डॉ. पंजाबराव देशमुख सारथी उच्च शिक्षण देशांतर्गत शिष्यवृत्ती योजना सन 2022-23
dr panjabrao deshmukh scholarship online apply last date 2022 – सन २०२२-२३ या वर्षात देशातील नामांकित शैक्षणिक संस्थामध्ये उच्च शिक्षण घेण्यासाठी मराठा, कुणबी, मराठा-कुणबी व कुणबी मराठा विद्याथ्यांना छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारखी), पुणे संस्थेमार्फत डॉ. पंजाबराव देशमुख सारथी उच्च शिक्षण देशांतर्गत शिष्यवृत्ती वा योजनेकरिता अर्ज मागविण्यात येत आहेत.
अर्ज करण्यासाठी सविस्तर माहिती खालीलप्रमाणे dr panjabrao deshmukh scholarship
राज्यातील ३०० मराठा कुणबी मराठा-कुणबी, कुणबी-मराठा विद्यार्थ्यांना सन २०२२-२३ या वर्षात प्रवेश घेणा-या विद्यार्थ्यांना देखील सदरहू योजना लागू राहील नामांकित संस्थामधील अभ्यासक्रमांसाठी डॉ. पंजाबराव देशमुख सारथी उच्च शिक्षण देशांतर्गत शिष्यवृत्ती प्रदान करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार सन २०२२ – २३ या शैक्षणिक वर्षांकरिता मराठा कुणबी मराठा-कुणबी, कुणबी-मराठा विद्यार्थ्यांकडून दि. २१.११.२०२२ सायंकाळी ६.१५ पर्यंत अर्ज मागविण्यात येत आहेत.
अटी शर्ती सारथी पुणे संस्थेच्या पुढील संकेतस्थळावर पहा
ऑनलाईन अर्ज भरण्याची शेवटची तारीख: २१.११.२०२२
अधिकृत website –https://sarthi-maharashtragov.in
शिष्यवृत्ती साठी पात्रता व अट
ऑनलाईन अर्ज भरण्यापूर्वी खालील प्रमाणे नमूद महत्वाच्या बाबी निर्देशनास आणून देण्यात येत असून उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी दक्षता घ्यावी व पात्रता असल्यास अर्ज करावा.
- विद्यार्थी महाराष्ट्र राज्यातील मराठा, कुणबी, मराठा कुणबी व कुणबी मराठा या जातीतील असावा.
- महाराष्ट्र राज्यातील रहिवाशी असावा
- संस्थांमध्ये प्रवेश घेणारा विद्यार्थी हा पूर्णवेळ विद्यार्थ म्हणून प्रवेशित असावा.
- कमाल वयोमर्यादा २५ वर्षे व पदव्युत्तर पदवी / पदविका अभ्यासक्रमासाठी कमाल वयोमर्यादा ३० वर्षे इतकी राहील.
शैक्षणिक अर्हता खालील प्रमाणे आवश्यक
- १० वी व १२ वी ची परिक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे
शिष्यवृत्ती अंतर्गत विद्यार्थ्यांना मिळणारे लाभ खालील प्रमाणे
योजने अंतर्गत पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यास अभ्यासक्रमासाठी लागणाऱ्या पुस्तकांसाठी २५,०००/- व शैक्षणिक साहित्य तसेच, इतर शैक्षणिक खर्च यासाठी एकूण १२५,000/- अश एकूण ₹ ५०,०००/- प्रत्येक वर्षी संबंधित विद्यार्थ्यास त्याच्या आधार संलग्न बँक खात्यावर अदा करण्यात येईल.
शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्याची पध्दती खालील प्रमाणे असतील :
या योजने अंतर्गत शिष्यवृत्तीसाठी या निवेदनासोबत दिलेल्या विहित नमुन्यातील अर्ज नमूद विहित कालावधीत समक्ष/पत्राद्वारे व्यवस्थापकीय संचालक सारथी, पुणे येथे सादर करावा.
शिष्यवृत्ती अर्जासोबत विद्याथ्यांने पुढील कागदपत्र जोडणे आवश्यक आहे:
- महाराष्ट्राचा रहिवाशी असल्याबाबत अधिवास प्रमाणपत्र
- विदयार्थी मराठा, कुणबी, मराठा-कुणबी व कुणबी मराठा जातीचा असल्याचा पुरावा /जातीचा दाखला (सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेला)
- फॉर्म नं.१६, उत्पन्नाचा दाखला (सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेला) व आयकर विवरण पत्र परिच्छेद (इ) (२) व (३) मध्ये नमूद केल्याप्रमाणे.
- इयत्ता १२ वीचा शाळा/महाविद्यालय सोडल्याचा दाखला,
- संस्थेत प्रत्यक्ष प्रवेश मिळाल्याचे संबंधित संस्थेचे पत्र, आधार कार्ड, पॅन कार्ड (पालकाचे) व आधार संलग्न बँक खात्याचा तपशिल.
- संपुर्ण गुणपत्रिका, इ.१२वी/डिप्लोमा/पदवी इत्यादी परिक्षांच्या सर्व वर्षाच्या गुणपत्रिका
डॉ. पंजाबराव देशमुख सारथी उच्च शिक्षण देशांतर्गत शिष्यवृत्ती योजना सन 2022-23
Advertise -डॉ. पंजाबराव देशमुख सारथी उच्च शिक्षण देशांतर्गत शिष्यवृत्ती योजना सन 2022-23 | Download |
Terms & Conditions –डॉ. पंजाबराव देशमुख सारथी उच्च शिक्षण देशांतर्गत शिष्यवृत्ती योजना सन 2022-23 | Download |
Application Form –डॉ. पंजाबराव देशमुख सारथी उच्च शिक्षण देशांतर्गत शिष्यवृत्ती योजना सन 2022-23 | Download |
Online Application Form –डॉ. पंजाबराव देशमुख सारथी उच्च शिक्षण देशांतर्गत शिष्यवृत्ती योजना सन 2022-23 | Apply / View |