You are currently viewing जिल्हा परिषद भरती गट क परीक्षा online होणार आहेत jilha parishad 2023 exam
जिल्हा परिषद भरती गट क परीक्षा online होणार आहेत jilha parishad 2023 exam

जिल्हा परिषद भरती गट क परीक्षा online होणार आहेत jilha parishad 2023 exam

जिल्हा परिषद भरती गट क परीक्षा online होणार आहेत jilha parishad 2023 exam जिल्हा परिषद मधील गट ची आरोग्य विभाग मधील व इतर सर्व पदांची भरती ibps व tcs या कंपनी मार्फत online प्रकारे होणार आहे. त्याचा शासन निर्णय पुढील प्रमाणे आहे.

जिल्हा परिषद परीक्षा घेण्यासाठी शासन निर्णय

जिल्हा परिषदांतील आरोग्य विभागाशी संबंधित आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, प्रयोगशाळा तंत्रज्ञ औषध निर्माता, आरोग्य पर्यवेक्षक या ५ संवर्गातील रिक्त पदे भरण्याबाबत कालबद्ध कार्यक्रम (परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक) संदर्भ क्र. १ येथील दि.२१.१०.२०२२ च्या शासन निर्णयान्वये जाहीर करण्यात आला आहे.

तसेच, उपरोक्त ५ संवर्ग वगळून जिल्हा परिषदांतील गट-क मधील सर्व संवर्गाची (वाहनचालक व गट-ड संवर्गातील पदे वगळून) रिक्त पदे भरण्याबाबत कालबद्ध कार्यक्रम (परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक) संदर्भ क्र. २ येथील दि. १५.११.२०२२ च्या शासन निर्णयान्वये जाहीर करण्यात आला आहे.

tcs किंवा ibps यापैकी एक कंपनी निवड होईल

दि. २१ नोव्हेंबर, २०२२ च्या शासन निर्णयान्वये भूतपूर्व दुय्यम सेवा मंडळांच्या कक्षेतील (महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेरील) गट-ब (अराजपत्रित), गट- क व गट-ड संवर्गातील नामनिर्देशनाच्या कोट्यातील पदे सरळसेवेने भरताना स्पर्धा परीक्षा प्रक्रिया टि.सी.एस.- आयओएन ( टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस लिमिटेड) व आय.बी.पी.एस. (इंस्टीट्यूट ऑफ बँकिंग पर्सोनेल सिलेक्शन) या कंपनीमार्फत राबविणेबाबत निर्देश देण्यात आले आहेत.

परीक्षा online प्रकारे होतील

सदर स्पर्धा परीक्षा ऑनलाइन पद्धतीने (Computer Programme Based test/Examination) घेण्यात येईल. व त्यासाठी टि.सी. एस. आयओएन (टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस लिमिटेड) व आय.बी.पी.एस. (इंस्टीट्यूट ऑफ बँकिंग पर्सोनेल सिलेक्शन) यापैकी कोणत्याही एका कंपनींची आवश्यकतेनुसार निवड करण्याची जबाबदारी संबंधित जिल्हा निवड मंडळ व जिल्हा परिषदेची असेल, तसेच, सदर परिक्षेचे शुल्क, कंपन्यांशी करावयाचा सामंजस्य करार इ. तदनुषंगिक बाबी यासंदर्भातील कार्यवाही करताना संदर्भ क्र. ३ येथील सामान्य प्रशासन विभागाच्या दि. २१ नोव्हेंबर, २०२२ च्या शासन निर्णयातील सूचनांचे काळजीपूर्वक पालन करण्यात यावे.

शासन निर्णय माहिती

सदरचे शासन शुद्धीपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०२२११२५१३३६५५४१२० असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने सांक्षांकित करुन निर्गमित करण्यात येत आहे.

शासन निर्णय येथे पहा

जिल्हा परिषद भरती गट क परीक्षा online होणार आहेत jilha parishad 2023 exam