You are currently viewing नगरपरिषद  परीक्षा २०२३ पुढे गेली
(Police Patil) नांदेड पोलीस पाटील भरती २०२४.

नगरपरिषद परीक्षा २०२३ पुढे गेली

प्रसिध्दीपत्रक प्रसिद्ध झाले आहे पुढे माहिती दिली आहे- नगरपरिषद प्रशासन संचालनालय अंतर्गत महाराष्ट्र नगरपरिषद राज्यसेवा संवर्गामधील विविध पदे नामनिर्देशनाने / सरळसेवेने भरण्याच्या अनुषंगाने महाराष्ट्र नगरपरिषद राज्यसेवा गट-क परीक्षा-२०२३ परीक्षेचे सत्रनिहाय वेळापत्रक या संचालनालयाच्या दि. १६ ऑक्टोबर २०२३ रोजीच्या प्रसिध्दीपत्र व २३ ऑक्टोबर २०२३ रोजीच्या प्रसिध्दीपत्रकान्वये संकेतस्थळावर प्रसिध्द करणेत आले होते.[read more]

सविस्तर माहिती येथे पहा

तथापि, राज्यभर सुरु असलेल्या विविध आंदोलनांमुळे काही जिल्ह्यात संचारबंदी आदेश लागू करण्यात आलेले आहेत, इंटरनेट सुविधा व राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस काही भागात बंद आहेत. या बाबी विचारात घेवून संचालनालयाच्या क्र. नपप्रसं/ कक्ष- ३ अ / संवर्ग पदभरती/ प्र.क्र.०१/२०२३ / ५६५१, दि. १६ ऑक्टोबर, २०२३ व दि. २३ ऑक्टोबर, २०२३ रोजीचे प्रसिध्दपत्रकानुसार होणाऱ्या खालील परीक्षा पुढे ढकलण्यात येत असून सदर परीक्षेच्या सुधारीत तारखा संचालनालयाच्या वेबसाईटवर लवकरच प्रसिध्द करणेत येतील याची सर्वांनी नोंद घ्यावी.

पुढे गलेल्या परीक्षा

  • अभियांत्रिकी सेवा; स्थापत्य, गट-क (श्रेणी अ, ब आणि क ) – ०२ नोव्हेंबर
  • महाराष्ट्र नगरपरिषद पाणीपुरवठा, जलनि:सारण व स्वच्छता अभियांत्रिकी सेवा गट- क – ३ नोव्हेंबर
  • महाराष्ट्र नगरपरिषद लेखापाल/ लेखापरीक्षक, गट-क (श्रेणी अ, ब आणि क ) – ३ नोव्हेंबर

[/read]