You are currently viewing जनरल नर्सिग व मिडवाईफरी प्रशिक्षणाची ( जीएनएम ) प्रवेश प्रकिया .. सन २०२१-२२, सार्वजनिक आरोग्य विभागाच्या आरोग्य सेवा

जनरल नर्सिग व मिडवाईफरी प्रशिक्षणाची ( जीएनएम ) प्रवेश प्रकिया .. सन २०२१-२२, सार्वजनिक आरोग्य विभागाच्या आरोग्य सेवा

  • Post category:Home

जनरल नर्सिग व मिडवाईफरी प्रशिक्षणाची ( जीएनएम ) प्रवेश प्रकिया .. सन २०२१-२२

सार्वजनिक आरोग्य विभागाच्या आरोग्य सेवा आयुक्तालयाच्या अधिनस्थ व महाराष्ट्र राज्य शुश्रूषा व परावैद्यक शिक्षण मंडळ , मुंबई यांनी मान्यता दिलेल्या सोबतच्या यादीतील जिल्हा रुग्णालयांमध्ये २३ जनरल नर्सिग व मिडवाईफरी ( जीएनएम ) प्रशिक्षण संस्थामध्ये प्रशिक्षणासाठी प्रवेश प्रकिया करण्यास परवानगी देण्यात येत असून सदर प्रवेश प्रक्रिया सुरळीतपणे राबविताना खालील सुचनांचे पालन करण्यात यावे .

१ ) सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत आरोग्य सेवा आयुक्तालयाच्य अधिनस्थ असलेल्या २३ जीएनएम परिचर्या प्रशिक्षण केंद्राची प्रवेश क्षमता १० आणि २० याप्रमाणे एकूण ३ ९ ० एवढी असून त्याअनुषंगाने सन २०२१-२२ या शैक्षणिक वर्षापासून प्रदेश प्रकिया राबविताना शासनाने विहित केल्यानुसार आरक्षण ठेवण्यात आलेले आहे . ( सोबत आरक्षणानुसार परिचर्या प्रशिक्षण केंद्राचा तक्ता जोडण्यात येत आहे . )

२ ) प्रत्येक जिल्हयाच्या जिल्हा शल्य चिकित्सक यांनी प्रवेशासाठी तात्काळ वर्तमानपत्राद्वारे जाहिरात दयावी . ज्या जिल्हयात प्रशिक्षण केंद्र नाही.अशा उमेदवारांसाठी नजिकच्या कोणत्याही जिल्हयाच्या प्रशिक्षण केंद्रात अर्ज प्राप्त करून घेता येईल.असे नमुद करावे .

३ ) सदरचे प्रवेश अर्ज हे प्रिटींग प्रेस / छपाई करुन घ्यावेत . तसेच सर्व अर्ज अनुक्रमांकानुसार वाटप करणे बंधनकारक राहिल .

अर्ज पहा