदे निर्माण करताना एक वेळची विशेष बाब म्हणून नागपूर महानगरपालिकेच्या ३५% आस्थापना खर्चाची अट शिथील करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे.

error: Content is protected !!