यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बैंक म.यवतमाळ नोकरभरती जाहिरात ( कनिष्ठ लिपीक व सहाय्यक कर्मचारी [ शिपाई पदांच्या भरतीकरीता ) यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक म.यवतमाळ
खालील रिक्त पदे भरण्याकरीता मागासवर्गीय प्रवर्गातील सरळसेवा भरतीसाठी पात्र उमेदवारांकडुन विहीत नमुन्यात ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत .
संकेत स्थळ www.ydcc.in व बँकचे संकेत स्थळ www.ydccbank.org या संकेत स्थळावर नोकरभरतीची link उपलब्ध आहे .
ऑनलाईन पध्दतीने अर्ज भरणा करण्याचा दि .०६.०७.२०२५ सकाळी ११.०० पासुन ते कालावधी दि .१८.०७.२०२१ रात्री ११.०० वा.पर्यंत परिक्षा शुल्क अद्यावत करण्याचा अंतिम दि .२०.०७.२०२१ दुपारी ५.३० वा.पर्यंत दिनांक परिक्षा दिनांक एजंसी / बँकेच्या संकेत स्थव्यवर प्रसिध्द करण्यात येईल .
परिक्षा प्रवेशपत्र डाऊनलोड करण्याचा दिनांक एजंसी / बँकेच्या संकेत स्थळावर प्रसिध्द करण्यात येइल .
ऑनलाईन परिक्षा निकालानंतर एजेंसी / बँकेच्या संकेत स्थळावर प्रसिध्द करण्यात येईल .
पदसंख्या :
१ ) लिपीक पदांची संख्या :
एकुण ३१
सहाय्यक कर्मचारी ( शिपाई ) पदांची संख्या :
१ १
शैक्षणिक अर्हता :
१ ) कनिष्ठ लिपीक पदाकरीता उमेदवार हा मान्यता प्राप्त विद्यापीठाचा कोणत्याही शास्त्रेतील पदवीधर असणे अनिवार्य असुन पदवी परिक्षेत उमेदवारास ४५ % गुण असणे आवश्यक राहील . तसेच संगणकाचे ज्ञान आवश्यक राहील व GDC & A , CAIIB या सारख्या परिक्षा पास असल्यास किंवा बँकींग डिप्लोमा असल्यास प्राधान्य दिल्या जाईल
२ ) सहाय्यक कर्मचारी ( शिपाई ) या पदाकरीता
उमेदवार किमान वर्ग १० पास असावा .
वयोमर्यादा :
मागासवर्गीय उमेदवारांच्या बाबतीत [ अनु.जाती , अनु.जमाती , वि.जा.अ. , भ.ज.ब. , भ.ज.ड .. वि.मा.प्र . , इ.मा.य. , माजी सैनिक यांचेकरीता वयोमर्यादा ४३ वर्षे राहील . अपंग माजी सैनिक उमेदवारांकरीता वयोमर्यादा ४५ वर्षे राहील व अंशकालीनसाठी वयोमर्यादा ५५ वर्ष राहील . ऑनलाईन अर्ज भरण्याच्या दिनांकापर्यंत उपरोक्त वयोमर्यादा व शैक्षणिक अर्हता प्राप्त असलेले उमेदवार अर्ज करण्यास पात्र असतील .
निवड कार्यपध्दती :
ऑनलाईन परिक्षा :
कनिष्ठ लिपीक श्रेणीतील पदांकरीता ९ ० गुणांची ऑनलाईन परिक्षा घेण्यात येईल . सदर परिक्षेच्या प्रश्नपत्रिका वस्तुनिष्ठ व बहुपर्यायी स्वरुपाच्या असतील . यामध्ये बँकींग , मराठी व्याकरण , इंग्रजी , सामान्य ज्ञान , गणित व बौध्दिक चाचणी या विषयांवरील प्रश्नांचा समावेश असेल .
तसेच परिक्षेचे माध्यम मराठी असेल .
सहाय्यक कर्मचाऱ्यांकरीता ९ ० गुणांची ऑनलाईन परिक्षा राहील . त्यामध्ये सामान्य ज्ञान व बौध्दीक चाचणी या विषयांवरील प्रश्नांचा समावेश असेल .
मुलाखत :
कनिष्ठ लिपीक व सहाय्यक कर्मचारी [ शिपाई ] पदासाठी ऑनलाईन परिक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या उमेदवारांना बँक धोरणानुसार भरावयाचे पद संख्येच्या प्रमाणात ऑनलाईन परिक्षेचे गुणानुक्रमे मौखीक मुलाखतीस बोलाविण्यात येईल . मौखीक मुलाखतीकरीता १० गुण ( शैक्षणिक पात्रतेकरीता ५ गुण व मौखिक मुलाखतीकरीता ५ गुण ) राहतील . उमेदवार मुलाखतीस गैरहजर राहिल्यास तो अंतिम निवडीस पात्र राहणार नाही .
ऑनलाईन पध्दतीने अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सुचना
या संकेत स्थळावर उपलब्ध आहेत .
कनिष्ठ लिपीक व सहाय्यक कर्मचारी [ शिपाई पदाकरीता रु .७५० / – सर्व करांसह परिक्षा शुल्क आकारल्या जाईल .