खुशखबर; जिल्हा परिषद मध्ये १८००० रिक्त पदांची जाहिरात साठी नवीन शासन निर्णय अखेर प्रसिद्ध १५ मे २०२३

पुरवठा निरीक्षक भरती GR येथे पहा

राज्यातील सर्व जिल्हा परिषद मध्ये विविध ३० पेक्षा जास्त संवर्गातील एकूण १८००० पेक्षा जास्त पदे मागील ५-६ वर्षा पासून रिक्त आहेत , २०१९ मध्ये या साठी अर्ज भरून घेतले होते परंतु त्यानुसार परीक्षा झाल्या नाहीत व ती परीक्षा व २०१९ ची जिल्हा परिषद भरती रद्द करण्यात आली आहे तसा शासन निर्णय देखील प्रसिद्ध झाला होता. त्यानंतर शासनाने नवीन जाहिरात प्रसिद्ध केली जाईल व नव्याने पुन्हा अर्ज स्वीकारून IBPS या मोठ्या कंपनी मार्फत परीक्षा घेतल्या जातील असे नवीन शासन निर्णय काढले आहेत. त्यानंतर हा १५ मे २०२३ चा शासन निर्णय प्रसिद्ध झाला आहेत या नुसार शेवटी भरती प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे असे दिसते. कारण या शासन निर्णयानुसार सर्व जिल्हा परिषद ना आदेश आहेत कि , या शासन निर्णयानुसार जी मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत त्यानुसार जाहिरात प्रसिद्ब करावी. या शासन निर्णया मध्ये जाहिरात प्रसिद्ध करण्यासाठी जाहिरात चा कच्चा मसुदा दिला आहेत. त्याची सर्व माहिती पुढे दिली आहे.

जिल्हा परिषद नवीन जाहिरात !! GR पहा new

सविस्तर जिल्हा परिषद भरती नवीन GR येथे पहा

जिहा परिषद भरती पात्रता व वय मर्यादा – जिल्हा परिषद भरती साठी लवकरच जाहिरात प्रसिद्ध केली जाणार आहे , २०१९ प्रमाणे जुनीच शैक्षणिक पात्रता पदांची ठेवण्यात आली आहे. व वय देखील वाढवून देण्यात आले आहे , जसे कि कोविड मुळे परीक्षा होऊ शकल्या नाहीत म्हणून २ वर्ष वयात सूट दिली आहे . आणि त्याचबरोबर २०१९ मध्ये ज्यांनी अर्ज भरला होता त्यांच्या साठी वयात ५८ वर्षा पर्यंत सूट दिली आहे. परंतु अर्ज भरताना २०१९ मध्ये अर्ज केला होता असे नमूद करणे आवश्यक असेल.

error: Content is protected !!