पोलीस भरती २०२२ अर्ज करण्यास मुदतवाढ देण्यात आली– police bharti 2022 पोलीस भरती २०२२ साठी अर्ज करण्याची तारीख वाढवण्यात आली आहे. पोलीस शिपाई / पोलीस शिपाई चालक / srpf पोलीस शिपाई या पदावर आवेदन अर्ज सादर करावयाची मुदत १५/१२/२०२२ रोजी पर्यंत वाढवण्यात येत आहे.
police recruitment 2022 नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र ( Non Creamy Layer Certificate)
नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र ( Non Creamy Layer Certificate) हे दिनांक ०१/०४/२०२१ ते ३१/०३/२०२२ या आर्थिक वर्षातील उत्पन्नाच्या आधारावर सक्षम प्राधिकारी यांनी , भरतीसाठी अर्ज सादर करण्याच्या शेवटच्या दिनांकापर्यंत निर्गमित केलेले प्रमाणपत्र वैध राहील.
तसेच , आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील उमेदवारांनी शासन निर्णय सामान्य प्रशासन विभाग यांचेकडील शासन निर्णय क्रमांक रा आ धो – ४०१९ प्र क्र ३१ /१६a, दिनांक १२/०२/२०१९ मधील तरतुदीनुसार दिनांक ०१/०४/२०२१ ते ३१/०३/२०२२ या आर्थिक उत्पन्नच्या आधारावर विहित करण्यात आलेले मूळ प्रमाणपत्र हे दिनांक ३१/११/२०२२ पूर्वीचे असणे आवश्यक आहे.