MIDC पदभर्ती दूसरा टप्पा मान्यता

  • Post category:Home

MIDC Recruitment

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या अग्निशमन विभागातील ७ अग्निशमन केंद्रासाठी विविध संवर्गातील १३० पदांच्या निर्मितीस मान्यता देणेबाबत ….

महाराष्ट्र शासन 
उद्योग , ऊर्जा व कामगार विभाग ,
शासन निर्णय क्रमांक :
आयडीसी २००७ / प्र.क्र .४८० / उद्योग -१४ . मंत्रालय , मुंबई ४०० ०३२ .
दिनांक : १३ ऑक्टोबर , २०२१ .

प्रस्तावना :

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या २४ औद्योगिक वसाहतीमध्ये अग्निशमन केंद्र , अग्निशमन मुख्यालय , ४ प्रादेशिक कार्यालये यासाठी आवश्यक विविध संवर्गातील ५ ९९ पदे निर्माण करण्याचा प्रस्ताव शासनास सादर करण्यात आला होता . त्यापैकी वित्त विभागाच्या मान्यतेने पहिल्या टप्प्यातील विविध संवर्गातील ४६ ९ पदांच्या निर्मीतीस संदर्भाधिन क्र . १ च्या शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आलेली आहे . उर्वरित ७ अग्निशमन केंद्रासाठी सह मुख्य अग्निशमन अधिकारी या पदासह १३० पदांच्या निर्मीतीस मान्यता देण्याबाबतचा प्रस्ताव महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने शासनास सादर केला आहे . वित्त विभागाने सुचीत केल्यानुसार वित्त विभाग शासन निर्णय ९ जून २०१७ अन्वयें गठित करण्यात आलेल्या अपर मुख्य सचिव ( सेवा ) व सचिव ( व्यय ) यांच्या उप समितीच्या दिनांक १४ फेब्रुवारी २०२० रोजी झालेल्या बैठकीत सदर पदनिर्मीतीचा प्रस्ताव उच्चस्तरीय सचिव समितीसमोर सादर करण्याची शिफारस केली होती . त्यास अनुसरून मुख्य सचिव यांचे अध्यक्षतेखालील उच्चस्तरीय सचिव समितीसमोर दि .१७ / ०७ / २०२० च्या बैठकीमध्ये सदर पदनिर्मीतीचा प्रस्ताव सादर केला असता , उच्चस्तरीय सचिव समितीची महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या अग्निशमन विभागातील ७ अग्निशमन केंद्रासाठी विविध संवर्गातील १३० पदांचे निर्मीतीस मान्यता प्राप्त झाली आहे . उच्चस्तरीय सचिव समितीने व वित्त विभागाने दिलेल्या मान्यतेस अनुसरून , सदर पदनिर्मीती संदर्भातील शासन निर्णय निर्गमित करण्याची बाब शासनाच्या विचाराधिन होती .

शासन निर्णय : उद्योग विभागाच्या प्रशासकीय अधिपत्याखालील महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या अग्निशमन विभागांतर्गत ७ अग्निशमन केंद्राकरीता आवश्यक दुसऱ्या टप्प्यातील विविध संवर्गातील खालील नमूद १३० पदांच्या निर्मितीस शासन मान्यता देण्यात येत आहे .
मंजूर पदे

GR पहा/GR Download