न्याय सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालयाच्या आस्थापनेवरील विविध संवर्गातील रिक्त पदे भरण्यास मान्यता देणेबाबत GR

न्याय सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालयाच्या आस्थापनेवरील विविध संवर्गातील रिक्त पदे भरण्यास मान्यता देणेबाबत .

महाराष्ट्र शासन गृह विभाग शासन निर्णय क्र . एफएसएल -०४१ ९ / प्र.क्र .५०० / पोल -४ , २ रा , मजला , मंत्रालय , मुंबई ४०० ०३२ , दिनांक : २८ सप्टेंबर , २०२१

प्रस्तावना :

न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा आस्थापनेवरील गट – अ ते गट – ड या सवंर्गातील सरळसेवेच्या कोटयातील एकूण ३३७ रिक्त पदे भरण्यास पदभरतीच्या निबंधातून सुट देण्याबाबतचा प्रस्ताव संदर्भ क्र .१ व २ अन्वये शासनास प्राप्त झाला होता .

०२ . सदर प्रस्ताव वित्त विभाग , शासन निर्णय दिनांक ० ९ .०६.२०१७ अन्वये गठीत अपर मुख्य सचिव ( सेवा ) , साप्रवि व सचिव ( व्यय ) , वित्त विभाग यांच्या उप समितीच्या दिनांक २८.०५.२०२१ रोजी झालेल्या बैठकीत सादर करण्यात आला असता सदर उपसमितीने त्यापैंकी एकूण १८७ पदे सरळसेवेने भरण्यास आणि एकूण १०४ पदे बाह्य यंत्रणेद्वारे भरण्यास मान्यता दिली .

तसेच संदर्भ क्र .४ मधील वित्त विभाग , शासन निर्णय दिनांक ३०.०७.२०२१ अन्वये प्रशासकीय विभागांना महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेतील १०० टक्के रिक्त पदे भरता यावीत याकरीता वित्त विभागाच्या यापूर्वीच्या शासन निर्णयानुसार पदभरतीवर घातलेल्या निबंधांतून सूट दिलेली आहे .

त्यानुषंगाने शासन निर्णय निर्गमित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती .

GR डाउनलोड करा

error: Content is protected !!