You are currently viewing राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत आशा स्वयंसेविका पदे भरणेबाबत

राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत आशा स्वयंसेविका पदे भरणेबाबत

  • Post category:Home

Asha recruitment www.majinoukriguru.in/asha-recruitment

आरोग्य विभाग भर्ती 2021

पिंपरी चिंचवड महानगरपालिका- कॉर्पोरेशन इंटिग्रेटेड हेल्थ रॉण्ड फैमिली वेलफेअर सोसायटी २ रा मजला , वैद्यकिय विभाग , मुख्य प्रशासकीय इमारत , मुंबई – पुणे हायवे लगत , पिंपरी- ४११०१८

राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत आशा स्वयंसेविका पदे भरणेबाबत पिंपरी चिंचवड महानगरपालिका कॉर्पोरेशन इंटिग्रेटेड हेल्थ ऍण्ड फॅमिली वेलफेअर सोसायटी अंतर्गत राष्ट्रीय आरोग्य अभियान ( NHM ) या कार्यक्रमासाठी आशा स्वयंसेविका ( ASHA ) या पदाची पदे खालील प्रमाणे भरावयाची आहेत .

सदर पदाची शैक्षणिक अर्हता , पदसंख्या , तपशिल व अटी – शर्ती खालील प्रमाणे

आकुर्डी रुग्णालय यमुनानगर भोसरी रुग्णालय रुग्णालय

अटी व शर्ती

1. राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियानांतर्गत भरण्यात येणा – या आशा स्वयंसेविका पदावरील उमेदवाराची कोविड -१ ९ संसर्गजन्य आजाराच्या पार्श्वभूमीवर मुलाखतीव्दारे निवड न करता शैक्षणिक पात्रता , अनुभव व इतर अर्हतेच्या आधारे तयार करण्यात येणा – या गुणांकनानुसार गुण देण्यात येवून निवड करण्यात येईल .

2. सदरची पदे राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियानांतर्गत राहतील , सदर पदांचा पिंपरी चिंचवड म.न.पा.आस्थापनेशी कसल्याही प्रकारचा संबंध राहणार नाही .

3. सदरची पदे केवळ प्रकल्प कामकाजासाठी तात्पुरत्या स्वरुपात भरावयाची असून ३१ मार्च २०२२ पर्यंत अथवा प्रकल्प बंद होताच सदरील पदे आपोआप संपुष्टात येतील .

4. सदरची पदे पुर्णपणे केवळ प्रकल्प कामकाजासाठी तात्पुरत्या स्वरुपात भरावयाची असल्याने अर्जदारास कायमपदी नियुक्तीचा हक्क सांगता येणार नाही . ज्या दिवशी पिंपरी चिंचवड महानगरपालिका- कॉर्पोरेशन इंटिग्रेटेड हेल्थ ऍण्ड फॅमिली वेलफेअर सोसायटीस सदर पदांची आवश्यकता नसेल त्यावेळी कोणत्याही नोटीशीशिवाय त्यांची सेवा समाप्त केली जाईल . याकामी नियुक्ती वेळी रु .१०० चे स्टॅम्प पेपरवर बंधपत्र ( करारनामा ) करुन द्यावा लागेल .

5 . सदर जाहिरातीमधील पदसंख्येमध्ये बदल होऊ शकतो .

6. सदरची भरती रद्द करणे अथवा स्थगित करणे तसेच निवड / नियुक्ती प्रक्रिया कोणत्याही टप्प्यावर कोणतेही कारण न देता बदल अथवा रद्द करण्याचे अधिकार मा.आयुक्त पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांनी राखुन ठेवलेले आहेत .

7. आशा स्वयंसेविका जाहिरातीमध्ये नमुद कलेल्या कामकाज क्षेत्राची स्थानिक / कायमची रहिवाशी असावी . जर जाहिरातीमध्ये नमुद कार्यक्षेत्राची आशा स्वयंसेविका उपलब्ध न झाल्यास लगतच्या कार्यक्षेत्रातील आशा स्वयंसेविका यांचे पात्र अर्जाचा विचार केला जाईल .

8 आशा स्वयंसेविकेस मासिक ठोक वेतन , मानधन अथवा कोणताही एकत्रित दरमहा भत्ता अदा केला जाणार नाही .

9. नियुक्त आशा स्वयंसेविकेस शासन आदेशानुसार कामावर आधारित मोबदला डी.बी.टी.व्दारे थेट बँक खात्यावर अदा केला जाईल व शासनाकडून वेळोवेळी प्राप्त सुचना लागु राहतील .

10. सदर पदभरतीची निवड व प्रतिक्षा यादी प्रसिध्द करण्यात येईल .

11. परिपुर्ण भरलेला अर्ज व पुढील आवश्यक कागदपत्रे जोडण्यात आलेले अर्ज पात्र होतील अपुर्ण अर्जाचा विचार केला जाणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यावी .

कागदपत्रे

१. इच्छुक व पात्र उमेदवारांनी म.न.पा.वेबसाईट www.pcmcindia.gov.in वर दिलेल्या नमुन्यातील अर्ज व त्यासोबत शैक्षणीक अर्हता प्रमाणपत्रे व खालील कागदपत्रांच्या छायांकित सत्यप्रती जोडाव्यात . ( अर्जासोबत मुळ कागदपत्रे जोडून नयेत . )

२. पासपोर्ट साईज फोटो

३. जन्म दाखलेचा पुरावा ( जन्माचा दाखला / शाळा सोडल्याचा दाखला )

४. रहिवाशी दाखला किंवा आधारकार्ड , मतदान ओळखपत्र , रेशनिंगकार्ड

५. अनुभव प्रमाणपत्र सही / ( राजेश पाटील ) आयुक्त पिंपरी चिंचवड महानगरपालिका पिंपरी -४११०१८

जाहीरात व अर्ज