You are currently viewing PM किसान योजनेच्या 14 वा हप्ता तारीख जाहीर, 8.5 कोटी शेतकऱ्यांना मिळणार लाभ
PM किसान योजनेच्या 14 वा हप्ता तारीख जाहीर, 8.5 कोटी शेतकऱ्यांना मिळणार लाभ

PM किसान योजनेच्या 14 वा हप्ता तारीख जाहीर, 8.5 कोटी शेतकऱ्यांना मिळणार लाभ

  • Post category:Home

pm किसान योजना 2023 – PM Kisan 14th Installment – शेतकरी मित्रानो नमस्कार , पीएम किसान योजना महाराष्ट्र व केंद्रसरकार १४ वा हफ्ता लवकरच जमा होणार आहे. पीएम किसान योजना लिस्ट महाराष्ट्र २०२३ साठी अधिकृत घोषणा लवकरच केली जाईल त्याची अधिकृत माहिती website वर देण्यात आली आहे, सर्व माहिती पुढे दिली आहे. पीएम किसान १४ वा हप्ता बद्दल तारीख फिक्स करण्यात आली आहे या मध्ये पीएम किसान योजना अंतर्गत केंद्रसरकार कडून दोन हजार रु व राज्य सरकार कडून दोन हजार रु असे मिळून एकूण ४ हजार रु. भेटणार आहेत. त्याची तारीख २८ जुलै २०२३ हि ठरवण्यात आली आहे. PM Narendra Modi to transfer 14th Installment to 8.5 Crore PM-KISAN Beneficiaries and interact with farmers on 28th July 2023.

पीएम किसान योजना महाराष्ट्र १४ वा हप्ता

पीएम किसान योजना अंतर्गत १४ वा हप्ता हा DBT च्या मार्फत तुमच्या बँक खात्यामध्ये ट्रान्स्फर करण्यात येणार आहे. ज्यां खात्यामध्ये तुमचे आधार कार्ड जोडले गेलेले असेल. सकाळी ११ वाजता पासून सुरुवात केली जाईल.

PM किसान 14 व्या हप्त्याची तारीख PM किसान योजनेचा 14 वा हप्ता हस्तांतरित करण्याच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. PM मोदी 28 जुलै रोजी एका कार्यक्रमात PM किसानचा 14 वा हप्ता थेट देशभरातील 8.5 कोटी शेतकऱ्यांना हस्तांतरित करतील. या योजनेंतर्गत सरकार वर्षभरात नियमित अंतराने दोन हजार रुपये हस्तांतरित करते.

पीएम किसान योजना म्हणजे काय?

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना किंवा पीएम किसान अंतर्गत, सरकार सर्व पात्र शेतकऱ्यांना वर्षभरात ठराविक अंतराने तीन हप्त्यांमध्ये 6,000 रुपये देते. हे पैसे थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात डीबीटीद्वारे वर्ग केले जातात. या योजनेच्या माध्यमातून छोट्या शेतकऱ्यांना थेट मदत देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. हि योजना फेब्रुवारी 2019 मध्ये लाँच करण्यात आले.

पीएम किसान योजनेत नोंदणी करण्यासाठी सरकारच्या अधिकृत वेबसाइट pmkisan.gov.in वर ‘किसान कॉर्नर’ ला भेट देऊन ऑनलाइन नोंदणी करता येते. यासोबतच जर तुम्ही पूर्वी नोंदी केली असेल तर , तुमचे नाव या योजनेच्या लाभार्थ्यांच्या यादीत आहे की नाही हे तुम्ही pmkisan.gov.in या अधिकृत website वर तपासू शकता.