You are currently viewing जिल्हा अधिकारी कार्यालय उपनगर मुंबई २० पदांची भर्ती २०२२
महाराष्ट्र गवर्मेंट

जिल्हा अधिकारी कार्यालय उपनगर मुंबई २० पदांची भर्ती २०२२

  • Post category:Home

जिल्हा अधिकारी कार्यालय उपनगर मुंबई २० पदांची भर्ती २०२२

पदाचे नाव –विशेष सहाय्यक सरकारी अभियोक्ता

एकूण रिक्त पदे-२०

शैक्षणिक पात्रता- १. विशेष सहाय्यक सरकारी अभियोक्ता या पदासाठी अर्जदार हा भारताचा नागरीक असावा .

२. अर्जदार मान्यताप्राप्त विधी शाखेचा पदवीधारक असावा . तसेच बार कौन्सिलचे रजिष्ट्रेशन कमीत कमी ५ वर्षे पूर्ण झालेले असावे .

३. सदर पदासाठी अर्जदाराचे वय ३८ वर्षापेक्षा अधिक असु नये . मागासवर्गीय उमेदवारांसाठी ५ वर्षाने शिथिलक्षम

४. सदर पदासाठी उच्च न्यायालय किंवा त्याहुन दुय्यम न्यायालयातील कामकाजाचा ५ वर्षापेक्षा जास्त वकीलीचा अनुभव असावा .

५. विशेष सहाय्यक सरकारी अभियोक्ता पदावर काम करतांना सदर अभियोक्ता लोकसेवक म्हणून कर्तव्य पार पाडणार असल्याने चारित्र्य पडताळणी आवश्यक राहील .

६. विशेष सहाय्यक सरकारी अभियोक्ता यांची नेमणूक ही तात्पुरता स्वरुपाची असून कोणतीही पूर्वसूचना न देता केव्हाही संपुष्टात आणण्यात येईल .

अर्ज प्रक्रिया –दिनांक ०२/०३/२०२२ ते १६/०३/२०२२ रोजी कार्यालयीन वेळेत जिल्हाधिकारी , मुंबई उपनगर जिल्हा यांचे कार्यालय , प्रशासकीय इमारत , १० वा मजला , शासकीय वसाहत , वांद्रे ( पूर्व ) , मुंबई ५१ या कार्यालयात पोहोचतील अशा बेताने पाठवावेत .

अधिकृत वेबसाइट

जाहिरात पहा