Talathi Result 2023 and Answer Key Update

talathi result | talathi response sheet 2023
talathi result | talathi response sheet 2023

तलाठी सरळसेवा भरती २०२३ उत्तरपत्रिका व निकाल अपडेट

प्रसिध्दीपत्रक

महाराष्ट्र राज्यातील महसूल विभागातील तलाठी (गट क) संवर्गाचे सरळसेवा पदभरती बाबतची जाहिरात क्र.४५/२०२३ दि.२६/६/२०२३ प्रसिध्द करणेत आलेली आहे. सदर तलाठी पदभरती करिता दिनांक १७/०८/२०२३ ते दि. १४/९/२०२३ या कालावधीत एकुण १९ दिवसामध्ये एकुण ५७ सत्रामध्ये परीक्षा घेणेत आलेली आहे.

उत्तरपत्रिका कधी येणार माहिती

दिनांक २८/०९/२०२३ रोजी उमेदवारांना त्यांचे लॉगइन आयडी वर त्यांचे परीक्षेचे सत्राची उत्तर तालिका (Answer Key) उपलब्ध करुन देणेत येणार आहे. उमेदवारांना उपलब्ध करुन देणेत आलेल्या उत्तर तालिका (Answer Key) चे अनुषंगाने (प्रश्न चुकीचा असल्यास, प्रश्नाचे पर्याय चुकीचे असल्यास इ. बाबत आक्षेप / हरकत असल्यास सदर आक्षेप नोंदविण्यासाठी दि. २८/९/२०२३ ते दि.०८/१०/२०२३ रोजी रात्री ११.५५ या कालावधीत TCS कंपनीकडून लिंक खुली करुन देण्यात येणार आहे. सादर केलेल्या आक्षेप / हरकती बाबत TCS चे समितीकडून योग्य तो निर्णय घेण्यात येईल. आक्षेप / हरकत योग्य असल्यास सदर प्रश्नाबाबत गुण देण्याबाबत धोरण निश्चित करुन देणेत येईल. TCS कंपनीकडून आक्षेप / हरकत सादर करणेसाठी प्रति आक्षेप / हरकती करिता रक्कम रु. १००/- इतकी फी आकारणेत येईल. आक्षेप / हरकत योग्य असल्यास सदरची फी परत करणेत येईल. आक्षेप अयोग्य असल्यास फी परत केली जाणार नाही याची कृपया नोंद घ्यावी.

महाराष्ट्र तलाठी भरती निकाल कधी लागेल?

तलाठी भरतीची परीक्षा एकुण ५७ सत्रामध्ये घेणेत आलेली आहे. सदर ५७ सत्राची काठिण्य पातळीचे समीकरण (Normalization) करण्यात येणार आहे. TCS कंपनीकडून करण्यात येणाऱ्या Normalization सुत्राची माहिती यापुर्वीच प्रसिध्द करणेत आलेली आहे. Normalization अंती उमेदवारांचे गुण निश्चित करुन राज्याची मेरिट लिस्ट प्रसिध्द करणेत येईल.

तलाठी भरती प्रसिद्धी येथे पहा

Talathi Bharti New Notice – Click here download

तालाठी भरती प्रसिद्धी पत्रक