You are currently viewing सरळसेवा भरती बद्दल शासनाचा महत्वाचा निणर्य हे केले बंधनकारक
सरळसेवा-भरतीबद्दल-

सरळसेवा भरती बद्दल शासनाचा महत्वाचा निणर्य हे केले बंधनकारक

  • Post category:Home

saralseva bharti Maharashtra government new GR

सरळसेवा भरती बद्दल शासनाचा महत्वाचा निणर्य हे केले बंधनकारक – saralseva भरती/ आरक्षण/ अनुशेष बाबतचे विवरणपत्र कार्यालयाच्या सूचना फलकावर लावणेबाबत महाराष्ट्र शासनाचा नवीन शासन निर्णय.

GR सरळसेवा भरती बद्दल शासनाचा महत्वाचा

saralseva भरती बद्दल रिक्त असणारी पदे प्रत्येक कार्यालयाच्या बाहेर लावणे बंधनकारक केले आहे त्याचा GR प्रसिद्ध झाल आहे खालीलप्रमाणे .

GR मुद्दा क्रमांक १

सर्व नियुक्ती प्राधिकाऱ्यांनी त्यांच्या प्रशासकीय नियंत्रणाखालील सर्व संवर्गातील पदभरतीबाबतचे वार्षिक विवरणपत्र कार्यालयाच्या सूचना फलकावर वेळोवेळी लावण्याबाबतच्या सूचना सामान्य प्रशासन विभाग / १६ – ब यांच्या दि .८.१.२००३ च्या संदर्भीय परिपत्रकान्वये देण्यात आलेल्या आहेत . तथापि , सदर विवरणपत्र कार्यालयाच्या सूचना फलकावर लावण्यात येत नसल्याची बाब शासनाच्या निदर्शनास आलेली आहे

GR मुद्दा क्रमांक

सर्व नियुक्ती प्राधिकारी / आस्थापना अधिकारी यांना कळविण्यात येते की , सरळसेवा भरतीसाठी दि .६.७.२०२१ च्या शासन निर्णयान्वये विहित केलेल्या बिंदू नामावलीनुसार प्रत्येक संवर्गातील सरळसेवेची मंजूर पदे , कार्यरत पदे रिक्त पदे , अनुशेषाची पदे तसेच मागणी केलेली पदे याबाबतची माहिती सोबत जोडलेल्या विवरणपत्रानुसार वेळोवेळी सूचना फलकावर लावावी .

GR मुद्दा क्रमांक

उपरोक्त सूचना सर्व शासकीय / निमशासकीय कार्यालये , सेवा मंडळे , महानगर पालिका , नगरपालिका , स्थानिक स्वराज्य संस्था , जिल्हा परिषदा , महामंडळे , शासकीय अनुदान प्राप्त शैक्षणिक संस्था , विद्यापीठे , सहकारी संस्था , शासकीय उपक्रम व शासनाच्या अधिपत्याखालील किंवा शासनाने अनुदान दिलेली मंडळे यांना लागू आहेत

GR मुद्दा क्रमांक

मंत्रालयीन प्रशासकीय विभागांना विनंती करण्यात येते की , याबाबतीत त्यांच्या अधिपत्याखालील विभाग प्रमुख कार्यालय प्रमुख / आस्थापना अधिकारी यांना आवश्यक त्या सूचना द्याव्यात . तसेच , त्यांनी उपरोक्त माहिती सूचना फलकावर लावली किंवा कसे , याबाबतचा वेळोवेळी आढावा घेऊन अशी कार्यवाही न करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांविरुद्ध कारवाई करावी .

नोटीस बोर्ड वर रिक्त पदांचा फलक लावण्यासाठी नमून विवरणपत्र

सरळसेवा भरती बद्दल शासनाचा महत्वाचा निणर्य हे केले बंधनकारक
सरळसेवा भरती बद्दल शासनाचा महत्वाचा निणर्य हे केले बंधनकारक

वरील GR PDF पहा

अधिकृत website