talathi bharti 2023 exam date- talathi syllabus महाराष्ट्र तलाठी भरती २०२२ अपडेट तलाठी भरती ची सर्व माहिती पुढील प्रमाणे आहे. ज्यामध्ये तलाठी भरती अभ्यासक्रम ,तलाठी पगार, तलाठी चे प्रमोशन कसे होते याची माहिती त्याचबरोबर तलाठी वय मर्यादा व तलाठी शैक्षणिक पात्रता असी सर्व माहिती पुढील प्रमाणे आहे.
तलाठी भरती जाहिरात बद्दल अपडेट
तलाठी भरती अपडेट 2023- मिळालेल्या माहितीनुसार जवळपास 1012 जागेंसाठी तलाठी भरती होणार असून जाहिरात ही जानेवारी मध्ये येईल. परीक्षा IBPS/TCS कंपनी कडून घेण्यात येणार आहे.
७५ हजार मेगा भरती अंतर्गत सर्व विभाग मध्ये पदभरती कार्यवाही गतिमान करण्याचे आदेश
महाराष्ट्र मध्ये स्वातंत्र्यच्या अमृत महोत्सवी वर्षात रिक्त पदे भरण्याची कार्यवाही गतिमान करण्यासाठी बिंदुनामवली तात्काळ प्रमाणित करण्याबाबत सर्व विभाग मधील विभागीय आयुक्तांना देण्यात आले आहेत. ज्यामध्ये गट क व ड पदांची भरती केली जाणार आहे. या मध्ये सर्व रिक्त पदांची बिंदुनामवली प्रमाणित करण्याचे प्रलंबित आहे याचा आढावा घेण्यात आला आहे . व ज्या विभागाच्या बिंदूनामवली प्रलंबित आहेत त्या तातडीने पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या मध्ये तलाठी पदभरती मधील हि पदांची लवकरच जाहिरात प्रसिद्ध केली जाऊ शकते व इतर विभाग मध्ये हि.
तलाठी संवर्ग बद्दल माहिती
महाराष्ट्र मध्ये महसूल व वनविभाग मध्ये गट क अंतर्गत वर्ग तीनचे हे तलाठी संवर्ग आहे. तलाठी संवर्ग सरळसेवा अंतर्गत येतो म्हणजे या साठी फक्त एकच परीक्षा घेण्यात येते.
महाराष्ट्र तलाठी प्रमोशन
तलाठी प्रमोशन –
पदांचा क्रम कसा असतो-
उपजिल्हाधिकारी – गट अ
⬇️
तहसीलदार – गट अ
⬇️
नायब तहसीलदार- गट ब
⬇️
मंडळ अधिकारी – गट क
⬇️
तलाठी – गट क
⬇️
कोतवाल
तलाठी पगार किती असतो
तलाठी भरती झाल्यावर पगार किती भेटतो ७ व्या वेतन आयोग नुसार सुरुवातीला – ३० ते ३५ हजार रु पर्यंत पगार दिला जातो . त्यांनतर सर्व भत्ते दिले जातात.
महसूल व विभाग मधील तलाठी शैक्षणिक पात्रता
कुठलीही पदवी ycm मधून असेल तरी चालते.
तलाठी भरती साठी वय मर्यादा
महाराष्ट्र तलाठी भरती साठी वय मर्यादा जुन्या जाहिरात प्रमाणे खालीलप्रमाणे आहे , परंतु तलाठी भरती २०२२-२३ साठी कोविड मुळे भरती न झाल्याने वयात सूट भेटू शकते.
तलाठी भरती २०२३ साठी आरक्षण
महसूल व वन विभाग तलाठी भरती साठी आरक्षण सामाजिक व समांतर आरक्षण दिले जाते ज्यामध्ये , प्रकल्पग्रस्त , भूकंपग्रस्त , महिला ३०% आरक्षण , खेळाडू, माजी सैनिक ,अपंग ,पदवीधर अंशकालीन ,अनाथ.
तलाठी भरती अभ्यासक्रम २०२३ talathi bharti 2023 exam date
तलाठी भरती साठी नवीन अभ्यासक्रम खालीलप्रमाणे आहे .
- नकारात्मक गुण नाहीत
- वेळ २ तास
- एकूण गुण- २००
- प्रश्नसंख्या -१००
अनु.क्र | विषय | प्रश्नसंख्या | गुण | दर्जा |
१ | मराठी | २५ | ५० | बारावी * |
२ | इंग्रजी | २५ | ५० | पदवी |
३ | अंकगणितबुद्धिमत्ता | २५ | ५० | पदवी |
४ | सामान्य ज्ञान | २५ | ५० | पदवी |
पेपर कसा असतो ?
खालीलपैकी योग्य पर्याय निवडा
वस्तुनिष्ठ बहुपर्यायी (Multiple choice)
- १
- २
३- ४
सविस्तर अभ्यासक्रम तलाठी भरती २०२२
- अंकगणित/बुद्धिमत्ता
गणित- बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, काळ-काम-वेग संबंधित उदाहरणे ,सरासरी ,चलन ,मापनाची परिणामी, घड्याळ,अंकमालिका ,अक्षर मालिका, वेगळा शब्द व अंक ओळखणे, सम संबध अंक, अक्षर, आकृती, वाक्यावरुन निष्कर्ष काढणे,वेन आकृती.
२-मराठी
१-व्याकरण २- शब्दसंग्रह
समानार्थी शब्द विरुद्धार्थी शब्द ,काळ व काळाचे प्रकार ,शब्दांचे प्रकार ज्याच्या मध्ये नाम सर्वनाम क्रिया विशेषण ,क्रियापद ,विशेषण ,विभक्ती संधी व संधीचे प्रकार, म्हणी ,वाक्यप्रचारांचा अर्थ व उपयोग, शब्दसमूहाबद्दल एक शब्द.
३- इंग्रजी
vocabulary, synonyms and antonyms, proverbs, tense and kinds of tense, question tag, use proper form of verb, spot the error, spelling , passage, sentence structure , one word substations , phrases.
४- सामान्य ज्ञान
महाराष्ट्राचा व भारताचा इतिहास ,पंचायतराज व राज्यघटना ,भारतीय संस्कृती, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र जीवशास्त्र, महाराष्ट्रातील समाजसुधारकांचे कार्य ,भारताच्या शेजारील देशांची माहिती, चालू घडामोडी— सामाजिक ,राजकीय ,आर्थिक ,क्रीडा ,मनोरंजन इत्यादी साधनांच्या आधारे अभ्यास करावा.
तलाठी भरती कट ऑफ talathi cut off
कट ऑफ – तलाठी भरती अंदाजित मागील परीक्षा नुसार
- Open – 88 + प्रश्न बरोबर पाहिजेत
- OBC- 85 + प्रश्न बरोबर पाहिजेत
- EWS – 86 + प्रश्न बरोबर पाहिजेत
- SC – 82+प्रश्न बरोबर पाहिजेत
- ST-78+प्रश्न बरोबर पाहिजेत